1 एप्रिलपासून होणार 6 मोठे बदल, तुमच्या खिशाला कात्री लागणार का?
आर्थिक वर्ष (Financial year) 2023-24 संपावयला दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 एप्रिलपासून नवीन वर्ष सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर 1 एप्रिलपासून सहा मोठे बदल होणार आहेत.
1 St April New Rule : आर्थिक वर्ष (Financial year) 2023-24 संपावयला दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 एप्रिलपासून नवीन वर्ष सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर 1 एप्रिलपासून सहा मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. क्रेडिट कार्ड ते NPS नेमके काय बदल होणार आहेत, पाहुयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरु होत आहे. या नवीन वर्षात पैशांच्या व्यवहारासंदर्भात मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. जाणून घेऊयात 6 महत्वाच्या बदलासंदर्भातील माहिती.
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) नियमांमध्ये होणार बदल
1 एप्रिलपासून होणारा महत्वाचा बदल म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत होणारा बदल. नवीन नियमानुसार लॉगिन प्रणालीमध्ये बदल केले आहेत. त्यामुळं आता सदस्यांना लॉगिन करण्यासाठी आयडी पासवर्ड तसेच आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर हवा आहे. यामुळं सदस्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे.
OLA मनी वॉलेटच्या नियमांमध्ये नेमका काय बदल?
1 एप्रिल 2024 पासून OLA मनी वॉलेटच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2024 पासून प्रति महिना 10,000 रुपयांच्या कमाल वॉलेट सेवांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कंपनीने यांसदर्भातील माहिती 22 मार्च रोजीच ग्राहकांना दिली होती.
फास्टॅग kyc
1 एप्रिलपासून होणारा महत्वाचा बदल म्हणजे फास्टॅग kyc मध्ये झालेला बदल. तुम्ही जर 31 मार्च 2024 पर्यंत फास्टॅग kyc मध्ये बदल केला नाहीतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. NHAI ने फास्टॅग केवायसी अनिवार्य केली आहे.
LPG गॅसच्या दरात वाढ होणार का?
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या (LPG) दरात वाढ होत असते. त्यामुळं यावेळी देखील म्हणजे 1 एप्रिलपासून LPG गॅसच्या दरात वाढ होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत, अशात सरकार LPG गॅसच्या दरात वाढ करण्याची शक्यता नसल्याचेही बोलले जात आहे.
SBI क्रेडिट कार्डमध्ये बदल
SBI क्रेडिट कार्डसंदर्भात देखील मोठा बदल झाला आहे. 1 एप्रिल 2024 पासून काही क्रेडिट कार्डांसाठी भाडे भरणा व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सचे संकलन बंद होणार आहे. यामध्ये विविध कार्डचा समावेश आहे.
क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात ही अधिसूचना जारी केली आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड अंतर्गत एका तिमाहीत 35 हजार रुपये किंवा त्याहून अधिक खर्च केल्यास, तुम्हाला विमानतळ लाउंज प्रवेशाची सुविधा मिळेल. ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर इंधन, विमा आणि सोन्यावर खर्च करण्यासाठी रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार नाहीत.