एक्स्प्लोर

कंजारभाट, खतना आणि आता फतवा...

आता उद्याच्या वर्तमानपत्रात कोणत्या नवीन फतव्यावर बातमी वाचायला मिळेल ठाऊक नाही. मात्र उद्याच्या वर्तमानपत्रावरचे साल 1802 असे वाचायला हरकत नाही.

आज साल 2018 म्हणजे 2020 ला फक्त दोनच वर्ष उरले. असं असतांना देखील आपल्या भारतात विविध समाजात रुढ असलेल्या परंपरेमुळे आपल्या संस्कृतीमुळे आपण प्रगत होतोय की परत 1802 सालात जातोय का, असा प्रश्न पडतो. सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना सहज एका बातमीवर लक्ष गेलं... ‘फतवा’.. बातमी वाचत असताना सोशल मीडियावर सुरु झालेल्या प्रथांविरुद्धच्या मोहिमांचा विचार मनात आला.. कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्त्रियांवर अत्याचार करणे आणि त्यांना प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली दडपणे हे रोजचेच झाले आहे. कधी बलात्कार तर कधी मारहाण तर कधी हुंडाबळी आणि हुंडा नाही मिळाला तर दिला जातो तोंडी तलाक. किंवा जात पंचायतने आपल्या जातींच्या परंपरेला तडा न जाऊ देण्यासाठी, त्यांच्या मागास विचारांचं समर्थन करण्यासाठी काढले जातात ते फतवे. आणि मग परत जो हजारो वर्षांपासून सुरु आहे तो लढा सुरु होतो. फक्त आता माध्यम बदले आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या जाता आहेत. त्यातली कौमार्यचाचणीच्या विरोधातली #StopVTest. कंजारभाट समाजातली ही प्रथा थांबवण्याची मोहिम फेसबुकच्या माध्यमातून छेडली आहे ती याच समाजातल्या तरुणाने. विवेक तामचीकर. विवेक लवकरच स्वतः लग्न करतोय, स्वतःपासूनच सुरुवात करत, त्याने लग्नानंतर पत्नी कौमार्यपरीक्षा देणार नाही असे निक्षून सांगितले आहे. या सगळ्या थोतांडाला त्याने ठाम नकार दिलाय. टाटा सामाजिक संस्थेमध्ये असलेला 26 वर्षांचा विवेक त्याच्या मतावर आणि भूमिकेवर ठाम आहे. विवेकने त्याच्याच समाजातल्या काही तरुण तरुणींच्या मदतीने ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचा भाग प्रजक्ता देखील आहे. प्रजक्ता स्वतः कंजारभाट समाजातली सुशिक्षित तरुणी.. तिला ही प्रथा मान्य नाही आणि म्हणून तिनेही या प्रथेच्या विरुद्धात आवाज उठवला आहे. आणि जात पंचांच्या विरोधात जाण्याचे धाडस दाखवले आहे. 2018 साल उजाडलं तरी कंजारभाट समाजाच्या पंचांना रक्ताचा डाग दाखवून सांगावं लागतंय की माल खरा आहे की खोटा. सगळ्यांच्या समोर या प्रश्नाला, या नवीन जोडप्याने, इतका खाजगी विषय का बोलावा.. आणि का सांगावं असा सवाल ही तरूण मंडळी करतायत.. कौमार्यचाचणी ही कंजारभाट समाजातली एक बुरसटलेली प्रथा.. तशीच बोहरी मुस्लिम समाजातली खातना ही प्रथा. स्त्रीला लैंगिक सुखापासून वंचित ठेवणारी ही प्रथा. इथे 7 ते 8 वर्षांच्या वयोगटातल्या मुलींचं क्लिटोरिस म्हणजे योनीमध्ये लघवीच्या जागेच्यावर एक फुगीर भाग ब्लेड किंवा चाकूच्या सहाय्याने कापला जातो.. हे  सगळं घडत असतांना ती लहान कोवळ्या वयातली मुलगी घाबरते, ओरडते , किंचाळते आणि वेदना सोसत खूप रडते. लैंगिक सुखाचा विचार करता स्त्रीमध्ये क्लिटोरिस खूप महत्वाची भुमिका बजावते आणि बोहरी समाजाची खातना ही प्रथा याच गोष्टीवर आघात करते. पण हा आघात करणारी त्या मुलीच्या सगळ्यात जवळची व्यक्तीच असते.. तिची आई, आजी, काकू किंवा मावशी.. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं सुख लहानपणीच हिरावू घेते.. इतक्या लहान वयात शरिराला इजा होतेच, पण मनावर होणारा आघात हा कित्येकपटीने मोठा असतो.. तो आघात या मुली कशा झेलत असतील. याच प्रथे विरुद्ध, स्त्रियांच्या सुखावर होणाऱ्या या आघातच्या विरोधात  बोहरी समाजातल्याच स्त्रिया पुढे आल्या आहेत. END FMG या पेटिशनवर सह्या घेण्याची मोहिम सुरू केली आहे. अशा अनेक प्रथा देवाच्या नावाने, परंपरेच्या नावाने, धर्माच्या नावाने किंवा अगदी धर्मग्रंथाच्या नावाने समाजात अजूनही खोलवर रुजल्या आहेत.. त्या मुळापासून उखडून टाकायला किती वर्ष लागतील हे कोणालाच माहित नाही.. कंजारभाट, खतना आणि आता फतवा... पण पितृकसत्ताक आपल्या समाजात स्त्रियांना मानसिक , शारिरीक चळाला सामोरे जावं लागतं.. स्त्रीच्या शरिरावर, तिच्या मनावर हक्क मिळवता आला नाही म्हणून स्वतःचा राग त्या स्त्री अॅसिड फेकून तिला विद्रूप करून काढणे.. अशा अनेक मुलींच्या अंगावर अॅसिड फेकून त्यांना विद्रूप केलेली उदाहरण आहेत.  राग अनावर झाल्याने त्या पुरुषाला, न जात दिसते, ना धर्म.. त्यामुळे ही मुलगी लक्ष्मी असते, सरिता असते, रुबिना रझिया किंवा स्विटी ही असते. अशाच आपल्यातलीच एक लक्ष्मी.. जिच्या चेहऱ्यावर दिल्लीतल्या रसत्यावर दिवसा तेजाब फेकलं गेलं होतं..पण लक्ष्मी हिम्मतीने सहन करत मरणाला झुंझदेत स्वतःच्या पायावर उभी आहे.  या किंचाळ्या .. कोणी मदतीला नं येण.. मग त्या असहाय्य करणाऱ्या वेदनांशी झुंझत जगणं.. हे सगळं थांबवण्यासाठी लक्ष्मीने मोहीम सुरू केली.. बाजारात सहज तेजाब मिळतं.. जर हे बंद झालं तर.. म्हणून #BanAcidSale ही मोहीम सुरु केली.. हे सगळं मनात येण्याचं कारण म्हणजे अगदी सुरुवातीला सांगितलेली ती मूळ बातमी.. ‘फतवा‘.. एका इंग्रजी वर्तमानपत्रातल्या तिसऱ्या चौथ्या पानावरची ही छोटीशी बातमी. मथळा होता- ‘MALE VENDORS CAN’T HELP YOU TRY ON BANGLES : DARUL FATWA TO WOMEN’ आता हा कोणता नवीन फतवा म्हणून बातमी वाचू लागले.. म्हणे दारुल उलूम  नावाच्या एका मुस्लिम मुलींच्या शाळेने हा फतवा काढला होता. त्यात कोणत्याही मुस्लिम स्त्रीने परपुरुषाकडून बांगड्या भरणे वर्ज्य करण्यात आलं होतं.. का तर म्हणे त्या घालताना एका परपुरुषाचा हात तुमच्या मनगटाला लागतो.. स्वतःच्या हाताने घालाव्यात.. म्हणजे परपुरुषाकडून बांगड्या विकत घेणे चालणार होतं.. चला निदान विकत घेण्यावर बंधन घातले नव्हते. बरं साधारणत: या काचेच्या बांगड्या विकणारे अनेकदा मुस्लिम चाचाच असतात.. आता उद्याच्या वर्तमानपत्रात कोणत्या नवीन फतव्यावर बातमी वाचायला मिळेल ठाऊक नाही. मात्र उद्याच्या वर्तमानपत्रावरचे साल 1802 असे वाचायला हरकत नाही.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
ABP Premium

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case :  115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget