एक्स्प्लोर

आजपासून 'नोटबदली' सुरू... जाणून घ्या दोन हजारांची नोटांसंदर्भातील तुम्हाला पडलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

2000 Rupees Note Exchange: 23 मे पासून म्हणजेच आजपासून तुम्ही 2000 रुपयांची नोट बदलू आणि जमा करू शकता. यासाठी रिझर्व्ह बँकेनं बँकांना सूचना दिल्या आहेत.

2000 Rupees Note Exchange: 19 मे 2023 ची संध्याकाळ देशासाठी ऐतिहासिक ठरली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) देशात पुन्हा एकदा नोटबंदी (Demonetisation) जाहीर करण्यात आली. पण यावेळी केवल 2 हजार रुपयांच्या नोटा (Rs 2000 Notes) चलनातून मागे घेण्यात आल्या. आरबीआयच्या या निर्णयानंतर लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा लोकांना 2016 च्या नोटाबंदीची आठवण येऊ लागली. मात्र, यावेळी तशी परिस्थिती होताना दिसत नाही. यावेळी, नोटाबंदीमुळे बँकांबाहेर लांबच लांब रांगा दिसण्याची शक्यताच फार कमी आहे. RBI ने लोकांना 2000 च्या नोटा बदलण्यासाठी एक, दोन नाहीतर तब्बल 4 महिन्यांची मुदत दिली आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 23 मे 2023 पासून म्हणजेच, आजपासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, लोक 2000 रुपयांच्या नोटा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बदलू शकतील किंवा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतील.

नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयनं बँकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. नोटा बदलण्यासाठी बँकेत आलेल्या लोकांना कमीत कमी त्रास व्हावा आणि त्यांच्या नोटा बदलून किंवा जमा करता याव्यात यासाठी पुरेशी तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरबीआयच्या निर्देशांनुसार, कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन विहित मर्यादेत 2000 रुपयांची नोट बदलू शकते. तुमच्याकडेही 2000 रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही त्या आजपासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन बदलून घेऊ शकता. पण बँकेत जाण्यापूर्वी 2 हजारच्या नोटा बदलण्याबाबत जाणून घ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं...

Q. 1. 2000 रुपयांच्या नोटा वैध आहेत?

आरबीआयनं आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की, 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढली जात आहे. नोट पूर्णपणे वैध आहे. तुम्हाला हव्या त्या ठिकाणी खरेदी, व्यवहार यासाठी तुम्ही या नोटा वापरू शकता. तसेच, दोन हजारांची नोट घेणं कोणीही नाकारू शकत नाही.

Q. 2. 2000 रुपयांची नोट बदलण्याचा नियम काय आहे?
ज्यांच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे ते कोणच्याही बँकेच्या शाखेत जाऊन ती बदलून घेऊ शकतात. तुम्ही आजपासून म्हणजेच, 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 20,000 रुपयांपर्यंत म्हणजेच, 2000 च्या 10 नोटा बदलू शकता.
Q. 3. नोटा बदलायला पैसे मोजावे लागतील का?
नाही. 2,000 रुपयांची नोट बदलण्यासाठी तुम्हाला कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. बँकेत जाऊन तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय सहज नोटा बदलू शकता. बँकेचे कर्मचारी किंवा अधिकारी तुमच्याकडून कोणतंही शुल्क मागू शकत नाहीत. बँकेनं नोट बदलण्याची सेवा पूर्णपणे मोफत ठेवली आहे.
Q. 4. ज्यांचं बँक खातं नाही त्यांच्यासाठी पर्याय काय?
ज्यांचं बँक खातं नाही ते देखील 2000 ची नोट बदलू शकतात. नोटा बदलण्यासाठी बँक खात्याची गरज नाही, असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन दहा 2000 च्या नोटा बदलू शकता.
Q. 5. फक्त बँकांमध्येच नोटा बदलता येतील का?
बँक शाखांमध्ये जाऊन लोक 2000 च्या नोटा त्यांच्या खात्यात जमा करू शकतात. याशिवाय ते इतर नोटांसोबतही बदलू शकतात. ही सुविधा बँकांमध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध असेल. आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्येही ही सुविधा उपलब्ध असेल.
Q. 6. 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची काही मर्यादा आहे का?
RBI नं 2000 च्या नोटा बदलण्याची मर्यादा निश्चित केली आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुम्ही एका वेळी फक्त 20,000 रुपयांपर्यंतच नोटा एक्सचेंज करता येतील.
Q. 7. बँक खात्यात किती रक्कम जमा करता येईल?
जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात 2 हजाराची नोट जमा केली तर त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या बँक खात्यात तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे जमा करू शकता. बँकिंग डिपॉझिट नियमांनुसार, तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर तुमचे पॅन-आधार कार्ड दाखवावे लागेल.
Q. 8. कधीपासून बदलता येमार 2 हजारांच्या नोटा?
23 मे 2023 पासून, तुम्ही बँकेच्या कामकाजाच्या वेळेदरम्यान बँकेत जाऊन कधीही तुमची नोट बदलू शकता. बँकेत जाण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्या इत्यादी तपशील तपासा. तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत 2,000 रुपयांच्या नोटा जमा आणि बदलू शकता.
Q. 9. तुमच्या बँकेच्या शाखेतूनच 2000 रुपयांची नोट बदलणं आवश्यक आहे का?
नाही, तुमचं बँक खातं नसलं तरीही, तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन 2,000 रुपयांची नोट बदलून मिळवू शकता. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन 2000 रुपयांची नोट बदलून घेऊ शकता. तुम्ही तुमचे बँक खाते फ्रीज केल्यास तुम्हाला फक्त तुमच्या बँकेच्या शाखेत जावं लागेल.
Q. 10. एखाद्याला 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम हवी असल्यास काय करावं?
तुम्ही कोणत्याही निर्बंधाशिवाय खात्यात पैसे जमा करू शकता. 2,000 रुपयांची नोट बँक खात्यात जमा करता येते. डिपॉझिट केल्यानंतर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता.
Q. 11. बँकेनं नकार दिल्यास काय करावं?
बँक तुम्हाला 2000 रुपयांची नोट बदलण्यास किंवा जमा करण्यास नकार देऊ शकत नाही. जर तुम्हाला बँकेनं ही नोट स्वीकारण्यास किंवा जमा करण्यास नकार दिला तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. ही नोट अजूनही चलनात असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत ही नोट घेण्यास कोणी नकार दिल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
Q. 12. कोणता फॉर्म भरावा लागेल?
एसबीआयसह अनेक बँकांनी सांगितलं आहे की, लोकांना 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. लोक बँकेत जाऊन थेट नोटा बदलून घेऊ शकतात.
Q. 13. ओळखपत्रं किंवा पुरावा द्यावा लागेल?
नोटा बदलण्यासाठी लोकांना ओळखपत्र दाखवण्याची गरज भासणार नाही, असं एसबीआयनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, अनेक बँकांनी त्या बँकेत खातं नसलेल्या ग्राहकांसाठी आयडी क्लॉज ठेवला आहे. ज्यांचं बँकेत खातं नाही अशा लोकांकडून 2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, ग्रामीण बँक अशा ग्राहकांकडून ओळखपत्र मागू शकतात.
Q. 14. 2000 च्या नोटा का काढल्या?
दोन हजार रुपयांच्या नोटा आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये या नोटा बाजारात आल्या होत्या. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद झाल्यानंतर चलन आवश्यकतेमुळे या नोटा चलनात आल्या होत्या. त्यामुळे 2018-19 मध्ये 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.
Q. 15. 2000 च्या नोटा कायदेशीर टेंडर राहतील का?
होय. आरबीआयनं म्हटलं आहे की, 2,000 रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहतील.
Q. 16. 2000 च्या नोटांनी सामान्य व्यवहार करता येतात का?
होय. लोक व्यवहारासाठी 2,000 रुपयांच्या नोटा वापरणं सुरू ठेवू शकतात. लोक त्यांना पेमेंट म्हणून देखील घेऊ शकतात. दरम्यान, RBI नं लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये या नोटा जमा किंवा बदलून देण्यास प्रोत्साहित केलं आहे.
Q. 17. 30 सप्टेंबर 2023 नंतर 2000 च्या नोटांचं काय होईल?
जे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा जमा करू शकणार नाहीत, त्यांना RBI कार्यालयात जाऊन त्या बदलून घ्याव्या लागतील. मात्र, आरबीआयनं याबाबत अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वं दिलेली नाहीत.
Q. 18. जर एखादी व्यक्ती 2000 ची नोट ताबडतोब बदलू किंवा जमा करू शकत नसेल तर काय?
यासाठी आरबीआयनं पुरेसा वेळ दिला आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 4 महिन्यांच्या आत म्हणजेच, 30 सप्टेंबरपर्यंत त्या नोटा जमा करू शकतात किंवा बदलू शकता.
Q. 19. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी काय सुविधा आहेत?
बँकांनी वृद्ध आणि दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकांकडूनच देण्यात आल्या आहेत.
Q. 20. नोटा जमा करण्याची शेवटची तारीख काय?
2000 च्या नोटा बदलण्याची किंवा जमा करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Embed widget