एक्स्प्लोर

BLOG : तो आला, तो लढला अन् त्यानं जिंकलं!

Lionel Messi Story : ...म्हणतात की मनापासून पाहिलेली आणि जीवापाड मेहनत घेतलेली स्वप्न पूर्ण होतात...असंच काहीसं 18 डिसेंबर 2022 रोजी फुटबॉल जगतात झालं...जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाचा सर्वात प्रसिद्ध खेळाडू फुटबॉलपटू लिओनल मेस्सीनं (Lionel Messi) फिफा विश्वचषक उंचावला... फायनलच्या सामन्यात अर्जेंटिना संघानं फ्रान्सला मात देत फिफा वर्ल्ड कप 2022 आपल्या नावावर केला...विशेष म्हणजे 35 वर्षीय मेस्सीच्या निवृत्तीच्या चर्चा असल्यानं त्याचा हा अखेरचा विश्वचषक होता. जो त्यानं जिंकत आपल्या फुटबॉल कारकिर्दीतील एक मोठं स्वप्न पूर्ण केलं... पण हा इतिहास लिहिणारा मेस्सी याचा इथवरचा प्रवास तितकाच खडतर होता. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी एका गंभीर आजारानं त्याला ग्रासलं होतं. पण त्यावरही मात करत मेस्सी फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट बनला... क्लब फुटबॉल गाजवून अर्जेंटिनाला जागतिक फुटबॉलमध्ये अव्वल दर्जाचा संघ बनवण्यापासून विश्वचषक विजयापर्यंतच्या मेसीच्या प्रवासावर एक नजर फिरवू...

लिओनल मेस्सीचा जन्म 24 जून, 1987 रोजी अर्जेंटिनाच्या रोजारियो येथे झाला. आई-वडिल दोघेही नोकरी करत असल्याने मेस्सी अधिक काळ त्याची आजी सेलियासोबतच असतं. अगदी लहान वयापासून फुटबॉलची आवड असणाऱ्या मेस्सीच्या ट्रेनिंगसाठी त्याच्या सोबत त्याची आजीच असतं. 4 वर्षाचा असताना वडिलांच्या प्रशिक्षणाखालीच मेस्सीनं फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. मग 6 वर्षाच्या वयात मेस्सी रोजारियो येथील न्यू-ओल्ड बॉईस क्लबमध्ये सामिल झाला. पण काही वर्षातच अवघ्या वयाच्या 10 व्या वर्षी मेस्सीला 'ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी' या गंभीर आजारानं ग्रासलं...

बार्सिलोना संघ आता मदतीला धावून...

मेस्सीला झालेल्या या आजारात व्यक्तीची शाररिक वाढ खुंटते. त्यात या आजाराच्या उपचाराचा खर्चही भरपूर असल्यानं मेस्सीची फॅमिली चिंतेत पडली. काही महिने खर्च त्यांना उचलता आला, पण नंतर मात्र सर्व आवाक्याबाहेर जाऊ लागलं. पण त्याच काळात स्पेनमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब बार्सिलोनाच्या (Barcelona) व्यवस्थापकांना मेस्सीच्या खेळाबाबत कळालं. त्यांनी लगेचच मेस्सीच्या फॅमिलीशी कॉन्टेक्ट करत त्याचा संपूर्ण आजाराचा खर्च उचलण्याचं मान्य करत त्याला करारबद्ध केलं. एका साध्या टिशू-पेपरवर मेस्सीनं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. ज्यानंतर मात्र मेस्सीने आपल्या अद्भुत खेळाने संघाला आणि स्वत:ला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. पुढील बरीच वर्षे मेस्सीने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर बार्सिलोना संघाला अनेक चषक मिळवून दिले. पण 17 वर्षानंतर ऑगस्ट, 2021 मध्ये मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील करार पुढे वाढू शकला नाही आणि दोघेही वेगळे झाले.ज्यानंतर मेस्सी पॅरिस सेंट जर्मन अर्थात पीएसजी क्लबकडून खेळू लागला...
 
रोड टू ग्लोरी...

सर्वाधिक म्हणजेच 7 वेळा  फुटबॉल जगतातील सर्वात महान पुरस्कार बलॉन डी ऑर पटकावलेल्या मेस्सीनं जवळपास फुटबॉल विश्वातील मोठे असे सर्व पुरस्कार मिळवले... बार्सिलोना क्लबवर त्यानं ट्रॉफीजचा वर्षाव केला... अर्जेंटिना संघासाठी विश्वचषक खेळत 2014 मध्ये फायनलमध्येही घेऊन गेला...पण जर्मनीनं त्याचं विश्वचषक विजयाचं स्वप्न भंग केलं. त्यानंतर कोपा अमेरिका 2021 स्पर्धा मेस्सीनं सर्वोत्कृष्ट कामगिरी करत अर्जेंटिना संघाला जिंकवून दिली... आणि आगामी 2022 चा विश्वचषक अर्जेंटिना जिंकेल अशा आशा सर्वांच्या मनात निर्माण झाली... जी अखेर पूर्णही झाली...पण हा 2022 चा विश्वचषक ही अर्जेंटिना सहजासहजी जिंकू शकली नाही अगदी पहिल्या सामन्यापासून ते अखेरच्या फायनलपर्यंत अर्जेंटिनासाठी हा प्रवास अगदी एखाद्या रोलर-कोस्टर राईडप्रमाणे होता. सलामीच्या सामन्यात सौदी अरेबिया सारख्या नवख्या संघाकडून अर्जेंटिना 2-1 ने पराभूत झाली आणि जगभरातील मेस्सी फॅन कमालीचे निराश झाले. पण मेस्सीच्या अर्जेंटिना संघानं दमदार पुनरागमन मेक्सिको आणि पोलंडचा पराभव केला आणि बाद फेरीत प्रवेश केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्सला मात दिल्यावर सेमीफायनलमध्ये क्रोएशियावर 3-0 असा विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली.

हायवोल्टेज फायनल!

दमदार खेळ दाखवत अर्जेंटिना फायनलमध्ये आली आता समोर केवळ फ्रान्सचं आव्हान होतं जे पार करताच अर्जेंटिना आणि परिणामी मेस्सी विश्वचषक जिंकणार होता. फायनलची सुरुवातही तशी अर्जेंटिनाकडून झाली 90 मिनिटांच्या सामन्यात 79 मिनिटांपर्यंत अर्जेटिना 2-0 अशा उत्तम आघाडीवर होते. पण त्यानंतर फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेनं अद्भुत खेळ दाखवत हॅट्रिक केली मेस्सीनंही झुंज देत आणखी एक गोल केला आणि सामना 3-3 अशा बरोबरी आला, ज्यामुळे पेनल्टी शूटआऊट झालं. ज्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टीनेज आणि संघानं अप्रतिम कामगिरी कर त 4-2 अशा फरकानं सामना जिंकला आणि अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप जिंकला. अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 नंतर तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला असला तरी 35 वर्षीय मेस्सीनं पहिल्यांदाच वर्ल्ड कपची ट्रॉफी हातात घेतली, ज्यामुळं केवळ अर्जेंटिना देशासाठीच नाही तर संपूर्ण फुटबॉल जगतासाठी खास क्षण होता... मेस्सीच्या अद्भुत कारकिर्दीत विश्वचषकाची ही एक हॅप्पी एडिंग असल्यानं जगभरातील मेस्सीफॅन सुखावले आहेत...

आगामी 'बलॉन डी'ऑर' मेस्सीचा?

2021 मघ्ये मेस्सीनं रोनाल्डो आणि बायर्न म्यूनिखचा स्टार रॉबर्ट लेवानडॉस्कीला मागे टाकत फुटबॉल जगतातील ऑस्कर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही असा बलॉन डी ऑरचा पुरस्कार मिळवला. पण 2022 मध्ये तो या शर्यतीत नव्हता आणि फ्रान्सच्या बेन्झेमाने हा खिताब मिळवला. पण यंदा मात्र मेस्सीने केलेल्या जबरदस्त कामगिरीसह विश्वचषक विजयामुळे त्याला हा पुरस्कार मिळू शकतो. ज्यामुळे मेस्सी तब्बल आठव्यांदा हा पुरस्कार मिळवू शकतो. मेस्सीनं आतापर्यंत 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्ये 'बलॉन डी'ऑर अवॉर्ड जिंकला आहे.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget