एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

लोकमान्यांनी याचसाठी केला होता का अट्टाहास?

टोलेजंग गणेशमूर्तींमुळे दुर्घटनाच्या घटनांही दरवर्षी समोर आल्या आहेत. 2014 मध्ये मुंबईत काळबाईदेवी गणेशोत्सव मंडळाची 12.5 फूट मूर्ती कोसळल्याची घटना घडली होती. तर 2015 मध्ये हैदराबादमध्ये गणेशमूर्ती अंगावर कोसळून काहीजण जखमी झाले होते. गेल्या वर्षी हैदराबादमधूनही अशीच एक घटना समोर आली होती. या घटनेत विसर्जनासाठी निघालेली बाप्पाची मूर्ती कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. गेल्यावर्षी उल्हासनगरमध्ये टोलेजंग गणेशमूर्तीवर विजेची तार पडून दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला होता. पण तरीही गणेश भक्तांनी यातून हवा तो बोध घेतलेला नाही.

फेसबुकवर नुकतीच एका मित्राने गणेशोत्सवानिमित्त एक पोस्ट टाकली होती. यातून त्याने आगामी गणेशोत्सवासाठी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन, पक्षविरहित गणेशोत्सव समिती स्थापन करण्यासंदर्भात आवाहन केलं होतं. संकल्पना चांगली होती. त्यावरुनच एक नवी कल्पना सुचली, अन् त्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली, की यंदाचा गणेशोत्सव प्रदुषणमुक्त साजरा करा! पण काही कार्यकर्त्यांना ती पोस्ट खटकली. त्यावरुन त्यांची अपेक्षित आगपाखड सुरु झाली. पण मी जो मुद्दा मांडत होतो, त्यावर कुणाची ऐकून घेण्याचीच मनस्थिती नव्हती.

कारण मला वाटतं की, गणेशोत्सव साजरा करताना त्यातलं ओंगळवाणं प्रदर्शन कमी व्हायला पाहिजे. त्यासाठी सर्वात आधी गणेशमूर्तींच्या उंचीवर बंधन आली पाहिजेत. मी स्वतएक मूर्तिकार असल्याने टोलजंग मूर्ती बनवताना मूर्तिकाराला काय आग्निदिव्य पार करावं लागतंहे चांगल्यानं माहिती आहे. किमान 12 फूटाचा गणपती बनवायचा झाला, तर त्या मूर्तीच्या अंगाखांद्यावर चढून मूर्तीकाराला काम करावं लागतं. विशेष म्हणजे, काही कारागीर तर तिथेच सिगरेटचे धुरके ओढतात, पान खाऊन त्याच्या पिचकाऱ्या मारतात. आणि गणपतीच्याच दिवशी आपण त्याच मूर्तीची मनोभावे पूजा करतो. मग तिथं त्या मूर्तीची विटंबना होत नाही का?

मुंबईतलं टोलेजंग गणेशमूर्तींचं प्रस्थ काही नवीन नाही. कारण का तर इथं विसर्जनाची व्यवस्था आहे. म्हणून गणेश मंडळांमध्ये मूर्तीसाठी चढाओढ असते. पण आता ही चढाओढ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फोफावत आहे. यात त्या गावात गणेशमूर्तींची विसर्जनाची व्यवस्था नसतानाही, केवळ व्यक्तीगत खुन्नस काढण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मोठमोठ्या टोलेजंग गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करत आहेत.

पण या अशाच टोलेजंग गणेशमूर्तींमुळे दुर्घटनाच्या घटनांही दरवर्षी समोर आल्या आहेत. 2014 मध्ये मुंबईत काळबाईदेवी गणेशोत्सव मंडळाची 12.5 फूट मूर्ती कोसळल्याची घटना घडली होती. तर 2015 मध्ये हैदराबादमध्ये गणेशमूर्ती अंगावर कोसळून काहीजण जखमी झाले होते. गेल्या वर्षी हैदराबादमधूनही अशीच एक घटना समोर आली होती. या घटनेत विसर्जनासाठी निघालेली बाप्पाची मूर्ती कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. गेल्यावर्षी उल्हासनगरमध्ये टोलेजंग गणेशमूर्तीवर विजेची तार पडून दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला होता. पण तरीही गणेश भक्तांनी यातून हवा तो बोध घेतलेला नाही.

collapse-of-hindu-idol-ganesh 1

बरं...दहा दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर विसर्जनावेळी तर त्याचं पावित्र्य राखलं जाईल, असं वाटत असताना तिथंही उल्हास. कारण एकदा का गणेश मूर्ती

पाण्यात विसर्जित झाली की, लगेच त्यावर काही अतिउत्साही कार्यकते मूर्ती पाण्यात जाण्यासाठी, त्यावर उभे राहून थयथयाट सुरु करतात.

लोकमान्यांनी याचसाठी केला होता का अट्टाहास?

मग अशावेळी बेंबीच्या देठापासून ओरडणारे हिंदुत्ववादी कार्यकर्ते शांत का राहतात. गणरायाचं पावित्र राखलं पाहिजे, असं यांना वाटत नाही काज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केली, त्यांनाही या सर्व प्रकाराची लाज वाटत असावी.

कारण ज्या उद्दात्त हेतून लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्याला हारताळ फासण्याचं काम आजच्या तथाकथित गणेश मंडळांकडून होत आहे.

काही शहरांमध्ये तर गणरायाच्या आगमनापेक्षा त्याच्या निरोपाचीच गणेशभक्तांना ओढ लागलेली असते. कारण का..? तर त्या दिवशी उंचच्या उंच डॉल्बी लावून नंगानाच करता येतो. किंवा पारंपरिक वाद्यांची झुल पांघरुन 100-200 ढोल बडवत हवं ते केलं जातं. म्हणजे, यांच्यासाठी गणेशोत्सव हा उत्सव नाही, तर स्वत:ची एन्जॉयमेंट पूर्ण करण्यासाठी सुरु असलेला, नंगानाचच म्हणावा लागेल. त्यामुळेच लोकमान्य टिळकांनीही याचसाठी अट्टाहास केला होता काअसा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्रABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठरावBaba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढाव

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
Embed widget