₹2000 नोट बदलीचे शेवटचे 30 दिवस! कुठे चुकून राहिलीय का दोन हजाराची नोट, चेक करा
2000 Rupees Notes : आरबीआयने केलेल्या घोषणेनंतर नागरिक दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करु शकतात किंवा दोन हजारांच्या नोटा बँकेत जाऊन बदली करु शकतात.
मुंबई : रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून (2000 Rupees Notes) मागे घेण्याची घोषणा मे महिन्यात केली. त्यानंतर बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सप्टेंबर महिना अखेरपर्यंत मुदत असून आता अखेरचे 30 दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक घरातील गृहिणींचा एक छुपा बटवा अथवा डबा असतोच त्यामुळे या छुप्या बटव्यामध्ये चुकून एखादी नोट राहण्याची शक्यता आहे. नोट असेल तर काळजी करू नका कारण 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेकडे जमा करायच्य आहेत.
नोटबंदी काळात महिला वर्गाने घरात अडचणी मध्ये जमा केलेले 500 किंवा 1000 रुपयांच्या नोटा अचानक समोर आल्या होत्या. त्यामुळ आता महिला वर्गाने घरात अडचणी मध्ये जमा केलेले 500 किंवा 1000 रुपयांच्या नोटा अचानक समोर आल्या आणि त्यांना त्या जमा कराव्या लागल्या होत्या. आता देखील तुमचे छुपे बटवे तपासा जर नोट राहिली असेल तर काळजी करू नका कारण अजून 30 दिवस शिल्लक आहेत. 23 मे रोजी दोन हजारांच्या जमा करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ज्यांच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे ते कोणच्याही बँकेच्या शाखेत जाऊन ती बदलून घेऊ शकतात. आरबीआयने केलेल्या घोषणेनंतर नागरिक दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करु शकतात किंवा दोन हजारांच्या नोटा बँकेत जाऊन बदली करु शकतात. आरबीआयनं आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की, जोपर्यंत या नोटा चलनात आहेत तोपर्यंत नागरिक दोन हजारांच्या नोटांचा वापर करुन व्यवहार करु शकतात.
सर्वसामान्यांना आवाहन करताना आरबीआयने सांगितले की, त्यांच्याकडे आता 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी एक महिने शिल्लक आहेत. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी, लोकांनी 30 सप्टेंबर 2023 पूर्वी नोटा जमा किंवा बदलण्याचे आवाहन आरबीआयने केले आहे.
2016 च्या नोटबंदीनंतर चलनात आली 2000 ची नोट
8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली, त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर, त्याच वर्षी RBI कायदा, 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या.
2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी मुदतवाढ मिळणार?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट (Rs. 2000 Currency note) चलनातून मागे घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बँकांमधून दोन हजार रुपयांची नोट बदलण्यास सुरुवात झाली आहे. नोट बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची मुदत आहे. ही मुदत वाढवून देण्याबाबत चर्चा सुरू असताना केंद्र सरकारने यावर भूमिका स्पष्ट केली आहे. दोन हजार रुपयांची बदली करून घेण्याच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये नोटा फक्त जमा होणार
टपाल कार्यालयात मात्र तुम्ही दोन हजारांच्या नोटा फक्त जमा करु शकता. परंतु यासाठी खातेधारकांची केवायसी असणे आवश्यक आहे. परंतु तुम्ही टपाल कार्यालयात दोन हजारांच्या नोटांची बदली करु शकत नाही.