एक्स्प्लोर
खान्देश खबरबात : शिवसेना खान्देशात नक्कीच वाढू शकते...
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत ही व्यक्ती तशी उथळ आहे. निवडणूक लढवून जिंकावी लागते याचा त्यांना व्यक्तिगत अनुभव नाही. नियुक्ती याच मेहरबानीवर त्यांचा शिवसेनेतील वकूब आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेच्या विरोधात लिहून-लिहून नंतर शिवसेनेच्या वळचणीला गेलेला हा पत्रकार. धड राजकारणी होऊ शकला नाही आणि शिवसेनेच्या मुखपत्राचा धड संपादकही झाला नाही. राऊत यांना एक खोड नक्की आहे. ती म्हणजे शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून बोलताना माध्यमांसाठी एखादे वाक्य शिर्षकाचे कसे होईल हे ठरून ते वक्तव्य करतात. याच खोडीमुळे त्यांना वारंवार तोंडघशी पडावे लागते.
याचे अलिकडचे उदाहरण म्हणजे मुंबई मनपाचा निकाल जाहिर होत असताना राऊत माध्यमांसमोर करीत असलेली वक्तव्ये आठवून पाहा. शिवसेना 85 जागांवर येवून अडखळली. भाजप मात्र 65 जागांवरुन 82 जागांवर पोहचला. राऊत मात्र तेव्हा बोलत होते, शिवसेनेचा विजय रथ चौफेर उधळला आहे. त्याला आता कोणीही रोखणार नाही. निकाल लागला भलताच. अखेर भाजपने शिवसेनेला राजकीय ब्लॅकमेल न करता मुंबई मनपातील सत्ता उपभोगण्याची संधी दिली.
राऊत यांच्या बोलघेवड्यापणाची अनेक उदाहरणे आहेत. तो चर्चेचा विषय नाही. अलिकडे राऊत नेते म्हणून स्वतंत्रपणे शिवसेना मेळावे घेतात. शिवसेना कार्याध्यक्षांच्या मर्जीतला माणूस म्हणून इतर ठिकाणी लोक त्यांना ओळखतात. पण राऊत हे वक्ते आहेत आणि त्यांना ऐकण्यासाठी कार्यकर्ते गोळा होतात असे काही नाही. खान्देशात तरी असे नक्कीच नाही. येथील शिवसेनेचे स्थानिक नेतेच भाषणाबाबत मुलूख मैदान तोफ आहेत.
राऊत यांच्या उपस्थितीत धुळ्यात शिवसेनेचा मेळावा झाला. तेथेही राऊत यांनी बोलघेवडेपणा करीत दावा केला की, आम्ही लाथा घातल्या म्हणून फडणवीस सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. पण कर्जमाफीच्या नंतरच्या निकषांवरील घोळावर राऊत यांची बोलती बंद आहे. कारण सरकारची कर्जमाफी नेमकी काय? हे राऊतांना कुठे माहित आहे? शिवसेनेची कर्जमाफीवरील भूमिका बोलायचाच भात आणि बोलायचीच कढी अशी आहे. राऊत हेही याच प्रकारातील नेते म्हणायचे.
धुळ्यातील मेळाव्यात राऊत यांनी नेहमीप्रमाणे लीडची घोषणा केली. ती म्हणजे काय? तर उत्तर महाराष्ट्रातून आमदार संख्या वाढीची ताकद मिळून पुढील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होणार! याशिवाय, जुलै महिन्यात राजकीय स्फोट होईल असा दावाही राऊत यांनी केला. राऊत यांच्या बोलण्याचा सरळ अर्थ होता की, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मत मागणार. खरे तर ही बातमी राष्ट्रीय वाहिन्यांसाठी महत्त्वाची होती. पण राऊत यांना हा निर्णय सांगायला जागा निवडली धुळ्यातला मेळावा.
अर्थातच, राऊत यांचा हेतू होता की, उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे या विचाराने शिवसेना कार्यकर्ता आता पेटून उठेल. नरेंद्र मोदींच्या नावावर जशी केंद्रात भाजपची सत्ता आली तशी उद्धव यांच्या नावावर महाराष्ट्रात शिवसेना चमत्कार करु शकते. हे काही अंशी खरेही आहे. आजही शिवसेनेचा डोलारा हा ठाकरे कुटुंबीयांच्या नावावर आहे. स्व. बाळासाहेब यांना सत्ताकारणात रस नव्हता पण उद्धव, आदित्य यांना आणि मनसेवाले राज ठाकरे यांना सत्तेत सहभागी व्हायची मनिषा असू शकते. उद्धव मुख्यमंत्री होणार असतील तर शिवसेनेच्या प्रचारात नक्कीच झंझावात येवू शकतो.
खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आज तरी शिवसेनेची अवस्था फारशी चांगली नाही. भाजपचे 10, शिवसेनेचे 3 आमदार आहेत. काँग्रेसचे 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आमदार आहेत. 1 अपक्ष आहे. जिल्हानिहाय पाहिले तर नंदुरबारमध्ये भाजपचे 2 व काँग्रेसचे 2 आमदार आहेत. धुळ्यात काँग्रेसचे 3 व भाजपचे 2 आहेत. जळगाव जिल्ह्यात भाजपचे सहा, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि अपक्ष आमदार 1 आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपने चांगलेच बस्तान बसविले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जि. प., पंचायत समित्या यासह पालिका जिंकल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, नगर पासून भाजपचा बराच बोलबाला आहे.
अलिकडच्या दोन-तीन वर्षांत खान्देशात दोन्ही काँग्रेस शब्दशः खिळखिळ्या होत असताना शिवसेना सुध्दा कमकुवत होत गेली. जळगाव मनपात घरकुल घोटाळ्याच्या आरोपात सुरेश जैन यांनी दीर्घकाळ तुरुंगवारी केल्याच्या काळात शिवसेना दिशाहिन झाली. किशोर पाटील (पाचोरा), प्रा. चंद्रकांत सोनवणे (चोपडा) आणि गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) यांनी आपापले गड सांभाळले. पण धुळ्यात शहर आणि ग्रामीणमध्ये शिवसेनेला धोबीपछाड खावा लागला. धुळे ग्रामीणमध्ये शिवसेना नेता शरद पाटील पराभूत झाले. विविध आरोप असूनही अनिल गोटे हे धुळे शहरात भाजपकडून विजयी झाले. शिवसेनेला खान्देशात हात हलवत बसावे लागले. सुरेश जैनांची जागाही भाजपने हिसकावली. नंदुरबारमध्ये शिवसेना औषधालाही नाही.
खान्देशातील मतदारांना सध्यातरी भाजपची कार्यशैली मानवताना दिसत नाही. एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर बसविल्यामुळे भाजपअंतर्गत आणि विशिष्ट समाजात प्रचंड नाराजी आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रस्थापितांना मतदार वैतागले आहेत. अशावेळी तरुण व नव्या दमाचे तसेच इलेक्टीव्ह मेरिट असलेले उमेदवार शिवसेनेने दिले तर खान्देशात शिवसेनेच्या जागा वाढू शकतात. पण यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून रावते किंवा देसाई यांच्या सारखे नेते हवेत. राऊत यांना जुमानेल असा शिवसेनेचा सध्याचा तरी कार्यकर्ता नाही.
राऊत यांनी दावा केल्यानुसार आता जुलैत शिवसेना कोणता राजकीय स्फोट करते? हे पाहायचे आहे. या स्फोटाचा केंद्रबिंदू जळगाव असेल असाही दावा राऊत यांनी केला आहे. घरकूल घोटाळा प्रकरणातून सुरेश जैन जामिनावर बाहेर आले आहेत. आगामी काळात ते निवडणुकांची तयारी करणार हे निश्चित. त्यामुळे जैनांच्या नेतृत्वात किंवा इतर आयात नेतृत्वात भाजप व शिवसेनेत कडवी झुंज होण्याची शक्यता असेल. या शक्यतेचीच वाट पाहणे आता आपल्या हातात आहे.
‘खान्देश खबरबात’ सदरातील याआधीचे ब्लॉग :
खान्देश खबरबात : कागदोपत्री आपत्ती व्यवस्थापन उघडे !
खान्देश खबरबात : शेतकरी संपाने खान्देशला काय दिले ? खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच! खान्देश खबरबात : हैदोस घालणारा “दादा” समर्थक!खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !
ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत ‘काँग्रेसयुक्त’ भाजप
आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !
खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !
यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !
खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी
खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त
खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर
खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!
खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर
खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन
खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे
खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार
खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार
खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ
खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!
खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे
खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?
खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा
खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…
खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री
खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!
खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…
खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर
खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल
खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!
खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र
खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?
खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट
खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा
खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी
खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement