satellite office | सॅटेलाईट ऑफिस, कोरोना नंतरचा नवा ट्रेंड
satellite office | कोरोनाच्या काळात कामाच्या सर्व पध्दती बदलल्या आहेत. वर्क फ्रॉम होमचा पर्याय अनेक कंपन्यांनी उपलब्ध करुन दिला आहे. आता या पुढे जात सॅटेलाईट ऑफिसच्या माध्यमातून काम करण्याचा पर्याय समोर येण्याची शक्यता आहे.
मुंबई: 2020 सालामध्ये 'रिमोट वर्किंग' हा काम करण्याच्या पध्दतीमध्ये नवा आदर्श बनत असल्याने अनेक संघटनांनी रिमोट वर्कर्सना चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासाठी सॅटेलाईट ऑफिस स्थापन करायचे की नाही याचा विचार सुरू केला आहे. जेणेकरून रिमोट वर्कर्सना अधिक क्रियाशील होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होईल.
याबाबत अधिक माहिती देताना एल्जो रियल्टीचे सीईओ क्रिश रवेशिया म्हणाले की, कोरोना व्हायरस नंतरच्या काळात, कर्मचार्यांच्या वेळापत्रकात 'रिमोट वर्किंग' चा पर्याय असू शकतो. परंतु कामाच्या ठिकाणी जेव्हा प्रोडक्टिव्हिटीसाठी अनुकूल असे वातावरण निर्माण करण्याची करण्याची आवश्यकता असेल तेव्हा सॅटेलाईट ऑफिसेस हा चांगला पर्याय ठरेल. अनेक व्यवसाय सध्या विस्तारित रिमोट वर्किंगच्या स्वरुपात काम करण्यास प्राधान्य देण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे पोस्ट कोविड मार्केट तयार होण्यास मदत मिळेल.
क्रिश रवेशिया पुढे म्हणाले की, भविष्यातील ऑफिस स्पेसची आवश्यकता व्यापकपणे भिन्न असेल जे मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या प्रकारावर अवलंबून असते. तथापि, मुख्य चिंता ही आहे की विविध प्रकारांच्या व्यवसायासाठी टीम वर्क किती प्रभावी असेल, जे संस्थेचे भविष्य निश्चित करेल.
विविध बाजारात एक्सट्रा पल्स मिळवा सगळ्याच व्यवसाय किंवा संस्थांकडे देशभरातील मोठी कार्यालये टिकवण्यासाठी निधी उपलब्ध नसतो. या महामारीमध्ये सॅटेलाईट ऑफिस हा एक लवचिक पर्याय आहे. जरी मुख्यालय दीर्घ भाडेपट्ट्यांवर असले तरी सॅटेलाईट ऑफिस शेयर्ड स्पेसेस असू शकतात.
सॅटेलाईट ऑफिस लोकेशन व्यावसायिक संघटना महानगरांच्या उपनगरांमध्ये रहिवासी जागांच्या जवळ आपली कार्यालये वेगाने स्थापित करताहेत. त्यामुळे कर्मचार्यांना सुरक्षितता व सुविधा प्राप्त होऊ शकतील. कोरोना व्हायरसने नुकताच एक ट्रेंड वाढविला आहे जो मागील काही वर्षांत वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आधीच खालावत होता. मुंबई, पुणे, गुरुग्राम, नवी मुंबई, हैदराबाद आणि इतर बरीच अशी शहरे आहेत जी सॅटेलाईट वर्कप्लेसचे स्वागत करण्याच्या तयारीत आहेत.
सॅटेलाईट ऑफिसेसचे परिणाम वर्क-लाइफ बॅलन्स हे गेल्या काही वर्षांपासून कर्मचार्यांच्या मागणीचे मुख्य आधार राहिले आहे. व्यावसायिक संघटनांनी याची दखल घेतली आहे. कंपनीमधील कर्मचाऱ्यांमध्ये वर्क-लाइफ बॅलन्स निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. कर्मचाऱ्यांना जास्तीच्या सुट्ट्या दिल्या जात आहेत किंवा बर्याचदा त्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला जात आहे. सॅटेलाइट ऑफिससाठी सहमती द्वारे संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांचे समाधान आणि व्यवसायाला यश मिळण्यासाठी तयार करीत आहेत.
समाधान येथे टिकण्यासाठी आहे अलिकडच्या काळात नोकऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. स्टार्टअपच्या गरजेमध्ये मुख्यत्वे ते नोकरी देत असलेल्या मिलेनियल्ससाठी फ्लेक्सिबल आणि चांगल्या सुविधा असलेल्याले जागांचा समावेश आहे. येत्या काळात देशभरातील कमर्शियल क्षेत्राला संस्था आणि स्टार्टअप्सने कमी किमतीत तयार केलेल्या, आश्चर्यकारकपणे कॉम्पॅक्ट आणि मॉडर्न स्पेस पाहण्यास मिळेल.
योग्य ऑपरेशनल कार्यक्षमता आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी ऑफिस स्पेसची किती आवश्यकता आहे हे समजण्यास व्यवसाय मालकांना अनेक पेचप्रसंगाचा सामना करावा लागतोय. सॅटेलाईट ऑफिसेस सेट-अप करण्यासाठी नवीन लोकेशनवर जाण्यापूर्वी प्रक्रियेचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त कंपन्या शेयर्ड सॅटेलाईट ऑफिसची निवड करत आहेत. उद्योग त्यांच्या संपूर्ण संभाव्यतेवर व्यवसायाचे सातत्य सुनिश्चित करण्यासाठी आणि संपूर्ण भारतात व्यवसाय विस्तारित करण्यासाठी व्यवहार्य रणनीतीचा वापर करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या: