एक्स्प्लोर

BLOG | एक आर्त हाक मदतीची...

एफबीवर कमी होतो कारण एका जिव्हाळ्याच्या प्रश्नात गुंतून पडलो होतो. अर्थातच देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. हा त्यांच्यासाठीचा सर्वाधिक भयंकर काळ आहे तेव्हा त्यांच्यासाठी शक्य ते करणं हे सर्वाधिक प्राधान्यतेचं काम झालं. सध्या आपण सगळेजण रोज सकाळी बाहेर पडून आवश्यक ती खरेदी करू शकतो आणि वेळेत घरी परत येऊ शकतोय. मात्र या बायकांकडे ना पैसे ना घर!

एफबीवर कमी होतो कारण एका जिव्हाळ्याच्या प्रश्नात गुंतून पडलो होतो. अर्थातच देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. हा त्यांच्यासाठीचा सर्वाधिक भयंकर काळ आहे तेव्हा त्यांच्यासाठी शक्य ते करणं हे सर्वाधिक प्राधान्यतेचं काम झालं. सध्या आपण सगळेजण रोज सकाळी बाहेर पडून आवश्यक ती खरेदी करू शकतो आणि वेळेत घरी परत येऊ शकतोय. मात्र या बायकांकडे ना पैसे ना घर! करोना व्हायरसची तीव्रता वाढली तसा यांना सर्वात अधिक फटका बसला, फेब्रुवारीएन्ड पासून यांची ओढाताण सुरु झाली आणि आता त्या कंगाल अवस्थेत आहेत. रोजच्या कमाईवर जगणाऱ्या इतर अनेक घटकांप्रती समाजात सहानुभूती आहे. मात्र, यांचं असं नाही. बाकीच्या सर्व घटकांना समाजात थोडंफार स्थान आहे, मान आहे, आदर आहे यांच्या वाट्याला मात्र तिरस्कार आणि हेळसांड आहे. या बायका देखील हाडामांसाच्या माणूसच आहेत हा दृष्टिकोन काही केल्या आपण स्वीकारायला तयार नाही. त्याचा अत्यंत भयावह फटका आजघडीला यांना बसतो आहे. अनेक नोकरदार लोक, चाकर वर्ग आपआपल्या गावी निघून गेलेत. मात्र, ज्यांना आपल्याच घरादाराने सडण्यासाठी सोडलं त्यांनी कुठे जायचं? मागच्या आठवड्यात एकाने मेसेंजरमध्ये विचारलेलं,"काय गायकवाड या बायकांवर करोनाचं संक्रमण झालं तर काय करणार? त्यांच्यासाठी काही लिहिणार की नाही?" प्रश्न कुत्सित होता. विचारणाऱ्या सन्माननीय व्यक्तीचा हेतू मला खिजवण्याचा होता. असेना का! या निमित्ताने त्यानेही हे मान्य केले की या बायकांसाठी हा माणूस काम करतो! असा मी एकटाच नाही कित्येकजण आहेत. जे यांच्यासाठी जमेल ते करायला तयार आहेत. असो. तर, जेव्हा करोनाची साथ आली तेव्हा या आपल्या तोंडाला मास्क बांधू शकल्या नाहीत कारण तुम्हाला ठाऊक आहेच! आता सोशल डिस्टन्सिंगविषयी बोललं जातंय. मात्र, आता यांच्याकडे कुणी येतच नाही तेव्हा यांनी कुणापासून अंतर राखायचं? आणि कुणी आलंच तरी या त्याला नकार तरी कसा देणार? कारण पोटाची आग फार वाईट असते. नवीन नवीन एचआयव्हीची लागण वेगात पसरू लागली होती. तेव्हा अवघ्या काही रुपड्यासाठी जीवाची रिस्क घेण्याशिवाय यांच्यापैकी अनेकींकडे तरणोपाय नव्हता. आताही स्थिती तशीच होती. लॉकडाऊनने ती अधिक बिकट झाली, अर्थात हे त्यांच्या भल्यासाठीच आहे. मात्र, त्यांच्या पोटाची सोय कशी लागणार? जे कुणाच्याच खिजगणतीत नाहीत त्यांच्यासाठी कोण विचार करणार? अनेकांना तर ही घाण गेलेली बरी असे नेहमी वाटत असते. असो.. सरकारने गरीब वर्गातील लोकांसाठी नुकतीच योजना जाहीर केलीय. मदतीचे हे पैसे बहुत करून संबंधित खातेधारकाच्या थेट बँकखात्यात जाणार आहेत. मात्र, या बायकांपैकी तब्बल निम्म्याहून अधिक बायकांची बँक खाताच नाहीत. कारण खातं उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे यांच्याकडे नाहीत. निम्म्याहून अधिक बायकांकडे ओळख सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत. अशांची नावे कोणत्याही मतदार यादीत नसल्याने कदाचित यांचे राजकीय मूल्य शून्य असावे. ज्यांची कोणत्याही यादीत नावे नाहीत, ज्यांच्याकडे बँक खाती नाहीत, सरकारी कागदपत्रे नाहीत आणि समाज व सरकार यांच्या लेखी ज्यांना कसलेही स्थान नाही त्यांच्याकडे मदत कशी पोहोचणार हा प्रश्न कासावीस करणारा आहे. या बायकांचे व्यवहार रोखीने होतात. पैसे यांच्याकडेच असतात. निम्म्याहून अधिक बायकांकडे महिनाभर पुरेल इतकी रोकड असते. मात्र, आता महिना उलटून गेल्याने त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार ठरलेले आहेत. एरव्ही पैशाची निकड भागवायची असेल तर या बायका उसनवारी करतात, सावकारी कर्जे घेतात. ही मदत वा कर्जे कोण देतं? तर यांच्या मालकिणी वा दलाल लोक यांच्याकडून मदत मिळते. अर्थात त्याची फार मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. आता तर ते ही रस्ते बंद झालेत. कारण अशा वेळी ही माणसं अंडरग्राउंड होणं पसंत करतात. या बायकांचे मोठे दुर्दैव हे असतं की एरव्ही यांच्या पैशावर घरे चालतात. आपल्या गावी, घराकडे या ठराविक रक्कम नेहमी पोहोच करत असतात, मात्र, आता कठीण काळी यांचे आप्तेष्ट देखील यांच्यापासून तोंड फिरवतात. मग या कुठे जाणार? जरी एखादी बाई गावी गेलीच तर ती आधीच आयसोलेट झालेली असते आता तर ती बहिष्कृत केली जाऊ शकते. कारण आधीच वेश्या आणि त्यातही शहरातून आलेली म्हटल्यावर तिच्यासाठी कोण आपल्या गावाची पाणंद खुली ठेवेल? हे चित्र फारच विदारक आहे आणि मुख्य म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. लेख लिहीपर्यंत सांगली, मिरज, सोलापूर, गुलबर्गा येथील पंचवीस टक्के बायका कुणाच्या ना कुणाच्या घरी निघून गेल्या आहेत. तर मुंबई (कामाठीपूरा), पुणे (बुधवार पेठ), नागपूर (गंगा जमुना) या मेट्रो शहरातील अवस्था वाईट आहे. या बायकांना वेळीच सावध होता आलं नाही. या अक्षरशः भेदरून गेल्या आहेत. नोटबंदीच्या काळात यांचे खाण्याचे वांदे झाले होते आता तर जगण्याचे वांदे झालेत. यांच्याहून महाभयंकर अवस्था हायवेवर सेक्स ट्रॅफिकिंग करणाऱ्या बायकांची झाली आहे. राज्यातील मुंबई पुणे हायवे वगळता सर्व मुख्य हायवेवर या बायका आहेत. यांची ठिकाणे लनाक्यालगतच्या गावांवरचे ढाबे होत. आता हायवे बंद झालेत, ढाबे बंद झालेत. हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या कमी बायकांशी संपर्क होऊ शकलेला आहे. बाकीच्यांची काय हालत झाली आहे कळायला मार्ग नाही. यांना कुणी घरी नेऊ शकत नाही की कुठे आणून ठेवू शकत नाही. बायकांचे पत्ते स्थानिक पोलीस यंत्रणांना नक्कीच ठाऊक असतात. या भीषण काळी पोलीस यंत्रणेवर आलेला महाभयानक ताण पाहू जाता त्यांच्याकडून काय काय अपेक्षा कराव्यात यास मर्यादा येतात. काही एनजीओंनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, एकुणात त्यांची हाक खूप कमी स्त्रियांच्या कानी जाईल इतकी कमकुवत आहे. काही ठिकाणी, स्पेसिफिकली मिरज आणि पुण्यात काही लोक यांना व्यक्तिशः मदत करत आहेत मात्र गरजू स्त्रियांचे प्रमाण पाहता ती मदत अत्यंत तोकडी आहे. इथे येणारी सर्वात मोठी अडचण ही आहे की या बायकांची खरी नावे, खरे पत्ते केवळ यांचे नातलग, अड्डेवाल्या मालकिणी, दलाल यांनाच ठाऊक असतात. ज्या स्त्रिया पोलीस रेडमध्ये पकडल्या जातात त्यांची नावे रेकॉर्डवर येतात त्यामुळे तितक्याच स्त्रियांची खरी नावे यंत्रणेकडे असतात. मात्र, यातून नवी समस्या उद्भवते ती अशी की रेड पडून पकडली गेलेली बाई जेंव्हा बाहेर येते तेंव्हा ती मूळ जागी धंदा करायला न जाता अन्यत्र जाते. ती गेली नाही तर बळजोरीने तिची रवानगी केलीच जाते. त्यामुळे कोणती स्त्री कुठे धंदा करते आहे हे शोधणे धान्याच्या राशीत सुई शोधण्यासारखे आहे. यामुळे यांची यादी बनवणे, कागदपत्रे देणे सहज शक्य होत नाही. अनेक बायका पुढे येत नाहीत कारण आपलं नाव पत्ता कळला तर सरकारी यंत्रणा त्याचा आधार घेऊन भविष्यात पिळवणूक करेल ही भीती त्यांना रोखते. इकडे आड तिकडे विहीर आणि जिथे आहे तिथे उपेक्षेचा आगडोंब अशा संकटात या बायका सापडल्या आहेत. शोषणाचं मूर्तिमंत प्रतिक असलेला हा घटक तुमच्या सहानुभूतीची वाट पाहतो आहे. आज घडीला यांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की हा लेख अधिकाधिक शेअर करावा. प्रत्येक जिल्ह्यातील, शहरातील यंत्रणेपर्यंत हा लेख पोहोचला तर त्यांचे देखील हृदय द्रवेल. सरकारी यंत्रणा यांना अपवाद मानून मदत करतील. कागदाचा आग्रह न धरता जमेल ती मदत करतील. या बायकांसाठी आम्ही काही करू शकतो का असं तुमच्यापैकी अनेक जण मला विचारत असता हे मी वेळोवेळी मांडले आहे. आज साश्रूपूर्ण नयनांनी हात जोडून मी आपणास विनंती करत आहे की आज तुम्ही हा लेख शेअर करा. यांची आर्त हाक सरकारपर्यंत पोहोचवा. सरकार जमेल ती सर्व मदत करते आहे, मला खात्री आहे की आपला आवाज बुलंद झाला तर या बायकांच्या जगण्याचा प्रश्न निकालात निघेल. या कठीण काळी तुमच्या या मदतीची खूप गरज आहे. मला खात्री आहे, की माझ्या आवाहनाला तुम्ही नक्की प्रतिसाद द्याल. या शोषित घटकास मदतीचा हात द्यावा अशी सर्व शासकीय यंत्रणेस तळमळीची विनंती आहे. आशा करतो की हा तिढा नक्की सुटेल. माझ्या या वंचित माताभगिनींचा दुवा तुम्हाला नक्कीच लाभेल.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
Mahanagarpalika Election 2026 BJP: मोठी बातमी: समोरच्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला अन् भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला, मतदानापूर्वीच कमळ गुलालाने न्हाऊन निघालं
मोठी बातमी: समोरच्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला अन् भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला, मतदानापूर्वीच कमळ गुलालाने न्हाऊन निघालं
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
BMC Election 2026: मतदानापूर्वीच भाजपचे 3 उमेदवार जिंकले पण मुंबईतील 'या' वॉर्डात उमेदवार बाद, शिंदेसेनेच्या उमेदवारालाही झटका
मतदानापूर्वीच भाजपचे 3 उमेदवार जिंकले पण मुंबईतील 'या' वॉर्डात उमेदवार बाद, शिंदेसेनेच्या उमेदवारालाही झटका
Embed widget