नोकरीला बगल, शेतीला जवळ, अवघ्या दीड एकरात तरुण कमावतोय लाखो रुपये
Success Story :तरुणाने खासगी नोकरी सोडून शेती सुरु केली आहे. अवघ्या दीड एकर शेतीतून या युवा शेतकऱ्याने मशरुमच्या शेतीतून (Mushroom Farming) लाखो रुपयांचं उत्पन्न काढलं आहे.
Success Story : अलिकडच्या काळात अनेकजण आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीतून भरघोस उत्पादन घेत आहेत. तर काहीजण नोकरी सोडून यशस्वी शेती करत आहेत. अशाच एका हरियाणातील (Haryana) कर्नाल जिल्ह्यात राहणाऱ्या तरुणाने खासगी नोकरी सोडून शेती सुरु केली आहे. अवघ्या दीड एकर शेतीतून या युवा शेतकऱ्याने मशरुमच्या शेतीतून (Mushroom Farming) लाखो रुपयांचं उत्पन्न काढलं आहे. बलविंद्र सिंग असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ते इतरांनाही रोजगार देत आहेत.
एकीकडं देशातील लाखो लोक रोजगाराच्या शोधात आहेत, तर दुसरीकडे असे अनेक लोक आहेत जे शेती करून चांगला नफा तर मिळवत आहेतच, पण जवळच्या लोकांना रोजगारही देत आहेत. हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात राहणाऱ्या बलविंद्र सिंह या शेतकऱ्याने असेच काहीसे केले आहे. प्रगतीशील शेतकऱ्याने आपली खासगी नोकरी सोडून मशरूमची शेती सुरु केली आहे. बलविंद्र यांनी अवघ्या दीड एकरातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
20 जणांना रोजगार मिळाला
मशरूमच्या लागवडीची व्याप्ती वाढत असल्याने सुमारे 20 जणांना रोजगार मिळाला आहे. त्याच प्रमाणात नोकरीच्या संधी वाढत आहेत. गावापासून दूर राहून कमी पगारात खासगी नोकरी करणाऱ्या आजूबाजूच्या गावातील तरुणांसाठी प्रगतीशील शेतकरी प्रेरणास्थान बनले आहेत. अशा तरुणांसाठी शेतकरी बलविंद्र हा आशेचा किरण आहेत. बलविंद्रला पाहून तरुण आता आपला व्यवसाय बागायती आणि शेतीकडे वळवण्याचा विचार करत आहेत.
मशरुमची योग्य लागवड केल्यास खर्चाच्या दुप्पट नफा
बलविंद्र हे एका मोठ्या हॉटेलमध्ये खासगी नोकरी करत होते. त्यांना नोकरीबरोबरच आणखी काही काम करावे असे वाटत होते. त्यामुळे बलविंद्र यांनी कामाचा शोध सुरु केला. यावेळी त्यांनी मशरुमची शेती करण्याचा निर्णय घेला. कारण मशरूमच्या लागवडीमध्ये भविष्यासाठी भरपूर रोजगार आणि आर्थिक फायदे आहेत. हे लक्षात घेऊन मशरूमची लागवड केल्याची माहिती बलविंद्र यांनी दिली. बलविंद्र यांनी प्रथम कच्च्या शेडची उभारणी केली. हे उभे करण्यासाठी कमी खर्च आला. यानंतर त्यांनी कायमस्वरुपी शेड टाकले. कायमस्वरूपी शेड उभारण्यासाठी शासनाकडून 40 टक्के अनुदान मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. भाजीपाला शेड देखील अधिक नफा मिळवून देते. त्यांच्याकडे मशरूम लागवडीसाठी सुमारे 20 लोक काम करतात. गहू, धान या पारंपरिक शेतीत शेतकऱ्यांना फारसा नफा मिळत नाही. मशरुमची लागवड योग्य पद्धतीने केल्यास खर्चाच्या दुप्पट नफा मिळतो.
मशरुम शेतीसाठी किती खर्च ?
बलविंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड एकरावर मशरुमची लागवड केली आहे. एकदा उत्पादन काढायचे म्हटलं की, सुमारे दीड लाख रुपये खर्च येतो. एका खोलीतून तीन ते साडेतीन लाख रुपये किमतीचे मशरुम निघतात. सर्व गणित बाजारभावावर अवलंबून आहे. सुरुवातीला मशरूम विकण्यात अडचण आली, पण हळूहळू मार्केट तयार होऊन आपापसात दुवे तयार झाले. आम्ही मशरूम जम्मू-काश्मीरला पाठवतो, तिथे आम्हाला चांगला दर मिळतो. मशरूम लागवडीनंतर एक महिन्यानंतरच मशरूमचे उत्पादन सुरू होते. मशरूमची लागवड सुरू करून जवळपास 6 वर्षे झाली आहेत. शेतकऱ्यांना पारंपरिक शेती सोडून मशरूमची लागवड करावी आणि मशरूमचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. मशरूम हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने डॉक्टरही आहारात मशरूमचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
महत्वाच्या बातम्या: