एक्स्प्लोर

शेअर्समध्ये गुंतवणूक : आता धाडस कराच

थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार दीर्घकालीन सतत केलेल्या गुंतवणुकीतून नक्की संपत्तीरुपी तळे साचेल. आपण चुकतो ते या बाजाराला लॉटरीचं तिकीट समजून किंवा अल्पकाळात धनाढ्य होण्याविषयी चुकीचे स्वप्न उराशी बाळगून कोणत्याही गुंतवणुकीतून अल्पकाळात धनवान होणं हे शक्य नसलं तरी, अपेक्षित नाही. संपत्ती निर्माण ही प्रक्रिया आहे. आंब्याचे झाड कोय लावल्यापासून आंबे लागेपर्यंत होणाऱ्या दीर्घकालीन प्रक्रियेचा भाग आहे.

आपल्या उत्पन्नातून दैनंदिन खर्च केल्यातून उरते ती बचत. आपल्यापैकी सर्वांनाच थोडीफार बचत करता येते. या बचतीला गुंतवणूक समजणे योग्य नाही. बचतीचे गुंतवणुकीत रुपांतर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. इतकी वर्षं आपल्यासाठी गुंतवणुकीची साधने म्हणजे बँकेची मुदत ठेव, पोस्ट ऑफिस, सोनं किंवा करबचतीसाठी विमा, पी. पी. एफ इतकीच होती. सध्या बँका आणि पोस्टाच्या योजनांवरील व्याजाचे व्याजाचे दर सतत घसरत आहेत. यामुळे गुंतवणुकीतून येणारा परतावा कमी होत आहे. तसंच या योजनांवरील व्याज हे करपात्रदेखील आहे. अशा परिस्थितीत याला पर्याय काय? अशी विचारणा होत आहे. शेअरबाजार चांगले रिटर्न्स देतो, पण त्यात जोखीम आहे. यात संपत्ती कमावणाऱ्यांपेक्षा गमावणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. 25 वर्षांपूर्वी भारतातील शेअरबाजार पारदर्शक नव्हता, संगणकीकरण झालेले नव्हते, बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था अस्तित्वात नव्हत्या, परदेशी गुंतवणूकदार आणि रेटिंग एजन्सीज यांचे लक्ष नव्हते. अशा वेळी ही गुंतवणूक म्हणजे नक्कीच जोखीम होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. घरबसल्या शेअरबाजारात गुंतवणूक करणे आता शक्य आहे. कंपन्यांची माहिती हाताच्या बोटांवर उपलब्ध होत आहे. बाजारावर अनेक जणांचे नियंत्रण आणि लक्ष आहे. मग का नाही करायचा या पर्यायाचा विचार? तीन पथ्य पाळलीत तर ही उत्तम गुंतवणूक होऊ शकते. एक योग्य माहितीच्या आधारावर कंपन्यांची निवड, दोन अति लोभ आणि हाव यापासून दूर राहणे आणि तीन बाजारातील चढउताराने भयभीत न होणे. या त्रिसुत्रीचा आधार घेत दीर्घकालीन गुंतवणूक टप्प्याटप्प्यानं करणे शक्य आहे. शेअर बाजार घसरला तर ती सुवर्णसंधी मानून चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करुन शांत बसणे सर्वात महत्त्वाचे आहे. हे जमत नसेल तर एक उपाय सांगतो. एखादे चांगले क्षेत्र म्हणजे बँका, ऑटोमोबाईल, कंझ्युमर ड्युराबल, फार्मा यातील दिग्गज कंपन्यांतील एक किंवा दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये दर महिन्याला ठराविक दिवशी ठराविक रकमेत जितके शेअर्स येतील ते घेत जाणे. असे करताना शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे. कंपनीचा भाव काहीही असो, शेअर्स घेतले गेलेच पाहिजेत. सलग तीन ते पाच वर्षं जर हे व्रत पाळले, तर त्यातून संपत्ती निर्णाण होऊ शकेल. यामध्ये कंपनी जर चांगली असेल तर नुकसान होणे अशक्य आहे. तीन ते पाच वर्षांनंतर आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेऊन पुढील मार्गक्रम ठरवा. एक प्रकारे SIP सारखीच ही योजना आहे. मात्र भय आणि हाव यापासून दूर राहून सातत्यानं दर महिन्याला गुंतवणूक करणे अत्यंत जरुरीचे आहे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार दीर्घकालीन सतत केलेल्या गुंतवणुकीतून नक्की संपत्तीरुपी तळे साचेल. आपण चुकतो ते या बाजाराला लॉटरीचं तिकीट समजून किंवा अल्पकाळात धनाढ्य होण्याविषयी चुकीचे स्वप्न उराशी बाळगून कोणत्याही गुंतवणुकीतून अल्पकाळात धनवान होणं हे शक्य नसलं तरी, अपेक्षित नाही. संपत्ती निर्माण ही प्रक्रिया आहे. आंब्याचे झाड कोय लावल्यापासून आंबे लागेपर्यंत होणाऱ्या दीर्घकालीन प्रक्रियेचा भाग आहे. तेव्हा नव्या युगातील नव्या वाटांवर आज आपण जात असताना शेअर्ससारख्या पर्यायाचा विचार आपण केला पाहिजे. दर तीन महिन्यांनी सर्व कंपन्या आपला तिमाही जमाखर्च प्रकाशित करतात. त्यातून कंपनीची वाटचाल कशी चालू आहे हे कळण्यासाठी मोठ्या ज्ञानाची आवश्यकता नाही. कंपनीची उलाढाल, नफा, कर्जे, देणी, आणि येणी यावर नजर ठेवली तरी आपली गुंतवणूक सुरक्षित आहे ना हे सर्वसामान्यांनाही कळू शकेल. शेअर्समधील गुंतवणूक ही त्या कंपनीच्या व्यवसायातील गुंतवणूक असते. जो व्यवसाय नफा मिळवून देतो आहे, अशा कंपन्यांचे शेअर्स चांगला भाव मिळवून देतात. हे सगळं वाचून देखील हिंमत होत नसेल तर मात्र म्युच्युअल फंडाची इक्विटी योजना आपल्याला चांगला परतावा देऊ शकेल. त्याविषयी पुन्हा कधीतरी.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget