पंतप्रधान मोदींच्या वाराणसी संपर्क कार्यालयाच्या विक्रीची OLX वर जाहिरात, चार जणांना अटक
OLX वर सर्व काही विकणे शक्य आहे अशी कंपनीची जाहिरात असताना आता प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वाराणसीतील कार्यालय विकणे आहे अशी जाहिरात आली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काही उचापतीखोर लोकांनी हे कृत्य केल्याचं पोलीसांनी स्पष्ट केलंय.

वाराणसी: देशात अनेक सार्वजनिक कंपन्यात निर्गुंतवणूक काढण्याचा झपाटा केंद्र सरकारने लावला असताना एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाराणसीतील कार्यालय विक्रीला काढल्याची जाहिरात व्हायरल झालीय. OLX या वस्तूंच्या खरेदी-विक्री करणाऱ्या ऑनलाईन वेबसाईटवर ही जाहिरात पहायला मिळाली. OLX वर सर्व काही विकणे शक्य असल्याचा दावा ही कंपनी करत असताना प्रत्यक्ष पंतप्रधानांचे कार्यालयच OLX वर विक्रीला आल्याच्या वृत्त आलं आहे.
या संबंधी वाराणसी पोलीसांनी अधिक तपास केला असता ही जाहिरात काही उचापतीखोर लोकांनी टाकली असल्याचं समोर आलंय. वाराणसी पोलिसांनी या संबंधी चार लोकांना अटक केली आहे. ही गोष्ट प्रत्यक्ष पंतप्रधानांशी संबंधित असल्याने वाराणसी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
7.5 कोटी रुपयांना विक्री अटक केलेल्या या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमधील कार्यालयाचा फोटो काढून OLX या वेबसाईटवर 'विकणे आहे' या मथळ्याखाली टाकला. त्यांनी या कार्यालयाची विक्री किंमत 7.5 कोटी रुपये इतकी ठरवली होती. OLX वरील या जाहिरातीत मोदींच्या कार्यालयाचे आतील भागाचे फोटो, आतील खोल्या, पार्किंगची सुविधा आणि इतर अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.
चार लोकांना अटक हे प्रकरण जेव्हा पोलिसांच्या ध्यानात आले तेव्हा पोलिसांनी तातडीनं OLX शी संपर्क करुन ही जाहिरात हटवण्यास सांगितली. या गोष्टीची दखल वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात आली आणि अधिक तपासाचा आदेश देण्यात आला. वाराणसी पोलीस अधीक्षक अमित पाठक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, "वाराणसी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत FIR दाखल करण्यात आली असून यासंबंधी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने हे फोटो काढले आणि OLX वर टाकलेत, त्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. त्यांची अधिक चौकशी करण्यात येत आहे."
OLX पर शरारती तत्वों द्वारा पीएम के संसदीय कार्यालय को बेचने हेतु दिये गये विज्ञापन के सम्बन्ध में #SSP_VNS @amitpathak09 की बाईट @Uppolice @dgpup @adgzonevaranasi @IgRangeVaranasi @AmarUjalaNews @Live_Hindustan @TOIIndiaNews @htTweets pic.twitter.com/oXLwh34oyM
— Varanasi Police (@varanasipolice) December 18, 2020
पहा व्हिडिओ: स्टॅच्यू ऑफ युनिटी OLX वर विकण्याची जाहिरात, कोरोनाच्या मदतीसाठी 30हजार कोटींची बोली
महत्वाच्या बातम्या:























