
Xiaomi Mobile Phones
2010 साली स्थापन करण्यात आलेली ही चीनची कंपनी स्मार्टफोन, मोबाईल अॅप, लॅपटॉप, इअरफोन, फिटनेस ब्रँडस् इ. उत्पादने निर्माण करते. 2011 साली आपला पहिला मोबाईल लॉंच केल्यानंतर या कंपनीची प्रसिध्दी हळूहळू वाढत गेली. त्यांनी आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन आणि टॅबलेट संगणकासाठी स्वतंत्र OS स्थापन केला. या कंपनीने नुकतंच भारतात Redmi 9 Prime हा मोबाईल लॉंच केला. सामान्यांच्या बजेटमध्ये असणाऱ्या या मोबाईलमध्ये Helio G80 हा प्रोसेसर आणि 5020 mAh आकाराची बॅटरी आहे. तसेच तो मिंट ग्रीन, स्पेस ब्ल्यू, मॅट ब्लॅक आणि सनराईज फ्लेअर या चार रंगात उपलब्ध आहे. 11 ऑगस्ट रोजी Xiaomi ने Mi 10 Ultra आणि Redmi K30 Ultra हे मोबाईल लॉंच केलेत. Mi 10 Ultra चे वैशिष्ट्य म्हणजे फुल HD, AMOLED डिस्प्ले व क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर होय. तर K30 Ultra चे वैशिष्ट्य म्हणजे फुल HD, AMOLED डिस्प्ले अधिक मिडिया टेक डायमेंशन 1000+ प्रोसेसर होय. कंपनीने नुकतेच Mi TV Lux OLED ही संपूर्णत: ट्रान्परंट टीव्ही बाजारात आणला आहे.
TV
Appliances
Accessories
































