एक्स्प्लोर

21 व्या शतकातल्या प्रेमवीराचं प्रेमपत्र

आज व्हॉट्सअॅप, फेसबुक, मोबाईल मेसेज सगळं काही बाजूला ठेवून शांतपणे तुला काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी हा पत्र लिहण्याचा अट्टहास मी आज करतोय. कदाचित, तुला हा माझ्या पत्राचा पर्याय खटकेल,पोरकट वाटेल. पण असू दे, आपल्या नेहमीच्या संवादात वापरण्यात येणाऱ्या इमोजीपेक्षा कैक पटीने जास्त भावना मी या पत्रात मांडू शकतो, असं मला वाटतयं.

प्रिय ***, आज व्हॉट्सअॅप, फेसबुक, मोबाईल मेसेज सगळं काही बाजूला ठेवून शांतपणे तुला काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी हा पत्र लिहण्याचा अट्टहास मी आज करतोय. कदाचित, तुला हा माझ्या पत्राचा पर्याय खटकेल,पोरकट वाटेल. पण असू दे, आपल्या नेहमीच्या संवादात वापरण्यात येणाऱ्या इमोजीपेक्षा कैक पटीने जास्त भावना मी या पत्रात मांडू शकतो, असं मला वाटतयं. मी नेटवर बराच शोध घेत 'प्रेमपत्र लिहायचं कसं?' याबाबत विचार करुन हे पत्र लिहतोय. हे मी नेहमीप्रमाणे आधीच प्रामणिकपणे सांगून मोकळा होतोय. कारण, खरंतर प्रेमपत्र लिहिणं खूप अवघड असेल, असं सुरवातीला विचार करताना वाटतं होतं. मग मात्र मी ठरवून टाकलं, जेवढ प्रेम सहज न कोणताही विचार करता, मनाला पटलं तसं, मनाला आवडलं तसं, मनाला सोपं वाटलं तसं केलं. अगदी तसच लिहायचं. कारण मला वाटतं, जसं प्रेम करायला नियम नसतो, वय नसतं, अगदी तसचं प्रेमपत्राचं असतं. त्यामुळे माझ्या आतापर्यंतच्या मनात साचलेल्या सर्व भावनांना मी या पत्रात वाट करून देतोय. मला माहीत नाही तू प्रेम कसं मोजतेस? कारण प्रेमाला मोजायला तराजू नाहीय. 'जो तुझं माझ्यावरचं' आणि 'माझं तुझ्यावरचं प्रेम मोजू शकेल'.  कारण असं 'प्रेममापक' अद्यापतरी कोणत्याचं प्रेमवीरांनी किंवा शास्त्रज्ञानी बनवलं नाही. किंबहुना, खरं मनापासून प्रेम करणाऱ्या प्रेमवीरांनी याचा विचार केलाच नसेल. कारण ते प्रेम मोजण्यापेक्षा प्रेम करतचं राहीले, कोणतही स्वार्थ मनात न ठेवता किंवा मग आपल्या जोडीदाराकडून कोणतेही प्रेमाची अपेक्षा न ठेवता. मात्र, आपण ज्या वातावरणात सध्या राहतोय, ज्या जीवनशैलीमध्ये जगतोय यामध्ये कदाचित तुला या 'प्रेममापका'चा सल्ला अनेक जण देऊ शकतात, जसा मला अनेकांनी दिला. पण जे या'प्रेममापका'त अडकले ते प्रेमाच्या मैदानातून कधीचेच निवृत्त झालेत. हा इतिहास पण तू लक्षात ठेवं. कारण 'माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ?' किंवा 'तुझं माझ्यावर किती प्रेम आहे?', 'तू माझ्यावर किती प्रेम करते ?', 'मी तुझ्यावर किती प्रेम करतो ?'  हे दाखविण्यापेक्षा, मोजण्यापेक्षा हे जाणवणं मला जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळे 'मी किती दिवसांपासून तुला ओळखतो ?', 'किती वेळ मी तुझ्यासोबत असतो ?', 'तुझी किती काळजी घेतो ?', 'किती वेळ तुला बोलतो ?'...यावरून तू किंवा मी आपल्या प्रेमाची तीव्रता नाही ठरवू शकतं. हा सगळा जाणिवांचा खेळ आहे आणि हा जाणिवांचा खेळ जसा मला कळला तसा कदाचित तुलाही कळला असेल. त्यामुळेच आज आपण एकमेकांत गुरफटून भविष्याची स्वप्न रंगवतोय. तू जशी आहेस, तशी फक्त माझी आहेस आणि मी फक्त तुझा आहे. यामध्ये आपल्या प्रेमात कोणतेही बंधन नाहीत, वयाचा अडसर नाही, जात-धर्माची भिंत नाही, मतभेद नाही. कारण हे जरी आपल्या प्रेमामध्ये पुष्ळकदा जन्मपत्रिकेल्या षडाष्टकासारखं आले, तरी आपण या अडसरांचा सामना करून, या जाती-धर्माच्या भिंती पार करून सामंजस्याने झगडून वचनं देतं पुढे आलोय. हे करताना अनेकदा आपल्या दोघांची दमछाक झाली, दू:ख सोसावं लागलं, नैराश्यपण आलं. पण यामधून सुद्धा प्रत्येक वार झेलतं आपण आजही तितकेच घट्ट बिलगून एकत्र आहोत आणि आजही असे अनेक वार या प्रेमाच्या वादळात झेलायला समर्थ आहोत. हे सगळे वार होतांना, हा सगळा आपल्या प्रेमाला होणारा विरोध बघतांना कधी-कधी मी चिडायचो, रागवायचो, हतबलं व्हायचो. तसं अगदी तुझं सुद्धा व्हायचं. पण आपलं प्रेम आपल्याला पुन्हा एकदा उभं राहयला बळ देण्याचं काम करायचं. ते बळ आज सुद्धा आपल्याला एकमेकांसोबत टिकून ठेवण्यात यशस्वी झालंय. आजच्या आपल्या पिढीत आपण एक शब्द आपण वारंवार ऐकतोय. 'सीरिअस प्रेम' . हे प्रेम कसं असतं ? कसं होतं ? कसं टिकतं ? याचं उत्तर जसं माझ्याकडे नाही, तसं तुझ्याकडे पण कदाचित नसणार. पण जो व्यक्ती एका व्यक्तीचा विरह सहन करूच शकत नाही, त्या व्यक्तीशिवाय जगणं कठीण होऊन बसतं, असलं प्रेम हे खरं प्रेम म्हणता येईल ? माहित नाही. कारण प्रेमाला व्याख्या नाहीत, होणार नाहीत. प्रेमाचे काळानुरूप रंग बदतील, वेशभूषा बदलेल पण याची व्याख्या मिळणार नाही. त्यामुळे आपलं प्रेम किती सीरिअस किती खरं ते आपल्या जाणिवेणं स्वत:ला ठरवावं लागेल प्रिये... अनेकदा या प्रेमाच्या आणाभाका आपण घेतं असताना तुला-मला अनेक पर्याय समोर दिसले, काही पर्याय समोर चालून आले, काहींनी पर्याय सुचवले. मात्र, मनाच्या धाग्यात गुरफटलेल्या दोघांनी ते अगदी फाट्यावर मारले.'हे सगळं फाट्यावर का मारलं ?' याचा आपण विचार सुद्धा केला नाही. कारण एकमेकांशिवाय कोणी पर्याय देईल किंवा तो पर्याय असू शकतो, असा विचार या तुझ्यामाझ्या प्रेमाने कधी येऊच दिला नाही. आता हे पुन्हा सगळं लिहिताना खूप काही तुझ्यासमोर नव्यान सारं मांडावं वाटतंय. अगदी आपल्याच घराला आपण रंगकाम करून कसा चकाचक करतो. अगदी तसचं मला आज तू समोर नसताना सुद्धा या पत्राद्वारे पुन्हा एकदा प्रेमाच्या भावनांना नव्यानं चकाचक करण्याचा मोह झाला. हे पत्र निबंधासारखा नाही की जे नियमात लिहायचा आहे. अमूक ओळीत, अमूक शब्दात मांडायचा आहे, त्यात 'कविता-गाणी' मांडायची आहेत. असा काही यात मी केलं नाही, करणार नाही. कारण मी आणि तू जसं प्रेम केलं , करतोय. अगदी सगळे नियम, बंधन बाजूला ठेवून अगदी तसंच मनापासून हे पत्र लिहून आता संपतोय. या पत्रात जे वाक्य मी लिहितोय त्यात तुला आवडणारे वेडेवाकडे इमोजी नसले तरी या पत्राच्या वाक्यांमध्ये  व्हॉट्समध्ये नसलेले आणि पत्रात तुला मिळालेले अदृश्य इमोजी नक्की मिळतील. कदाचित ते इमोजी तुझ्या भावना पुन्हा एकदा नव्याने जागवतील. तुला पण असं पत्र लिहायचा मोह होईल...बघ ! मी पण 21 व्या शतकातला प्रेमवीर आहे, आधीच्या प्रेमवीरांनी वर्ष वर्ष जशी प्रेयसीकडून उत्तराची वाट पाहिली, अगदी तशीच वाट तुझ्या भावनांनी भरलेल्या पत्राची मी पाहिलं. कारण प्रेमपत्राची मज्जा ही एकदा आपल्या जोडीदाराला लिहून काढल्याशिवाय 21 व्या शतकातल्या प्रेमवीराला कळणार नाही. फक्त तुझाच, #######
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
Embed widget