एक्स्प्लोर

खादाडखाऊ : 'तिलक'चा सामोसा सँपल

टिळक रस्ता पूर्वी जुन्या पुण्याची अलिखित हद्द समजली जायची. पेरूगेटाच्या पलीकडे शुकशुकाट असायचा म्हणे. त्याकाळी पेरूगेटापासून आत्ताच्या एसपीएम शाळेच्या हद्दीपर्यंत पेरूच्या अनेक बागा आणि त्यातल्या पेरुंवर गुजराण करणाऱ्या हजारो चिमण्या इथे वस्ती करून रहात होत्या. त्याच्याही फार पूर्वी इथेच चिमाजीआप्पा पेशव्यांचं वास्तव्य असल्याचीही आख्यायिका आहे. ह्यापैकी नेमक्या कुठल्या कारणाने ते माहिती नाही, पण ह्याच्या मधल्या भागाला नाव पडलं ‘चिमणबाग’. डेक्कन आणि शहरभागाला जोडणारा प्रमुख रस्ता असला तरी आत्ताआत्तापर्यंत इथे जुन्या पुण्याचा निवांतपणा होता. ह्याच निवांतपणामुळे मराठी सिनेसृष्टीतील राजा परांजपे, शरद तळवलकर ह्यांच्यासारखे सार्वकालीन ‘लिजंड’ कलाकार, प्रो.प्र.बा.जोग ह्यांच्यासारखे “सार्वकालीन वल्ली” इथे रहायचे. जाताजाता सहज म्हणून, १९३७च्या आसपास चुना आणि विटांचे पक्के बांधकाम केलेली आणि आजही तेवढीच मजबूत असलेली पुण्यातली कदाचित पहिलीच रजिस्टर्ड सोसायटी म्हणजे ‘चिमणबाग’. tilak hotel pune 5-compressed कट टू १९८९, बदलत्या काळाची गरज ओळखून ह्याच चिमणबागेत श्री. नरोत्तमजी ओझा ह्यांनी स्नॅक्स सेंटर सुरु केलं. आज २८ वर्षांनंतर तेच ‘तिलक’ टिळक रस्त्यावरच्या दिवसभराच्या खादाडीची सर्वात प्रमुख ओळख बनलं आहे. वडापाव, सामोसा, ब्रेड पॅटीस, कचोरी आणि अमृततुल्यचा टिपिकल चहापासून ‘तिलक’ची सुरुवात झाली. नशिबाने त्यातल्या २७ वर्षांचा मी स्वतः साक्षीदार आहे. ‘तिलक’चे डेली रुटीन सांगायचं तर, सकाळी साधारण सातपासून सारसबागेत/स.प.च्या मैदानाला फेऱ्या मारून किंवा आसपासच्या “जिममध्ये वर्कआउट” करून घरी जायच्या आधी मित्रांसोबत सकाळचा कटिंग चहा मारणाऱ्या ‘फिटनेस फ्रिक’लोकांची गर्दी असते. बघताबघता स.प., अभिनवमधल्या, शेजारच्याच बेहेरे क्लासेसमधल्या आणि जवळच्या स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या विद्यार्थ्यांची वर्दळ सुरु होते. सेल्फसर्व्हिस काऊंटरवर त्यांना पोहे, वडापाव, सामोसा, ब्रेड पॅटीस, कचोरी आणि गॅसवर चढवलेल्या पितळी भांड्यातली अमृततुल्य चहा, कॉफी देण्यात तिलकच्या मालकांपासून ते समस्त कर्मचारीवर्गाची लगबग सुरु होते. tilak hotel pune 2-compressed सकाळी थोडं उशिरा गेलो तर गरमागरम मिसळ-पाव आणि इडली-चटणी सांबारचा घाणा सुरु असतो. उपासवाल्यांसाठी साबुदाणा खिचडी, वडे, कचोरी ह्याच्याबरोबर शेंगदाणा लाडू तयारच असतात. सरत्या संध्याकाळी भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटीस, शेव बटाटा पुरीचा काऊंटर सुरु होतो. शेजारच्या तव्यावर डोसा, उतप्याचे १३-१४ प्रकार आलटूनपालटून पडतच असतात. गेले कित्येक वर्ष स्वदेशी प्यायचा आग्रह धरणाऱ्या तिलकमध्ये, स्वदेशी पेयांचीही रेलचेल आहे. चहापासून कोकम आणी लस्सीपर्यंत, उन्हाळ्याच्या सिझनला कैरीच्या थंडगार पन्ह्यापर्यंत सगळी पेयं हाजीर असतात. खादाडखाऊ : 'तिलक'चा सामोसा सँपल सुरुवातीला मोजके तीन-चारच पदार्थ मिळणाऱ्या तिलकमध्ये आता तीसच्या वर खाद्यपदार्थ मिळतात. पण प्रत्येकाची चव ‘हटके’. उगाच वड्यांच उरलेलं मिश्रण घाला कचोरीत असला प्रकार नाही. त्यामुळे वेगवेगळे दोन जरी पदार्थ घेतलेत तरी चवबदल हमखास होतो. खादाडखाऊ : 'तिलक'चा सामोसा सँपल पण इथल्या पदार्थांच्यात सगळ्यात चलती असते ती सामोसे, वडापावची. त्यामुळे कधीही गेलात तरी खमंग तळलेले गरम सामोसे आणी वडे तुमची वाटच बघत असतात. इथल्या सामोस्यात आणि वड्यात घालतात ती हिरवी मिरची माझी एकदम फेव्हरेट. नाकातोंडातून पाणी काढणारी पण तोंडाला चव आणणारी. नुसताच सामोसा/वडा घेण्यापेक्षा इथली खासियत सामोसा-सँपल घेऊन बघा. तसा इथला सामोसा/वडा म्हणालो तसा तोंडाला चव आणणारा गरम+तिखट. असा पदार्थ त्यापेक्षा तिखट सँपलमध्ये बुडून समोर आला की आपल्या डोळ्यात पाणी जमा व्हायला सुरुवात होते. मग एकेक घास घेताना कानामागून तेच पाणी वाहायला लागतं. वडा संपताना त्याचा तिखटपणा पूर्ण उतरलेला असतो. खादाडखाऊ : 'तिलक'चा सामोसा सँपल अजून भूक असेल तर बाउलमध्ये दही-सामोसा घ्यायचा. त्या गोड-गार दह्यावर स्वतःची अॅडिशन म्हणून समोरच्या पातेल्यातलं आंबटगोड पाणी माफक प्रमाणात ओतायचं. तिखट खायची हौस अजूनही पूर्ण भागली नसेल तर शेजारच्या पातेल्यातली वाटलेल्या हिरव्या मिरचीचं मिक्स्चर एकत्र करायचं आणि पुन्हा नव्या दमानी सुरु व्हायचं. येवढं झाल्यावर सामान्य माणसांच्या पोटात सहसा जागा उरत नाही. त्यामुळे पुढे चहाबाज असाल तर फक्त नावालाच नाही तर पितळी खलबत्त्यात कुटलेल्या मसाला वेलचीचा स्वाद उतरलेला ‘अमृततुल्य’ चहा हाणायचा. तिखट खाऊन झाल्यावर चवीत गोड बदल पाहिजे असेल तर, तिलकची स्वतःचीच साधी किंवा केशर लस्सी,क्या बात है !! खादाडखाऊ : 'तिलक'चा सामोसा सँपल ५०च्या दशकात पुण्यात येऊन संपूर्ण पुणेकर झालेल्या ओझा कुटुंबीयांची तिसरी पिढी आता तिलक समर्थपणे बघत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सगळे भाऊ किचनपासून कॅशपर्यंत सगळा कारभार जातीने बघत असतात. तोंडात सतत ‘वेंकटरमणा गोविंदा’ आणि तिलकच्या बाहेर कै. शरद तळवलकरांनी स्वतः आणून प्रतिष्ठापना केलेल्या दत्ताचे आणि असंख्य खवैय्यांचे आशीर्वाद घेत तिलक सकाळपासून रात्रीपर्यंत अविरत सुरूच असतं. असे आशीर्वाद मागे असतील तर आजूबाजूला कितीही नवीन हॉटेलं सुरु झाली तरी काम करणाऱ्या माणसाला त्याची फिकीर उरत नाही.

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग:

 

खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा

ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी

खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!

खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा

 
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Embed widget