एक्स्प्लोर

BLOG | गांधी, धर्मनिरपेक्षता आणि सांस्कृतिक लोकशाही

आज प्रत्येक कोपऱ्यावर गांधींवर होणारा हल्ला हा अधिक जोरदार आणि आवेशपूर्ण होत आहे. गांधींचा मारेकरी, नथुरामला आज काही भारतीयांनी हुतात्मा, शहीद ठरवले आहे.

आपल्या या प्राचीन भूमीतील श्रेष्ठ आणि शक्तीमान लोक गांधी जयंतीच्या संधीचा उपयोग  महात्मांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यासाठी करतील आणि सत्य आणि अहिंसा या शाश्वत मूल्यांवर नेहमीचा उपदेश करतील, ज्या मूल्यांचे आज भारतात तुकडे पाडले जात आहेत. भारतात हिंदू राष्ट्र बनण्याच्या दिशेने सुरू असलेल्या गांधींच्या काही राहिलेल्या गोष्टींबद्दल  अधिक नम्रतेने मी थोडक्यात सांगतो. आज प्रत्येक कोपऱ्यावर गांधींवर होणारा हल्ला हा अधिक जोरदार आणि आवेशपूर्ण होत आहे. गांधींचा मारेकरी, नथुरामला आज काही भारतीयांनी हुतात्मा, शहीद ठरवले आहे. गांधीच्या पुतळ्यांचे विद्रुपीकरण केले जात आहे आणि सोशल मीडियावर आपण विचारही करू शकणार नाही इतकं खालच्या पातळीवर जावून त्यांच्यावर घाणेरडे आरोप केले जात आहे. तरीही गांधी त्याच्या काळात भारताला समानार्थी होते. एकदा नेहरूंना विचारण्यात आले होते की भारत काय आहे, त्यावर त्यांनी थोडक्यात सांगितले होते "गांधी भारत आहे." भारताबाहेरही अनेकदा मूळच्या भारतीय वंशाच्या लोकांकडून गांधींवर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला करून त्यांची प्रतिष्ठा वाढवली जात आहे. लॉस एंजेलपासून जवळपास 250 किलोमीटरवर असलेल्या कॅलिफोर्नियाच्या खोऱ्यातील फेस्नो या लहानशा शहरात पाच हजारांवर शिखांनी स्थानिक विद्यापीठातील पीस गार्डनमधील गांधींचा अर्धपुतळा हटवण्यासाठी एक याचिका दाखल केली. त्यांच्या मते फाळणीवेळी शिखांचे जे हत्याकांड झाले त्याला गांधी जबाबदार आहेत. तरूण शिखांनी असा दावा केला की ते जेंव्हा त्या अर्धपुतळ्याच्या बाजूने जातात, ज्यावर "माझे जीवन हाच माझा संदेश आहे" असे कोरले आहे, तेंव्हा त्यांना त्यांच्यावर मानसिक आघात झाल्यासारखे वाटते. त्यांना 'मानसिक आघात' या शब्दाचा खरा अर्थ समजतो का? ब्लॅक लाईव्ह मॅटर्सचा पुरस्कार करणाऱे काही कार्यकर्ते गांधी हे पक्के वर्णभेदी असल्याच्या मतावर ठाम आहेत. तसे त्यांनी स्वत:ला पटवून दिले आहे. त्यावेळी ते सोईस्कररित्या हे विसरतात की अमेरिकेतील प्रमुख कृष्णवर्णीय नागरी हक्क चळवळीचे नेते हे गांधीजींच्या विचारावर वाटचाल करतात. हीच बाब दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी चळवळीतील नेते आणि वसाहतवादाविरोधी लढणारे केनियातील जोमो केन्याटा आणि घानामधील एनक्रुमाह यांच्यासह इतर नेत्यांबाबतीत लागू होते. एखादा तो वेगळ्या प्रकारे सांगू शकेल. अलिकडे सार्वजनिक ठिकाणी कोणतीही गंभीर चर्चा करणे आता कठीण होत चाललंय. यासंदर्भात केवळ गांधी हेच बळी पडत नाहीत आणि त्याप्रमाणे एक भयानक वंश-राष्ट्रवाद केवळ भारतातच वाढत नाही. काही दिवसापूर्वी मला हे वाचून आश्चर्य वाटले की भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असे विधान केले की देशाच्या इतिहासात गांधी आणि बुध्द हे दोघे 'महान भारतीय' होते. हा एक गंभीर बौध्दीक मतभेदाचा विषय असू शकतो. पण यावर नेपाळमधून लक्षणीय प्रतिक्रिया आली. त्यांनी बुध्द भारतीय असल्याच्या मंत्र्याच्या विधानाला विरोध केला. बुध्द हे जरी नेपाळमधील लुंबीनीमध्ये जन्मले असले तरी हा मुद्दा संकुचित अस्मितावादातून आला आहे जो विहीरीतील बेडकाच्या म्हणीची आठवण करूण देतो. मला वाटते बुध्द भारतीय नव्हता या मतानंतर हजारो भारतीय तत्वज्ञानाची पुस्तके ज्यात बुध्दांची शिकवण, त्यांच्या विचाराचा सार या सगळ्याचे पुन्हा एकदा नव्याने सेन्सॉर अथवा परिक्षण करायला हवे किंवा त्या पुस्तकांचे नाव बदलून 'नेपाळी तत्वज्ञान' असे ठेवायला हवे. दुर्दैवाने भेकडपणाने आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी आपल्या मत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि बुध्द हा नेपाळी असल्याचे कबूल केले. सार्वजनिक क्षेत्रात आपल्या कल्पना, खासकरून ज्या आद्यायावत नाहीत त्या मांडताना काहीही अडचण आली तरी या लघुनिबंधाचा मूळ हेतू आता स्पष्ट झाला आहे. आताच्या काळात ज्यावेळी 'हिंदू गर्व' आणि 'हिंदू राग' या देशात प्रभाव पाडत असताना आणि अनेकांना या देशात जगणे नकोसे होत असताना हे सांगणे आवश्यक ठरते की गांधी हे दोन्ही म्हणजे हिंदू धर्मनिष्ठ आणि धर्मनिरपेक्षवादावर प्रखर श्रध्दा असणारे होते. विशेषत: आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात ते या मताबाबत नि:सदिग्धपणे स्पष्ट होते की प्रत्येक भारतीयाने धर्मनिरपेक्ष असायला हवे. धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचे खोलवर विश्लेषण करण्याआधी हे ठळकपणे सांगणे आवश्यक आहे की भाजपने 'ढोंगी धर्मनिरपेक्षता' बद्दल अनेक वर्षे मुर्खपणाची भाषण दिली आणि नंतर या भारतीय धर्मनिरपेक्षवादाचे संकल्पक म्हणून नेहरूंवर प्रखर टीका केली. सत्य हे होते की जरी गांधीनी त्यांना समजलेली धर्मनिरपेक्षता ही अनेक स्त्रोतांपासून मिळवली असली तरी ते स्वत: खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेचे कट्टर पालन करणारे होते. यापुढे जावून असेही म्हणता येईल की, कलकत्ता, बिहार, नौखाली, पंजाब आणि इतरत्र पसरलेल्या जातीय दंगली त्यांनी पाहिल्या तेंव्हा ते या निष्कर्षापर्यंत पोहचले की प्रत्येक भारतीयाने त्याचा धर्म हा धर्मनिरपेक्षवादाच्या संकल्पनेशी अंतर्भूत केला पाहिजे. 29 जून 1947 साली हरिजन मध्ये लिहताना ते म्हणतात, "धर्म ही काही राष्ट्रीयत्वाची कसोटी नाही तर ती मनुष्य आणि देव यांच्यातील वैयक्तीक बाब आहे. राष्ट्रीयत्वाचा ज्यावेळी मुद्दा येतो तेंव्हा प्रत्येकजन पहिला आणि शेवटी भारतीय असतो, मग त्याचा धर्म कोणताही असो." असे असले तरी गांधींचे एकाचवेळी 'धर्मनिष्ठ हिदू' आणि 'धर्मनिरपेक्षवादावर ठाम आणि दृढनिश्चयी विश्वास असणारे' असे व्यक्तिचित्रण करताना मला या दोन्ही मुद्द्यावरून त्यांचे नेहरूंशी असलेले वेगळेपण सुचवायचे आहे. नेहरूंपेक्षा भारतीय संदर्भात अधिक मेळ घालताना गांधींनी त्यांची धर्मनिरपेक्षवादाची संकल्पना ही अधिक स्त्रोतांपासून मिळवली होती. स्पष्टपणे सांगायचे तर नेहरूंनी त्यांची धर्मनिरपेक्षपणाची संकल्पना ही पाश्चात्य परंपरेतून मिळवली होती, अधिक खासकरून सांगायचे तर वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वायत्तता या मध्यमवर्गीय संकल्पनेतून. या संकल्पनेत खासगी आणि सार्वजनिक गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या जात आणि धर्म ही खासगी बाब समजली जाते. गांधीनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही महिन्यांत वारंवार सांगितले की, "धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक  बाब आहे. त्याची राजकारण आणि राष्ट्रीय व्यवहारांशी गफलत करू नये" (हरिजन 7 डिसेंबर 1947). दहा दिवसांनंतर त्यांनी एका सार्वजनिक सभेत लोकांना आवाहन केले की त्यांनी आपली धर्माची ओळख नाकारावी. " कोणीही हिंदू नाही, कोणीही पारशी नाही, कोणीही जैन नाही. आपण फक्त भारतीय आहोत आणि धर्म ही वैयक्तिक बाब असल्याचे प्रत्येकाने समजून घ्यावे."

गांधींच्या या मताचा विचार करता त्यांच्यात आणि नेहरूंच्यात एक लहान फरक आहे. नेहरू हे नास्तिक होते तर गांधींच्यावर भारतीय धार्मिक परंपरांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या धार्मिक दृष्टीकोनाचा एक स्त्रोत हा भारतीय भक्ती-सुफी परंपरा हा होता आणि यापुढेही जावून मला म्हणावेसे वाटते की गांधी हे संत परंपरेचे शेवटचे मोठे प्रतिनिधी होते. तुलसीदासांबद्दल त्यांचा पूज्यभाव, मी तर म्हणेन 'गंभीर पूज्यभाव' हा सर्वांनाच माहित होता पण नरसिंह मेहता, मिराबाई आणि तुकारामांच्या शिकवणीवरही त्यांचा भर होता. 31 ऑगस्ट 1947 रोजीच्या हरिजन मधील धर्माबद्दल त्यांचा विचार हा नवीन पैलू समोर आणतो. "कायद्याच्या नजरेत सगळ्या गोष्टी समान आहेत. पण प्रत्येकजन त्याच्या वैयक्तिक धर्माचे पालन कोणत्याही अडथळ्याविना आणि समान कायद्याचे उल्लंघन न करता करू शकतो. अल्पसंख्यांकाच्या संरक्षणाचा प्रश्न हा एकाच राज्यात राहणाऱ्या वेगवेगळ्या धार्मिक गटांवर अवलंबून आहे. मी एवढी आशा करतो की भारतात प्रत्येकाला त्याच्या धार्मिक व्यवसाय स्वातंत्र्याची खात्री मिळाली पाहिजे. भारत हा प्राचीन जगातील कदाचित एकमेव देश असेल जिथे सांस्कृतिक लोकशाहीला मान्यता मिळाली असेल. देवाकडे जाणारे रस्ते अनेक असतील पण ध्येय मात्र एकच आहे कारण देव हा एकच आहे. कदाचित जगात जितके लोक असतील तितके देवाकडे जाणारे रस्ते असतील." देवाकडे जाणाऱ्या या बहूविध रस्त्यांच्या संकल्पनेची मांडणी करताना गांधी अद्वैत तत्वज्ञानातील आदर्शांचा विचार मांडत होते. ही गोष्ट 'सांस्कृतिक लोकशाही' चे वैशिष्ट्य आहे. वाचक असाही आक्षेप घेवू शकतात की गांधीच्या लिखानातून धर्मनिरपेक्षता या शब्दाचा उल्लेख होत नाही, तोच वाचक गांधींच्या 'वैयक्तिक धार्मिक व्यवसाय स्वातंत्र्' या जाहीर निवेदनातून त्याच्या मागचा धर्मनिरपेक्षतेचा हेतू स्पष्टपणे ओळखू शकेल. 31 ऑगस्ट 1947 रोजीच्या हरिजनच्या अंकात ते म्हणतात, "राज्य हे धर्मनिरपेक्ष असायला हवे. त्याही पुढे जावून मी म्हणेन की कोणत्याही शिक्षण संस्थेने आश्रय घेवू नये." धर्मनिरपेक्षता हे सांस्कृतिक लोकशाहीचे मूलतत्व आहे. ज्यावेळी गांधीजी 'संपूर्ण धर्मनिरपेक्षता' म्हणतात तेंव्हा ते सांस्कृतिक लोकशाहीचे नूतनीकरणाची गोष्ट करत असतात जे प्रत्येक वळणावर आवश्यक असते. जर समकालीन भारताला धर्मनिरपेक्षतेची संकल्पना गिळंकृत करणे अवघड वाटत असेल तर ती पाश्चिमात्य देशांकडून आयात केली आहे ज्यामुळे देश वसाहतवाद्यांच्या तावडीत सापडला आणि अजूनही त्याने आपल्या कल्पनांवर वसाहत केली आहे. अशा वेळी कदाचित सांस्कृतिक लोकशाही ही संकल्पना काही मदत करू शकेल. कदाचित आता वेळ आली आहे की सांस्कृतिक लोकशाहीची भाषेने प्रत्येक भारतीयांना खासकरून उदिग्न हिंदूना या आश्वासनासह सुसज्ज केले पाहिजे की भूतकाळ न गमावता देशाला घडवण्याचा आणखी एक मार्ग आहे.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget