
HTC Mobile Phones
ही तैवानस्थित इलेक्ट्रॉनिक कंपनी 1997 साली स्थापन झाली. सुरवातीला विंडोज आधारित फोन तयार करणारी ही कंपनी नंतर अँड्रॉइड फोन तयार करू लागली. HTC Dream हा पहिला व्यावसायिक अँड्रॉइड फोन या कंपनीने तयार केला. 2015 सालापर्यंत सॅमसंग आणि अॅपलने या कंपनीच्या ग्राहकांना त्यांच्याकडे वळवण्यात यश मिळवले त्यामुळे या कंपनीचे बरेच नुकसान झाले. या कंपनीने 16 जून 2020 रोजी त्यांचा Desire 20 Pro हा नविन फोन बाजारात आणला. 6.50 इंच टचस्क्रीन असलेल्या या फोनमध्ये ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर आहे. 6GB RAM असलेल्या या फोनमध्ये 128 GB इंटरनल स्टोरेज सुविधा आहे.
TV
Appliances
Accessories





























