एक्स्प्लोर

BLOG : जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्य हेही नसे थोडके!

दिनांक 4 ऑगस्ट 2021 .

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं त्या दिवशी टोकियोत घडवला नवा इतिहास.

ऑलिम्पिकच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारा केवळ दुसरा भारतीय ठरला होता नीरज चोप्रा.

दिनांक 24 जुलै 2022 .

टोकियो ऑलिम्पिकमधल्या ऐतिहासिक कामगिरीला एक वर्ष होण्याच्या आत नीरज चोप्रानं गाजवला दुसरा पराक्रम.

ओरेगॉनमधल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रा ठरला रौप्यपदकाचा मानकरी.

अवघ्या वर्षभरात ऑलिम्पिकचं सुवर्णपदक आणि त्यापाठोपाठ जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्यपदक या कामगिरीनं नीरज चोप्राला आज देशातला सर्वात श्रीमंत ॲथलीट ठरवलंय.

नीरज चोप्रा हा टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता असला तरी अवघ्या वर्षभरात जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्यपदक जिंकणं काही सोपं नव्हतं. याचं कारण टोकियोतल्या पराक्रमानंतर नीरजचे पाच ते सहा महिने हे देशभरात  सत्कार सोहळ्यांवरच खर्च झाले होते. पण डिसेंबरनंतर त्यानं वर्षभराचा अभ्यासक्रम अवघ्या सहा महिन्यांमध्ये पूर्ण करून कमाल केली.

आपण पाहूयात नीरज चोप्रासमोर गेल्या सहा महिन्यांमध्ये काय आव्हानं होती?

टोकियो ऑलिम्पिकनंतर वाढलेलं 14 किलो वजन घटवणं हे होतं पहिलं मोठं आव्हान. सर्वोच्च दर्जाच्या ॲथलिटला साजेसा फिटनेस पुन्हा मिळवणं हे दुसरं मोठं आव्हान होतं. शारीरिक ताकद आणि लवचिकता पुन्हा मिळवणं, हे तिसरं आणि भालाफेकीच्या सातत्यपूर्ण सरावासोबत तंत्रात सुधारणा करणं हे चौथं आव्हान होतं. सर्वात मुख्य म्हणजे स्नायूंच्या नव्या दुखापती टाळणं हे पाचवं 
आणि कठीण आव्हान होतं.

भालाफेकीचा एक उत्तम विद्यार्थी असलेल्या नीरज चोप्रानं ती सारी आव्हानं मोठ्या ताकदीनं पेलली. म्हणूनच जागतिक ॲथलेटिक्सच्या रणांगणात त्याला रौप्यपदकाला गवसणी घालता आली. अर्थात ग्रेनाडाच्या ॲण्डरसन पीटर्सनं आपली कामगिरी सातत्यानं 90 मीटर्सपेक्षा अधिक उंचावली. त्यामुळंच सुवर्णपदकाच्या शर्यतीत मात्र नीरजला हार स्वीकारावी लागली.

पण नीरजच्या रुपेरी कामगिरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यानं जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतली भारताची तब्बल 19 वर्षांची पदकाची प्रतीक्षा अखेर संपवली. 2003 साली अंजू बॉबी जॉर्जनं भारताला लांब उडीचं कांस्यपदक पटकावून दिलं होतं. त्यानंतर तब्बल 19 वर्षांनी जागतिक ॲथलेटिक्समध्ये पदकाची कमाई करणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय ठरला.

अवघ्या 24 वर्षांच्या आयुष्यात नीरज चोप्रानं घडवलेला हा सारा इतिहास देशासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. नजिकच्या काळात तो आपल्या शिरपेचात मानाचे आणखी तुरे खोवेल, यात काही शंका नाही. पण नीरज चोप्राच्या या कामगिरीतून स्फूर्ती घेऊन देशाला विविध खेळात आणि विविध क्षेत्रातही नवनवे चॅम्पियन मिळोत, हीच सदिच्छा.

विजय साळवी यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
Embed widget