एक्स्प्लोर

ऑनलाइन गेमिंगवर लागणार 28 टक्के जीएसटी? गेमिंग संघटनांनी व्यक्त केली चिंता

Online Gaming GST: भारतात ऑनलाइन गेमिंग खेळणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. याचा वापर लोक मनोरंजनासोबत पैसे कमवण्यासाठी करत आहेत. आता जीएसटीमुळे ऑनलाइन गेमिंगवर चर्चा होत आहे.

Online Gaming GST: भारतात ऑनलाइन गेमिंग खेळणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. याचा वापर लोक मनोरंजनासोबत पैसे कमवण्यासाठी करत आहेत. आता जीएसटीमुळे ऑनलाइन गेमिंगवर चर्चा होत आहे. कारण जीएसटी परिषदेच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन गेमिंगच्या संपूर्ण मूल्यावर कर आकारण्याची चर्चा होत असून प्रवेश शुल्काचाही त्यात समावेश करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यावरच आता ई-गेमिंग फेडरेशन (EGF), ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन (AIGF) आणि फेडरेशन ऑफ इंडियन फॅन्टसी स्पोर्ट्स (FIFS) या देशातील तीन सर्वात मोठ्या ऑनलाइन गेमिंग संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. 

या संघटनांनी म्हटलं आहे की, अधिक चिंताजनक गोष्ट म्हणजे काही मीडिया रिपोर्ट असे सूचित करतात की, एकूण पूलवर (बक्षीस रक्कम आणि प्लॅटफॉर्म कमिशन) कर आकारला जाऊ शकतो. या कर प्रणालीची अंमलबजावणी झाल्यास याचा मोठा फटका गेमिंग उद्योगाला बसू शकतो. याबाबत बोलताना ईजीएफचे सीईओ समीर बर्डे म्हणाले की, ही कर प्रणाली लागू झल्यास सरकारचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय पद्धतीशी विसंगत ठरणार. तसेच हे जीएसटीच्या तत्त्वांचेही उल्लंघन ठरेल. मागील काही वर्षात फिनटेक, गेम्स, अॅनिमेशन आणि ग्राफिक्स, सेमीकंडक्टर, एडटेक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारख्या अनेक क्षेत्रांना थेट लाभ पोहोचवणारे ऑनलाइन गेमिंग क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरत असल्याचं या संघटनाचं म्हणणं आहे. 

गेल्या सहा वर्षांत ऑनलाइन गेमिंग क्षेत्राने 2 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त विदेशी गुंतवणूक मिळवली असून आतापर्यंत सुमारे 50,000 लोकांना रोजगार देखील दिला आहे. ऑनलाइन गेमिंग ऑपरेटर हे असे प्लॅटफॉर्म आहे, जे वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातील खेळाडूंना एकत्र आणतात. जमा केलेले पैसे शेवटी विजेत्या खेळाडूला वितरित केले जातात. यावरच बोलताना बर्डे म्हणाले, हे प्लॅटफॉर्म एक पूर्वनिर्धारित शुल्क आकारते. जे जीजीआर म्हणून ओळखले जाते. यावरच कर देखील भरला जातो. जर तुम्ही संपूर्ण रकमेवर वाढीव कर आकारला, तर हे चुकीचे तर ठरेलच, मात्र या पावलामुळे हे क्षेत्र पूर्णपणे नष्ट देखील होऊ शकते. उद्योग संघटनांनी GST परिषदेला ऑनलाईन गेमिंगचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कर आकारणी पद्धतींचा विचार करण्याचा निर्णय घ्या, असं म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget