Sony Mobile Phones

Sony Mobile Phones

2001 साली स्थापन झालेली ही जपानी मल्टीनॅशनल कंपनी सुरवातीला सोनी आणि इरिक्सन यांचा संयुक्त उपक्रम होता. 2012 साली सोनी कंपनीने याचा पूर्ण ताबा घेतला. सोनी मोबाईल कंपनी आपल्या Xperia या सब ब्रँडच्या नावाखाली अँड्रॉइड स्मार्टफोन तयार करते. या कंपनीचा अलिकडील मोबाईल म्हणजे OLED डिस्प्ले असलेला Sony Xperia II. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटवर चालणारे जलद ऑटोफोकस हे या फोनचे खास वैशिष्ट्य. यात 8 GB RAM व 256 GB इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे. हा फोन फेब्रुवारी 2020 ला जागतिक बाजारपेठेत आला असला तरी अजून भारतीय बाजागपेठेत उपलब्ध नाही.