Panasonic Mobile Phones

Panasonic Mobile Phones

पॅनासोनिक कार्पोरेशन ही ओसाकास्थित जपानची मल्टीनॅशनल कंपनी 1918 साली विजेच्या संबंधीत उत्पादनं करणारी कंपनी म्हणून सुरू झाली होती. त्यानंतर अल्पावधीतच ती ग्राहकाच्या पसंतीस उतरली. 1972 साली या कंपनीने भारतात प्रवेश केला. 2008 साली कंपनीने तिचे मत्सुशिता इलेक्ट्रिक इंडस्ट्रीयल हे नाव बदलून पॅनासोनिक हे नाव धारण केले. या कंपनीने त्यांचा अलिकडील Eluga 16 हा खिशात सहज बसू शकेल असा फोन बाजारात आणला. तो अँड्रॉइड 9.0 वर चालतो. या फोनला मिडिया टेक क्वॉड-कोअर 1.5 Ghz प्रोसेसर आणि 16 GB स्टोरेज असलेला पण तो 256 GB इतका वाढू शकणारी एक्स्पांडेबल मेमरी आणि 3000mAh या बॅटरीच्या सुविधेसह उपलब्ध आहे. याला मागील बाजूस 8 MP तर पुढील बाजूस 5 MP चा कॅमेरा आहे.