Air India : एअर इंडियाचं विमान क्रॅश होताच, शेअर मार्केटमध्ये खळबळ, सेन्सेक्स निफ्टीत घसरण, टाटा ग्रुपचे स्टॉक्स धडाधड कोसळले
Air India Plane Crash : एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान अहमदाबादजवळ कोसळलं, या घटनेनंतर शेअर बाजार देखील कोसळला आहे.

Air India Plane Crash मुंबई : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एअर इंडियाचं AI-171 विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स मिळून 242 जण होते. हे विमान अहमदाबादमधील रहिवासी भागात कोसळलं. या विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटीश आणि पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा 1 नागरिक प्रवास करत होता. या दुर्घटनेचा परिणाम शेअर मार्केटवर दिसून आला आहे. एअर इंडियाचं विमान कोसळल्याची बातमी समोर येताच शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये देखील घसरण झाली. दुसरीकडे, टाटा ग्रुपच्या शेअर बाजारात लिस्ट असलेल्या सर्व कंपन्यांचे स्टॉक्स गडगडले आहेत.
टाटा ग्रुपच्या कंपन्यांचे स्टॉक्स गडगडले
TCS : 1 टक्क्यांची घसरण
टाटा स्टील : 2.25 टक्क्यांची घसरण
टाटा पॉवर : 2.52 टक्क्यांची घसरण
टाटा एलेक्सी :2.28 टक्क्यांची घसरण
टाटा कम्युनिकेशन्स :0.71 टक्क्यांची घसरण
टाटा मोटर्स : 2.86 टक्के घसरण
टाटा केमिकल्स : 1.75 टक्के घसरण
टाटा कंझ्युमर : 1.74 टक्के घसरण
टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन :4.05 टक्के घसरण
इंडियन हॉटेल्स : 2.74 टक्के घसरण
सर्वाधिक घसरण टाटा मोटर्स, टाटा केमिकल, टाटा कंझ्युमर, टाटा इन्वेस्टमेंट आणि टाटा स्टीलच्या स्टॉकमध्ये घसरण झाली आहे. आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्यामते अशा प्रकारच्या घटनांमुळं गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. एअर इंडिया कंपनी ही टाटा ग्रुपच्या मालकीची असल्यानं शेअर बाजारात टाटा ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे स्टॉक गडगडले आहेत.
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण
भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सुरुवातीला तेजीमध्ये होते नंतर त्याचं रुपांतर घसरणीत झालं. सेन्सेक्स तब्बल 823.16 अंकांनी घसरला. म्हणजेच 1 टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्स 81691.98 वर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये 253.20 अंकांची घसरण झाली. निफ्टी 1 टक्क्यांनी घसरुन 24888.20 वर बंद झाला.
विमानात एकूण 242 जण
अहमदाबादवरुन एअर इंडियाचं विमान AI-171 लंडनला निघालं होतं. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते. या विमानात 169 भारतीय प्रवासी होते. तर, 53 ब्रिटीश नागरिक, 7 पोर्तुगालचे आणि 1 कॅनडाचा प्रवासी होता.
दरम्यान, एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादमधील डॉक्टर्सच्या हॉस्टेलवर कोसळलं. या घटनेत काही डॉक्टर देखील जखमी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या






















