Air India Plane Crash : एअर इंडियाचं विमान क्रॅश होताच, बोईंगच्या शेअरमध्ये घसरण, इंडिगो, स्पाइसजेटचे शेअरही गडगडले
Air India Plane Crash : एअर इंडियाच्या एआय -171 या विमानाचा अपघात झाला. हे विमान एका हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळलं. हे विमान बोईंग कंपनीचं होतं.

नवी दिल्ली : एअर इंडियाचं विमान AI-171 अहमदाबादमध्ये कोसळलं. हे विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक एअरपोर्टला निघालं होतं. या विमानात 242 व्यक्ती होते. ज्यामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. एअर इंडियाचं जे विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं ते बोईंग 787-8 ड्रीमलाईनर हे होतं. एअर इंडियाचं हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचं कळताच अमेरिकन शेअर मार्केटच्या प्री मार्केट ट्रेडमध्ये बोईंगच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांची घसरण झाली आहे. या विमानात 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश प्रवासी, 7 पोर्तुगाल आणि 1 कॅनडाचा प्रवासी होता.
एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादमधील मेघानीनगरमध्ये कोसळलं. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच मेघानीनगर आहे. विमान कोसळल्यानंतर मोठी आग लागल्याचं पाहायला मिळालं.
बोईंग कंपनीच्या शेअरमध्ये अमेरिकेतील स्टॉक मार्केटमध्ये प्री ट्रेडिंगमध्ये 8 टक्क्यांची घसरण झाली. या घसरणीनंतर हा शेअर 196.52 डॉलर्सवर आला.
अहमदाबाद विमानतळावळील मेघानीनगरमध्ये एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं. या विमानात 242 प्रवासी होते. या दुर्घटनेनंतर बोईंगचे स्टॉक कोसळले त्याप्रमाणं इंडिगो आणि स्पाइसजेटच्या स्टॉकमध्ये घसरण झाली आहे.
एअर इंडियाचं विमान क्रॅश झाल्यानंतर टाटा ग्रुपच्या स्टॉकमध्ये घसरण झाली आहे. स्पाइसजेट आणि इंडिगोच्या स्टॉकमध्ये घसरण झाली आहे.
स्पाइसजेटच्या स्टॉकमध्ये 2 टक्के घसरण झाली. तर, इंडिगोच्या स्टॉकमध्ये 3.4 टक्के घसरण झाली. इंडिगोचा स्टॉक 5437.50 रुपयांवर आला . स्पाइसजेटचा स्टॉक 44.30 रुपयांनी घसरला.
एअर इंडियाचं विमान क्रॅश झाल्यानंतर इंडिगो आणि स्पाइसजेटच्या शेअरमध्ये घसरण झाली. दोन्ही कंपन्यांचं बाजारमूल्य हजारो कोटींनी घटलं. इंडिगोचं मार्केट कॅप 7458.46 कोटी रुपयांनी घटलं. तर, स्पाइस जेटचं बाजारमूल्य 152.55 कोटी रुपयांनी घटलं.
सेन्सेक्स निफ्टीत घसरण
भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सुरुवातीला तेजीमध्ये होते नंतर त्याचं रुपांतर घसरणीत झालं. सेन्सेक्स तब्बल 823.16 अंकांनी घसरला. म्हणजेच 1 टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्स 81691.98 वर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये 253.20 अंकांची घसरण झाली. निफ्टी 1 टक्क्यांनी घसरुन 24888.20 वर बंद झाला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























