एक्स्प्लोर

4 वर्षात तब्बल 1521 टक्क्यांची तुफानी तेजी, विजय केडियांकडे आहेत 11 लाख शेअर्स, अनेकांना करोडपती करणारी 'ही' कंपनी कोणती?

सध्या शेअर बाजारात या कंपनीची सगळीकडे चर्चा आहे. ही कंपनी भविष्यात चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे, असा दावा केला जातोय.

मुंबई : शेअर बाजारात (Share Market) कधी काय होईल हे सांगता येत नाही. येथे कधी एखादी कंपनी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स देते. तर एखादी कंपनी गुंतवणूकदारांना फार मोठा तोटा देऊ जाते. दरम्यान, सध्या अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन नावाच्या या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. ही कंपनी गेल्या चार वर्षांपासून छप्परफाड कमाई करून देत आहे. 

विजय केडिया यांची कोट्यवधींची गुंतवणूक

साधारण चार वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 42 रुपये होते. आता हाच शेअर 675 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीने गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना 1521 टक्के रिटर्न्स दिले आहेत. विशेष म्हणजे या कंपनीची स्थिती लक्षात घेता दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनीदेखील या कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. या कंपनीचे 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 845.80 रुपये आहे. तर 52 आठवड्यांतील नीचांकी मूल्य 409.50 रुपये आहे. 

4 वर्षांत दिले 1521 टक्क्यांनी रिटर्न्स 

अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीच्या शेअरचे मुल्य 13 नोव्हेंबर 2020 रोजी  42.26 रुपये होते. आता 11 नोव्हेंबर 2024 रोजी हा शेअर 677.10 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीने गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना 1521 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्या तीन वर्षांत अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीच्या शेअरमध्ये 421टक्क्यांची बम्पर तेजी आलेली आहे. इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स क्षेत्रात काम करमाऱ्या या कंपनीचा शेअर गेल्या तीन वर्षांत 131.37 रुपयांहून 675 रुपयांवर पोहोचलेला आहे. 

2 दोन वर्षांत 350 टक्क्यांनी तेजी

अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीने गेल्या दोन वर्षांतही चांगली कामगिरी केलेली आहे. दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये 350 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. 11 नोव्हेंबर 2022 रोजी हा शेअर 152.21 रुपयांवर होता. 11 नोव्हेंबर 2024 रोजी हा शेअर 677.10 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठ महिन्यांचा विचार करायचा झाल्यास हा शेअर या काळात 65 टक्क्यांनी वाढला आहे. तर या वर्षभरात हा शेअर 33 टक्क्यांनी तेजीत आहे. 

विजय केडिया यांनी केलीय कोट्यवधींची गुंतवणूक 

दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांच्याकडे या कंपनीचे तब्बल 11 लाखपेक्षा अधिक शेअर्स आहेत. या शेअर्सची एकूण संख्या 11,16,720 एवढी आहे. त्यांची या कंपनीत 9.93 टक्के मालकी आहे. वर नमूद केलेली माहिती ही सप्टेंबर 2024 पर्यंतची आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
×
Embed widget