Micromax Mobile Phones

Micromax Mobile Phones

2000 साली एक आयटी सॉफ्टवेअर कंपनीच्या स्वरूपात स्थापन झालेल्या या भारतीय कंपनीने 2008 सालापासून मोबाईल उत्पादन आणि विक्री सुरू केली आणि दोन वर्षातच या क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी म्हणून उदयाला आली. ही कंपनी कमी बजेटचे फोन तयार करत होती पण नंतर चीनच्या स्वस्त मोबाईल उत्पादनांमुळे या कंपनीला मोठी स्पर्धा करावी लागली. ऑक्टोबर 2019 साली या कंपनीने तिचा शेवटचा फोन iOne Note लॉंच केला होता. हा SC9863A या प्रोसेसरवर काम करतो अँड्रॉइड 9.0 यावर आधारित आहे. दोन सिम असणाऱ्या या फोनला दोन्ही बाजूंना 5 MP चा कॅमेरा आहे. 2021 मध्ये या कंपनीतर्फे चीनच्या उत्पादनांना टक्कर देण्यासाठी नविन फोन बाजारात आणले जातील असे कंपनीने जाहीर केले आहे.