एक्स्प्लोर

BLOG : भाषा पैशाची : समभाग खरेदी करताना नेमके काय बघायचे आणि काय वाचायचे?

जुलै महिन्याच्या लाईफटाईम हायपासून सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोघेही जवळपास 3 टक्के खाली आहे. बीएसईच्या 19 पैकी 15 इंडायसेसने ऑगस्ट महिन्यात एव्हाना निगेटिव्ह परतावा दिला आहे. पावसाची एकूण दशा ही भविष्यातील दिशा ठरवणार हे पक्के. सणासुदीचे दिवस सुरु होऊ घातले आहेत. अशात कभी खुशी कभी गम जरी असले तरी आपण नेमकी काय भूमिका घ्यायची हे बघणे महत्वाचे असते. असे म्हणतात की आपल्या बाजाराचा मागील 5 वर्षांचा पीई बघितला तर तो 26 एवढा येतो. आणि सध्याचा बाजाराचा पीई बघितला तर तो 22 आहे. म्हणजे पीईच्या तुलनेत बाजार अजूनही अंडरव्हॅल्यूड आहे. बाजार बऱ्यापैकी वरच्या स्तरावर आहे असे काहींचे म्हणणे नक्की असेल. पण असे असले तरी व्हॅल्युएशनच्या तुलनेत जरा अंडरव्हॅल्यूड आहे. त्यात एक मार्केट कॅप तो जीडीपी नावाचा पण रेशिओ असतो. तो 1 असेल तर फेअरली व्हॅल्यूड, कमी असेल तर अंडरव्हॅल्यूड आणि जास्ती असेल तर ओव्हरव्हॅल्यूड. सध्या आपला वरच्या स्तरावरच्या बाजाराचा जीडीपी हा 95 टक्के आहे. म्हणजे जवळपास 1 आहे किंवा काकणभर कमीच आहे. म्हणजे अंडरव्हॅल्यूड जरी नसलो तरी जाणकार सांगतात तसे ओव्हरव्हॅल्यूड नक्कीच नाही. तेव्हा काहींचे असे म्हणणे असते आणि ओरड असेल की प्रॉफिट बुक करायच्या का? वर वाढलेले पैसे, किंवा नफा बाहेर काढायचा का? पण अजूनही बाजारात दीर्घ कालावधीसाठी बरीच धग बाकी आहे. त्यामुळे कुठलाही प्रॉफिट बुक करायचा किंवा बाहेर येण्याचा विचार करु नका, होऊ शकते की बाजार एखादा लाल हंगाम बघेल सुद्धा पण आपण कुठले लघुअवधीचे गुंतवणूकदार आहोत, त्या लाल हंगामात अजून खरेदी करायला आपली तयारी ठेऊया. जसे ह्या आठवड्यात आणि नजीकच्या काळात आयपीओ येऊ घातले आहे तसेच बरेच एनएफओ सुद्धा येऊ घातले आहे. अशात एसआयपी कंटिन्यू ठेवायच्या आणि संधीची वाट बघायची नव्या खरेदीच्या. सणावारांच्या दिवसात लांबलेल्या पावसामुळे, कांदा अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि अशात कृत्रिम टंचाई निर्माण होऊन किमती गगनाला नको भिडायला म्हणून सरकारने डिसेंबरपर्यंत आधीच निर्बंध लावले आहेत. तोवर किमान साठवणूक करता येईल तेवढा कांदा खरेदी करण्यास काही हरकत नाही. मागील 3 आठवड्यात पहिल्यांदा परकीय चलनाचे आकडे सकारात्मक आले आहेत. येत्या दिवसात बँकिंग क्षेत्रात 50 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहे असे भाकीत आहे. हे सगळे आकडे एकूण व्यवस्थेसाठी पॉझिटिव्ह आहे. 

मागील भागात आपण क्वॉलिटेटिव्ह अनॅलिसिस कशाप्रकारे करतात हे बघितले होते आता थोडक्यात आपण समभाग खरेदी करताना नेमके काय बघायचे आणि काय वाचायचे हे बघणार आहोत. एकदा क्वॉलिटेटिव्ह अनॅलिसिसमध्ये हे निश्चित झाले की आपल्याला हा समभाग पटतो आहे आणि पुढे जायला काही हरकत नाही तर मग क्वॉन्टिटेटिव्ह अनॅलिसिस करायला एक पाऊल पुढे न्यायाचे. आता क्वॉन्टिटेटिव्ह अनॅलिसिसमध्ये नेमके काय बघायचे आणि काय पायऱ्या चढायच्या हे बघणार आहोत. त्या महत्त्वाच्या पायऱ्या खालीलप्रमाणे, ज्या समभागांची खरेदी करायची आहे त्या कंपनीच्या इतर आकड्यांवर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. 

1. कंपनीचा सेल्स म्हणजे कंपनीच्या विक्रीचे आकडे कसे आहेत? 

कंपनीची विक्री ही दर वर्षाला मागील वर्षापेक्षा 15 टक्क्यांनी अधिक असावी. म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षाची विक्री 15 टक्क्यांनी किमान वाढलेली हवी. विक्री वाढलेली आहे हे प्रगतीचे प्रतीक आहे आणि हे आकडे बघत असताना किमान मागील 5 वर्षाची सरासरी बघायची. या सरासरीचा आकडा सुद्धा 15 टक्के असावा. जर का देशाची प्रगती अबसोल्यूट एक्स्द्यांमध्ये 6 आणि 7 टक्क्यांची अनुमानित असेल तर त्यानुसार नॉमिनल ग्रोथ 15 टक्के असेल. आणि 15 टक्के व्यवस्थेची प्रगती होत असेल तर आपण ज्या कंपनीचा समभाग घेणार असू त्याच्या विक्रीत पण प्रगती 15 टक्के अपेक्षा करायला काही हरकत नाही. 

2. कंपनीचा नफा सुद्धा 15 टक्क्यांपेक्षा अधिक असावा

पॅट, (PAT - Profit After Tax) म्हणजे करानंतरचा नफा. कुठल्याही कंपनीचे सर्व खर्च जाऊन, कर देऊन शेवटी हाती उरते तो नफा. जर का विक्रीची प्रगती 15 टक्के आहे तर करोत्तर नफ्यात सुद्धा प्रगती 15 टक्के असायला हवी. खर्च, डेप्रीसिएशन ज्याला आपण मालत्त्तेचा घसारा, कर सगळे जाऊन प्रगती तेवढीच असावी. विक्रीत जरी वाढ झाली आहे तरी खर्च आणि जे पण वजावट आहे ते मर्यादेत असावी. म्हणून करोत्तर नफ्यात प्रगती सुद्धा 15 टक्के बघायला हवी आणि हे बघताना सुद्धा मागील 5 वर्षांच्या आकड्यांची सरासरी ही 15 टक्के असायला हवी. काही अपवादात्मक गोष्टी असू शकतात. पण शक्यतोवर सरासरी याच घरात असावी. 

3. रिटर्न व इक्विटी किंवा नेटवर्थ 24 टक्क्यांपेक्षा अधिक असावे

कंपनीचा करोत्तर नफा म्हणजे व्यवसायात झालेला फायदा. आणि या व्यवसायाची एकूण मत्ता म्हणजे त्याचे नेटवर्थ किती. लागलेल्या मालमत्तेवर किंवा त्याच्या तुलनेत जो नफा झाला आहे तो किती आहे? तो 24 टक्क्यांच्या घरात असावा असे जाणकार सांगतात. 24 टक्केच का? साधारण म्युच्युअल फंडात 18 टक्के नफा सरासरी एकदम चांगल्या परिस्थितीत मिळताना आपण बघितलेला आहे. त्यावर जोखिमेचा प्रीमियम लक्षात घेता एकूण 24 टक्के असावा. हे पण बघताना सरासरी मागील पाच वर्षांचे आकडे बघणे अपेक्षित आहे.   

4. डेट टू इक्विटी रेशिओ 1 पेक्षा कमी असावा

कंपनीची एकूण मत्ता ही पहिल्यांदा समजून घ्यावी. आणि त्या कंपनीने कर्ज किती घेतले आहे. एकूण मत्तेपेक्षा अधिक कर्ज घेतले असेल तर काही कमी जास्त झाले तर सगळे पैसे कर्ज परतफेडीतच खर्च होतील, गुंतवणूकदारांच्या हाती काही लागणार नाही. आणि दुसरे म्हणजे कर्ज अवाढव्य असेल तर जे पण काही विक्रीतून अर्थार्जन होतेय ते सगळे कर्ज फेडण्यातच जातील तर करोत्तर नफ्यासाठी काही उरणारच नाही आणि ते उरले नाही तर गुंतवणूकदारांसाठी काहीही राहणार नाही. म्हणजेच काय खूप कर्ज असेल तर कंपनीत गुंतवणे धोक्याचे आहे. तेव्हा डेट टू इक्विटी रेशिओ 1 पेक्षा कमीच असावा. आणि कर्ज कंपनी घेत असेल तर ते का घेते आहे, त्याची उपयुक्तता कुठे आहे हे सगळे बघणे महत्वाचे. 

5. प्राईस टू बुक व्हॅल्यू तसेच पीई बघणे 

एकूणच त्या सेक्टरचा पीई किती आणि आपल्या कंपनीचा पीई बघणे. सेक्टरपेक्षा कमी असल्यास प्रथमदर्शनी संधी समजावी, आपला समभाग बुक व्हॅल्यूच्या किती पटीने ट्रेड होतोय हे बघणे पण महत्त्वाचे. खूप जास्त पटीने ट्रेड होत असेल तर तो महाग असू शकतो. केवळ हे बघून निर्णय घेणे उचित नाही. पण निर्णयप्रक्रियेत याचा पण सहभाग असावा. 

पुढील प्रश्न हा असू शकतो की ही सगळी माहिती मिळेल कुठे? आणि हे सुद्धा मनात येत असेल की आम्ही कॉमर्सचे विद्यार्थी नाही. आम्हाला बॅलन्सशीट वाचणे समजत नाही. आम्ही गृहिणी आहे, आम्हाला हे कसे कळणार तर वॉरेन बफेट म्हणतात की केवळ पाचव्या वर्गाचे गणित येत असेल तरी सुद्धा हे आकडे आपल्याला समजू शकतात. हे सगळे आकडे मनी कंट्रोल या वेबसाईटवरुन, एनएसई, बीएसईच्या वेबसाईटवरुन आपण मिळवू शकतो. तेव्हा हे सगळे आकडे बघून एखादी कंपनी आपण निवडू शकतो. पण गुंतवणुकीचे एकच धोरण आणि मूलमंत्र की गुंतवणूक दीर्घावधीची असावी म्हणजे किमान 8 ते 10 वर्षाची असावी. जसे वर्षातून एकदा हेल्थ चेक अप करतात तसे एकदा सगळे आकडे बघून घ्यावे. काही अपवादात्मक कारणे असतील तर ठीक आहे पण आपल्या 5-6 तत्वांमध्ये या कंपन्या बसत नसतील तर त्यापासून दूरच राहावे. एखादा प्रयोग म्हणून एखाद्या कंपनीचा अभ्यास करुन बघा, बघा जमतंय का? अथवा पुढील भागात आपण एका उदाहरणासकट हे शकणार आहोत आणि समृद्धीला अजून जवळ आणणार आहोत. तोवर गुंतवणूक करा, फक्त जरा जपून.

हेही वाचा

BLOG : भाषा पैशाची : गुंतवणुकीची एबीसीडी आणि त्यापुढे.. 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Gold Silver Rate : चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24  आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
Embed widget