एक्स्प्लोर

Joram : प्रेश्रकांना जागवणारा व्हिडीओ कॉल

Joram (2023) :  फ्रेंच फिलॉसॉफर मायकेल फुको यांचं एक पुस्तक आहे. Discipline and Punish: The Birth of the Prison (1975). या पुस्तकात फुको यांनी सर्व्हेलेन्स अर्थात टेहाळणी किंवा पाहणीची संकल्पना स्पष्ट केलीय. क्रिमिनोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी यातली सर्व्हेलेन्सची संकल्पना महत्त्वाची ठरलीय. तुरुंगातली टेहाळणी आणि नंतर आलेल्या सीसीटीव्हीच्या सर्व्हेलेन्समुळं गुन्हेगार आणि त्यावर पाळत ठेवणारी व्यक्ती दोघं सतर्क होतात. गुन्हे नियंत्रण करण्यासाठी मदत होते. असं पोलीस यंत्रणाचं म्हणणं आहे. 

हे झालं कुणीतरी पाहणी करत असतानाचं. पण हा कॅमेरा जेव्हा उलटा फिरतो. सेल्फी मोडमध्ये येतो. तेव्हा नक्की काय होतं? सेल्फी हा त्या व्यक्तीचा ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ बनतो. मोबाईल स्क्रिनमध्ये आपण स्वत:ला पाहात असतो. त्यातून आपल्या स्क्रिनमध्ये दिसणाऱ्या गोष्टींवर दृष्टीकोन तयार होतो. म्हणजेच सेल्फी ही व्यक्तिनिष्ठ असते. मायकेल फुकोच्या शब्दात सांगायचं म्हणजे ते सेल्फ सर्व्हेलेन्स आहे. तो सबजेक्टीव्ह ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ म्हणजेच स्वत:च स्वताचं केलेलं निरिक्षण, पाहणी आहे. सेल्फी सोशल मिडीयावर टाकतो तेव्हा आपली व्यक्तिनिष्ठ इमेज जगाला दाखवतो. पाहणारा या फ्रेममध्ये दिसणाऱ्या गोष्टींबद्दल आकलन करतो. त्यानुसार आपलं मत बनवतो. म्हणजे सेल्फीच्या माध्यमातून आपण समोरच्याला आपल्या ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ मध्ये शिरकाव करण्याचा वाव देतो.  

दिवाशिष मखिजाचा 'जोराम' (2023) सिनेमा नुकताच रिलीज झाला. यातलं मुक्ता (राजश्री देशपांडे) हे पात्र नेहमी व्हिडीयो कॉलमार्फत दिसतं. ती आपला नवरा, रत्नाकरला (मो. झिशाम अयूब) कॉल करतेय. रत्नाकर पोलीस दलात अधिकारी आहे. पहिल्यांदा या सेल्फी मोडच्या व्हिडीओ कॉलचे संदर्भ लक्षात येत नाहीत. या कॉल्सची फ्रिक्वेन्सी वाढते, हळूहळू प्रेक्षकांना समजायला लागतं. शहरातली जाती व्यवस्थाही  प्रखर आहे. पोलीस खात्यातही ती असते. रत्नाकर एक दलित पोलीस अधिकारी आहे. त्याचे वरिष्ठ अधिकारी सवर्ण आहेत. या व्यवस्थेतून रत्नाकरची नेहमीच अतिरिक्त ड्युटी लागते. तो ड्युटी सोडून घरी जाऊ शकत नाही. छत्तीसगडमधून आलेला, मिडियात दिसलेला ‘नक्षली’, दसरूचा (मनोज बाजपेयी) शोध घेण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात येते. नक्षल प्रभावित राज्यात पाठवलं जातं. हे सर्व घडत असताना मुक्ता मध्ये-मध्ये त्याला व्हिडीओ कॉल करतेय. 

हा व्हिडीओ कॉल संवाद जेव्हा घडतो, तेव्हा तो प्रेक्षकांना अधिकाधिक विचार करायला लावतो. अस्तव्यस्त आणि अनेक प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर असलेली मुक्ता आणि तिच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नसलेला रत्नाकर. हे दोन्ही पात्रं जोराम सिनेमाची मध्यवर्ती पात्रं नाहीत. सिनेमा दसरुची गोष्ट सांगतो. संपूर्ण कथानकात मुक्ता व्हिडिओ कॉलवर आहे. ती ही फक्त अर्ध्या एक मिनिटांसाठी. मुक्ताची कथानकातली ही छोटी जागा भारताच्या जातीव्यवस्थेवर भाष्य करते. थेट शब्दात नाही. ते प्रेक्षकांच्या विचारांना हात घालते. त्याची थॉट प्रोसेस अॅक्टिव्ह करते. जोराम सिनेमाची ही जमेची बाजू आहे. 

देवाशिष मखिजा आपल्या सर्वच सिनेमात मोबाईल व्हिडीओ कॉल आणि सेल्फी मोडचा वापर करतो. त्याची अगली बार (2015) ही सात मिनिटांची शॉर्ट फिल्म पूर्णपणे व्हिडीओ कॉलचीच आहे. शिवाय तांडव (2016) आणि आज्जी (2017)  या त्याच्या सर्वात गाजलेल्या सिनेमांमध्ये तो सेल्फी मोड किंवा व्हिडीओ कॅमेराचा टूल म्हणून वापर करतो. हा मोबाईल कॅमरा त्याच्या कथानकाचा महत्त्वाचं पात्रं बनते.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar : पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
Walmik Karad surrender: अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEOWalmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar : पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
Walmik Karad surrender: अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
वाल्मिक कराड शरण आला नसता तर..., पोलीस अन् सीआयडीच्या कामावर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
वाल्मिक कराड शरण आला नसता तर..., पोलीस अन् सीआयडीच्या कामावर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांची एमएच 23 BG 2231 गाडी, सीआयडीच्या कार्यालयात शिरण्यापूर्वी काय काय घडलं?
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांची एमएच 23 BG 2231 गाडी, सीआयडीच्या कार्यालयात शिरण्यापूर्वी काय काय घडलं?
Embed widget