एक्स्प्लोर

EPFO PF Withdrawal Limit: PF खात्यातून आता 100 टक्के रक्कम काढता येणार; पैसे काढण्याची प्रोसेस काय, A टू Z माहिती

EPFO PF Withdrawal Limit: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आहे.

EPFO PF Withdrawal Limit: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आहे. कारण आता पीएफ खात्यातून 100 टक्के रक्कम काढता येणार आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. पीएफ काढण्यासाठी आधी 13 वेगवेगळे नियम होते, आता ते नियम सोपे करून 3 प्रकारात विभागले गेलेत. आता शंभर टक्के रक्कम कशासाठी काढता येणार? जाणून घ्या...

आवश्यक गरजा (शिक्षण, विवाह, वैद्यकीय कारणे), गृहसंबंधी गरजा आणि विशेष परिस्थिती अशा तीन कारणांसाठी तुम्ही पीएफ खात्यातून शंभर टक्के पैसे काढू शकता. शिक्षणासाठी दहा वेळा व लग्नासाठी पाच वेळा रक्कम काढता येईल. हे दावे लगेच मंजूर केले जातील. 

आगाऊ रक्कमही काढता येणार- (PF Withdrawal Limit)

ईपीएफओने आगाऊ रक्कम काढण्याच्या मुदतीतही बदल केले आहेत. भविष्य निधीच्या परिपक्वतेपूर्वी रक्कम काढण्याची मुदत 2 महिन्यांवरून 12 महिने, तर अंतिम पेन्शन काढण्याची मुदत 2 महिन्यांवरून 36 महिने इतकी वाढवण्यात आली आहे. या नव्या सुधारणांमुळे सदस्यांना निवृत्ती निधी अथवा पेन्शन हक्कांमध्ये कोणतीही तडजोड न करता तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल. सध्या EPFO कडून सदस्यांना 8.25 टक्के व्याजदर दिला जातो. लवकरच आता EPFO चे एटीएम आणि युपीआयने देखील काढता येणार आहे. 

ऑनलाइन पीएफ पैसे काढण्याची प्रक्रिया: (Online PF withdrawal process)

  1. EPFO पोर्टलवर लॉग इन करा: UAN आणि पासवर्ड वापरून EPFO e-SEWA पोर्टलवर लॉग इन करा. 
  2. 'ऑनलाइन सेवा' निवडा: मेनूमधून 'ऑनलाइन सेवा' निवडा आणि त्यानंतर 'दावा (फॉर्म-31, 19, 10C आणि 10D)' वर क्लिक करा. 
  3. बँक तपशील सत्यापित करा: तुमचा UAN शी लिंक केलेला बँक खाते क्रमांक प्रविष्ट करून तपशील सत्यापित करा. 

अर्ज भरा: (How To Withdrawal PF)

  1. 'मी अर्ज करू इच्छित आहे' या पर्यायावर क्लिक करा. 
  2. 'नोकरी सोडल्यानंतर (फॉर्म 19)', 'पेन्शन काढण्यासाठी (फॉर्म 10C)' किंवा 'आंशिक पैसे काढण्यासाठी (फॉर्म 31)' यापैकी योग्य पर्याय निवडा. 
  3. आवश्यक माहिती, जसे की काढण्याची रक्कम आणि कारण, प्रविष्ट करा. 
  4. अर्ज सबमिट करा: अर्ज सबमिट करा आणि आवश्यक असल्यास, तुमच्या आधार-लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा. 
  5. नोंदणीची पडताळणी करा: अर्ज सादर केल्यानंतर, तो तुमच्या नियोक्ता (employer) द्वारे मंजूर होणे आवश्यक आहे. त्यानंतर, रक्कम तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा होईल.

महत्वाच्या सूचना- (Important Rules)

ऑनलाइन पैसे काढण्यासाठी, तुमचा UAN सक्रिय असणे आणि तुमच्याकडे आधार-सत्यापित KYC असणे आवश्यक आहे. 

पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा? (How To Check PF Balance)

1. जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासायची असेल तर सर्वात सोपा मार्ग ईपीएफओची वेबसाईट https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/login यावर लॉगीन करुन शिल्लक तपासू शकता.

2. खातेधारक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन टोल-फ्री नंबर 9966044425 वर फोन करून देखील शिल्लक रक्कम तपासू शकता.

3. यासोबत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन EPFO च्या 7738299899  या क्रमांकावर EPFOHO UAN हा मेसेज लिहून पाठवावा लागेल. यानंतर पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम समजेल.

संबंधित बातमी:

EPFO : मोठी बातमी! पीएफ मधून आता 100 टक्के रक्कम काढता येणार, नव्या नियमाने अडचणी दूर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget