एक्स्प्लोर

AgriStack : पीएम किसानसह शेतीविषयक योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक, कोणती कागदपत्रं आवश्यक?

Farmer ID : केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अ‍ॅग्रीस्टॅक या उपक्रमांंतर्गत शेतकऱ्यांना डिजीटल ओळखपत्र दिलं जाणार आहे.

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजानंचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणं आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाकडून अ‍ॅग्रीस्टॅक या डिजीटल उक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतला गेला आहे. महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीस्टॅक अंतर्गत डिजीटल शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी लागणार आहे. फार्मर आयडीसाठी नोंदणी कुठं करायची? कोणती कागदपत्रं असणं आवश्यक आहेत शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. 

फार्मर आयडीसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक?

केंद्र व राज्य सरकारकडून शेती विषयक योजना चालवल्या जातात. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे. हे ओळखपत्र काढण्यासाठी आधार कार्ड, सात बारा उतारा गट क्रमांक, नमुना 8 अ खाते  उतारा क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि लाभार्थी शेतकरी नोंदणीवेळी उपस्थित असणं आवश्यक आहे. फार्मर आयडी नोंदणीसंदर्भात तलाठी कार्यालय, कृषी सहाय्यक आणि सीएससी केंद्र चालकांशी संपर्क करु शकता. 

कोणत्या योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पीक विमा योजना, कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना, थेट लाभा हस्तांतरण योजना, पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठीच्या या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलं नाही तर त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणं आवश्यक आहे.   

अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्प नेमका काय?

अ‍ॅग्रीस्टॅक हे असं डिजीटल फाऊंडेशन असेल ज्याद्वारे डेटा आणि डिजीटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थापन केलं जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना डिजीटल ओळखपत्र दिलं जाईल. त्यामध्ये त्यांच्या शेतीसंदर्भातील माहितीचा समावेश असेल.  अ‍ॅग्रीस्टॅक हा प्रकल्प बीड जिल्ह्यात राबवण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्यानं नोंदणीचे तीन संच असतील. यामध्ये शेतकऱ्यांचा  आणि त्याच्या शेतांचा आधार संलग्न नोंदणी संच, भूसंदर्भिकृत व्याप्त दर्शवणारा गाव नकाशांचा नोंदणी संच, हंगामी पिकांचा नोंदणी संच असेल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी देखील फार्मर आयडी आवश्यक 

शेतकऱ्यांना जर पीएम किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास फार्मर आयडी मिळवावा लागेल.  पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 6000 रुपयांची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. त्यामुळं आगामी 19 व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळवणं आवश्यक आहे. 

इतर बातम्या:

PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Kolhapur | कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा तापणार?Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Nashik | स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाशिककरांची तीव्र नाराजीSpecial Report Karuna Sharma | करुणा शर्मा यांचे आरोप, Dhananjay Munde यांचे पाय खोलातSpecial Report On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांचा गळा घोटणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Shreyas Iyer : 11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
Video: आया रे तुफान...  सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Video: आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' जिंकतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' पटकावतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
Embed widget