एक्स्प्लोर

Sunil Mittal : एका दिवसात एअरटेलला 5G स्पेक्ट्रमसाठीचं वितरण पत्र, 30 वर्षात असं पहिल्यांदाच झालं; सुनील मित्तल भारावले

Airtel 5G Spectrum : एअरटेल कंपनीला पैसे भरल्यानंतर एकाच दिवसात सरकारकडून वितरणाचे अधिकार मिळाले. सरकारच्या कामाकाजाचा वेग पाहून सुनील मित्तल चांगलेच भारावले आहेत.

Airtel 5G Spectrum : लवकरच भारतात 5G सेवा (5G Service) सुरु होणार आहे. एअरटेल (Bharti Airtel) कंपनीला पैसे भरल्यानंतर एकाच दिवसात सरकारकडून वितरणाचे अधिकार मिळाले. सरकारच्या कामाकाजाचा वेग पाहून सुनील मित्तल (Sunil Bharti) चांगलेच भारावले आहेत. टेलिकॉम विभागाला अॅडवांस पेमेंट भरल्यानंतर काही तासांतच सरकारकडून एअरटेल स्पेक्ट्रमचं (Airtel 5G Spectrum) वितरण पत्र  (Allotment Letter) मिळालं. भारती एंटरप्रायजेजचे संस्थापक आणि चेअरमन सुनील मित्तल यांनी ही माहिती दिली आहे. सुनील मित्तल यांनी भारत सरकारचं  (Government of India) कौतुक करताना म्हटलं आहे की, 30 वर्षात हा अनुभव पहिल्यांदा आला आहे की पैसे भरल्यानंतर एका दिवसातच एअरटेलला 5G स्पेक्ट्रमसाठी वितरण पत्र मिळालं. एअरटेलने 5G स्पेक्ट्रमसाठी (Airtel 5G Spectrum) 8,312.4 कोटी रुपये भरले आहेत. 

सरकारच्या कामाचा वेग पाहून सुनील मित्तल भारावले

भारती एंटरप्रायजेजचे (Bharti Enterprises) मालक सुनील मित्तल (Sunil Bharti) यांनी भारत सरकारचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सरकारने दाखवून दिलं आहे की काम कसं व्हायला हवं. अलिकडेच केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमसाठीच्या (5G Spectrum Auction) लिलावामध्ये भाग घेतला होता. सुनील मित्तल यांनी गुरुवारी माहिती दिली की, एअरटेलने 5G स्पेक्ट्रमसाठी 8,312.4 कोटी रुपये भरले. यानंतर काही तासांनंतरच एअरटेलला स्पेक्ट्रमचं वितरण पत्र मिळालं. मित्तल यांनी हा एक वेगळा अनुभव असल्याचं म्हटलं आहे. 

'30 वर्षामध्ये पहिल्यांदाच घडलं'

सुनील मित्तल यांनी म्हटलं आहे की, दूरसंचार विभागासोबतच्या 30 वर्षांच्या व्यवहारामध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे. इज ऑफ डुइंग बिजनस (Ease of Doing Business) साठी हे उत्तम उदाहरण आहे. सरकारनं दाखवून दिलं आहे की, काम कसं व्हायला हवं. सुनील मित्तल यांनी भारत सरकारच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे. 

ग्राहकांना उत्कृष्ट 5G सेवा 
एअरटेलकडे आता देशातील सर्वात विस्तृत असे मोबाइल ब्रॉडबँड फूटप्रिंट आहे. भारतात दूरसंचार क्षेत्रातील 5G क्रांती आणण्यासाठी  कंपनी नेहमीच अग्रस्थानी असेल. वर्षानुवर्षे स्पेक्ट्रम अधिग्रहणाच्या बाबतीत कंपनीने स्मार्ट आणि सातत्यपूर्ण धोरण अवलंबले आहे, परिणामी एअरटेल आज मध्यम आणि लो बँड स्पेक्ट्रमचं सर्वात मोठं माध्यम आहे. या माध्यमातून सर्वोत्तम 5G सेवा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ऑगस्ट 2022 मध्ये कंपनीची 5G सेवा सुरू होईल आणि  ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटीचे पूर्ण लाभ देण्यासाठी जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भागीदारांसोबत कंपनी काम करेल. शिवाय, 3.5 GHz आणि 26 GHz बँडमधील प्रचंड क्षमता दूरसंचार प्रदात्याला कमी खर्चात 100X क्षमता निर्माण करण्यास सक्षम करेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget