एक्स्प्लोर

'या' देशात 4 दिवस कामाचा आठवडा, 3 दिवस विश्रांती, नेमका का घेतला निर्णय?

आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करण्याचा ट्रेंड हळूहळू वाढत आहे. अनेक देशांमध्ये त्याचा अवलंब देखील केला जात आहे.

4 Day Work Week: आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करण्याचा ट्रेंड हळूहळू वाढत आहे. अनेक देशांमध्ये त्याचा अवलंब देखील केला जात आहे. यामध्ये आता जर्मनीचे (Germany) नाव जोडले गेले आहे. तिथं अनेक कंपन्यांनी 4 दिवसीय कामाचा आठवडा लागू केला आहे. तर तीन दिवस सुट्टी असणार आहे. यामुळं कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव कमी होतो आणि एकूण उत्पादकता वाढत असल्याचं म्हटलं जात आहे. 

पगारात कोणत्या प्रकारची कपात नाही 

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जर्मनीतील अनेक कंपन्या चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याची पद्धत स्वीकारत आहेत. या अंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सात दिवसांपैकी फक्त 4 दिवस काम करण्यास सांगत आहेत. उर्वरित 3 दिवस कर्मचाऱ्यांना विश्रांती देण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात केलेली नाही. अहवालानुसार, जर्मनीतील अनेक कंपन्या सध्या 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्याची चाचणी घेत आहेत. या प्रयोगात सुमारे 45 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये सहभागी कंपन्या पगारात कोणताही बदल न करता कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करत आहेत. यापूर्वी 2022 मध्ये ब्रिटनमधील अनेक कंपन्यांनी असाच प्रयोग केला होता.

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची समस्या दूर होणार

जर्मनी सध्या आर्थिक संघर्ष करत आहे. युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था गेल्या वर्षी आर्थिक मंदीत सापडली होती. त्यानंतर आर्थिक प्रगतीच्या मार्गावर परतण्यासाठी जर्मनीची धडपड सुरू आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कंपन्यांना अडचणी येत आहेत. कंपन्यांसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे काम करणाऱ्या लोकांची कमतरता. असे मानले जाते की 4 दिवसीय कामाच्या सप्ताहामुळं कंपन्यांच्या विद्यमान कर्मचाऱ्यांची उत्पादकता तर वाढेलच, परंतू, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची समस्या देखील दूर होईल.

1 फेब्रुवारीपासून बदल लागू होणार 

अनेक कामगार संघटना आणि हक्क संघटना कामगारांवरील कामाचा ताण कमी करण्याची मागणी करत आहेत. जर्मनीतही अशा मागण्या कामगार संघटनांनी केल्या आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, प्रयोगात सहभागी कंपन्या 1 फेब्रुवारीपासून बदल लागू करतील. यामुळे 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्यात कामगार संघटनांचा युक्तिवाद कितपत योग्य होता हे त्यांना कळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या:

National Pension System : राष्ट्रीय पेन्शन योजनेत खातं कसं उघडायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया आहे तरी काय?

महत्त्वाच्या बातम्या

How To Create Will : मृत्यूपत्र कसे तयार करायचे? किती खर्च येतो? जाणून घ्या 
How To Create Will : मृत्यूपत्र कसे तयार करायचे? किती खर्च येतो? जाणून घ्या 
1 November Rules Change : 1 नोव्हेंबरपासून काय काय बदलणार? जाणून घ्या.. तुमच्या कामाची गोष्ट
1 November Rules Change : 1 नोव्हेंबरपासून काय काय बदलणार? जाणून घ्या.. तुमच्या कामाची गोष्ट
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
Milk Rate Hike : नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार?
नंदिनी दूध 8 रुपयांनी महागलं,1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू, नंदिनी दूध 2022 नंतर 20 रुपयांनी महागलं

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget