एक्स्प्लोर

मुख्यमंत्री महोदय! शेतकऱ्यांचा अंत पाहू नका...

अकोल्यातील शेतकऱ्यांच्या 'विष परिक्षे'च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना अनावृत्त पत्र

आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सस्नेह जय महाराष्ट्र! साहेब! तुमच्या 'महाजनादेश यात्रे'च्या 'महाइव्हेंट'नं आपलं गारूड सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर घातल्याचं चित्र आहे. तुमच्या यात्रेतून मागच्या पाच वर्षांतील तुमच्या 'उपलब्धी' अन पराक्रमाचे 'ढोल' बडवले जात आहेत. मात्र, तुम्ही एकीकडे 'जनादेशा'चा 'जोगवा' मागत असताना ते देणारे मतदाते शेतकरीच 'दीन' झाले आहेत. 6 ऑगस्टला अकोला जिल्ह्यात तूमची यात्रा घेऊन आला. मात्र, तुमच्या यात्रेचं स्वागत करण्याऐवजी सहा शेतकऱ्यांनी आपली 'जीवनयात्रा'चं संपवण्याचा प्रयत्न केला. तो ही थेट तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात. अन तेही थेट तुमच्याच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या डोळ्यांसमोर. साहेब! पाच वर्षांपासून न्यायाची भिक मागता-मागता हे सर्व शेतकरी गलितगात्र झालेले. त्यांनी तुमची अकोल्यात येण्याचीही वाट पाहू नये. पाहूण्याने घरी येण्याआधीच यजमानाने आयुष्य संपवण्याचा विचार करावा, यातील हा प्रकार म्हणता येईल. तुम्ही संवेदनशील आहात. या घटनेनं तूमचंही मन काहीसं द्रवलं असेलच. साहेब! या सहा शेतकऱ्यांच्या जीवाला सुदैवानं काही झालं नाही. मात्र, व्यवस्थेनं त्यांचा हक्क नाकारताना गेल्या दोन वर्षांत त्यांची केलेली अवहेलना चीड आणणारी आहे. या सहा शेतकऱ्यात सर्वांचीच कहाणी काळीज चिरून टाकणारी. यातील एक नाव तर देशाच्या पंतप्रधानांनी गौरविलेले. 'मुरलीधर राऊत' असं हे नाव. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मुरलीधर राऊत हे नावसुद्धा आहे. देवेंद्रजी! हे तेच मुरलीधर राऊत आहेत ज्यांच्या सेवेचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 'मन की बात'मधून केला होता. नोटबंदीच्या काळात आपल्या हॉटेलमध्ये महामार्गावरून जाणाऱ्या अन नोटबंदीमूळे पैसे नसणाऱ्या प्रवाशांना महिनाभर मोफत जेवण दिलं होतं त्यांनी. मुरलीधर राऊत यांचं बाळापूर अकोला मार्गावरील पारस फाट्याजवळ 'मराठा' नावानं हॉटेल होतं. त्यांचं हे हॉटेल अन सहा गुंठे शेत सुरत-कोलकाता राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या भूसंपदनात गेलं. राऊत यांना तुटपूंजा मोबदला मिळाला. नवीन हॉटेल बांधायला त्यांनी कर्ज काढलं. आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने काल मुरलीधर यांनीही या शेतकऱ्यांसोबत आत्महत्येचा प्रयत्न केला. देवेंद्रजी! मोदींनी गौरवलेला हा 'खरा आयकॉन' तुमच्या व्यवस्थेशी संघर्ष करताना थकला आहे. आज पत्रकार म्हणून त्यांच्या आई, पत्नीला भेटलो. आयुष्याच्या संध्याकाळी मुलाच्या आयुष्यासाठी देवाचा धावा करणारी त्यांची आई. या वयात त्या माऊलीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंत आपल्या व्यवस्थेचा पराभव दिसला. मुख्यमंत्री साहेब! आज ओम टकले नावाचा बारा वर्षाचा मुलगाही यात भेटला. काल त्याच्या आईनेही विष प्राशन केलं आहे. आईचा जगण्या-मरणाशी चाललेला संघर्ष अन त्याचं कारण त्या ओमला समजतंही नव्हतं. साहेब! दोन वर्षांपुर्वी तुमच्या याच भिजत घोंगड्यामुळे ओमचा बाप भारत याने आत्महत्या केली. 21 सप्टेंबर 2017 ला भारतने आत्महत्या केली. काल त्याच कारणासाठी त्याची पत्नी अर्चनाने आत्महत्येचा प्रयत्न केला. महामार्ग विस्तारीकरणात त्यांच्या 2 एकरातील काही शेती गेली. बँकेचं चाळीस-पंचेचाळीस हजारांचं कर्ज फिटणार असं त्यांना वाटत होतं. मात्र, अनेक ठिकाणी चपला झिजवूनही त्यांना मिळाली आहे फक्त साडेदहा हजार इतकी रक्कम. त्यामूळे परिस्थितीने हतबल झालेल्या भारतनं आत्महत्या केली. भारतमागे वृद्ध आई, पत्नी, दोन मुलं, कर्जाचा डोंगर अन या सर्वांमुळे भकास झालेलं घर सोडून गेलेत. साहेब! विकासामुळे अशी कुटूंब उद्धवस्थ झाली तर कसं करायचं? साहेब!, सुरत-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू झालं अन बंदही पडलं. मात्र, या मार्गाचं चौपदरीकरण गाजलं ते जमीन अधिग्रहणात झालेल्या मोठ्या अनियमतितेमूळे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात तर जमीन अधिग्रहणात सरकारी यंत्रणेनं अक्षरश: मनमानी केली आहे. नेते अन नेत्यांच्या नातेवाईकांच्या जमीनी सोन्याच्या भावात विकत घेण्यात आल्या. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीला मातीमोल भाव मिळाला. साहेब! यात मलिदा लाटणाऱ्या कोणत्याच अधिकाऱ्यावर आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही. येथे जमीनीचे दर ठरविताना शासनाच्या रेडीरेकनरचे दर आणि बाजारभाव यातील जे जास्तीचे दर असतील त्यानुसार मोबदला मिळणं आवश्यक आहे. मात्र, येथे शेतकऱ्यांना दर देतांना भूसंपादन अधिकाऱ्यांसह सर्वांनीच मनमानी केली. मुख्यमंत्री महोदय!, या विस्तारीकरण प्रकल्पात बाळापूर तालूक्यातील बाभुळखेड, व्याळा, रिधोरा, सातरगाव, कास्तखेड, कासारखेड, मांडोली, भिकुंडखेड, शेळद, कान्हेरी या गावांतील 114 शेतकऱ्यांची शेती गेली. मात्र, कवडीमोल मोबदल्याने त्यांच्यावर अन्याय झाला. या सर्वांनी एकत्र येत सरकार, व्यवस्था आणि राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवणं सुरू केलंय साहेब! त्यांना फक्त खोट्या सांत्वनेशिवाय मिळालं तरी काय? काल तर तुमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकरांच्या असंवेदनशीलतेनं थेट त्यांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याची पाळी आली. तुमच्या अधिकाऱ्यांची मग्रुरीची भाषा त्यांच्या स्वाभिमानाला छेद देऊन गेली. तुमचा अधिकारी त्यांना म्हणतो की, "तुमचं काम होणार नाही... तुम्हाला जे करायचं ते करायचं ते करा.... तुम्हाला मरायचं असेल तर मरा".... ही कसली संवेदनशीलता? अन हे असे कसे तुमचे अधिकारी?... देवेंद्रजी!, तुमच्यातला मुख्यमंत्री, राजकीय नेत्यापेक्षा तुमच्यातला संवेदनशील माणूस खूप मोठा आहे. त्यामुळेच तुमच्याकडून अपेक्षा, तुमच्यावरचा हक्क 'घरचा माणूस' म्हणून मोठा आहे. तुम्ही तुमचे अधिकारी, व्यवस्थेला कार्यालयातील वातानुकूलित कक्षाच्या हस्तीदंती मनोर्‍यातून बाहेर काढा. कारण, तिथून त्यांचं काम म्हणजे उंटावर बसून शेळ्या हाकण्याच्या प्रकारातलं आहे. आपण सध्या 'महाजनादेश यात्रा' काढली आहे. सामान्य मतदार, शेतकरी, सर्वसामान्य माणूस कशाचं तरी दान मागणाऱ्या अशा यात्रा काढू शकत नाही. कारण, त्याला तुमची व्यवस्था अस्तित्वहिन, संघर्षहिन करण्यासाठी कायम टपलेली असते. त्यांच्याच मगरुरीतून असा आत्मघाताचा निर्णय काल या शेतकऱ्यांना घ्यावा लागला असावा. महामार्ग उभारणी, त्याच्या विस्तारीकरणातून विकासाचा राजमार्ग नक्कीच बांधला जावू शकतो. मात्र, या उभारणीच्या पायात शेतकऱ्यांचे हक्क अन स्वप्न गाडली जावू नयेत. तुम्ही तुमच्या 'महाजनादेश यात्रे'तील भाषणांमधून मोठमोठी आकडेवारी सांगत आहात. विकासाचं स्वप्न दाखवत आहात. ते दया पवारांच्या 'धरण' कवितेतील व्यथेसारखं नक्कीच होऊ नये. 'बाई, मी धरण-धरण बांधिते गं, माझं मरण-मरण कांडीते गं.' देवेद्रजी!, विकासाचं धरण बांधतांना शेतकऱ्यांचं मरण मात्र नक्कीच कांडू नका एवढीच माफक अपेक्षा. अन, हो! अकोल्यातून जाण्यापूर्वी आमच्या बाळापूरच्या या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचं तेवढं बघा... लय उपकार होतील साहेब आपले!.... आपलाच, उमेश अलोणे, जिल्हा प्रतिनिधी, एबीपी माझा, अकोला
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025Saif Ali Khan Attacked Update : सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोवाल्याने सांगितला घटनेचा थरार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Embed widget