एक्स्प्लोर

खादाडखाऊ : सवाईतल्या फूड स्टॉलचा अनुभव

मी आत्तापर्यंत आयोजित केलेल्या,भाग घेतलेल्या सगळ्या महोत्सवांत मला आढळलेले समान वैशिष्ट्य म्हणजे,इथे आलेल्या बहुतेक स्टॉल्सवाल्यांमध्ये स्पर्धा न रहाता उलट चांगली मैत्रीच होऊन जाते.सवाई गंधर्व महोत्सवही त्याला अपवाद ठरला नाही.

सवाई गंधर्व भारतातला नावाजलेला,मान्यवर संगीत महोत्सव.देशविदेशातून त्याला हजेरी लावणाऱ्या रसिक प्रेक्षकांच्या खाण्याची काळजी घेण्यासाठी आयोजकांनी इथे फूड स्टॉल्सनाही परवानगी देणे सुरु केले.फक्कड चे ब्रँड प्रमोशन करण्याच्या निमित्ताने यंदा प्रथमच त्यात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली ते मागच्या ब्लॉग मध्ये लिहिलंच. खादाडखाऊ  : सवाईतल्या फूड स्टॉलचा अनुभव  आमची ‘मिसळ आणि गाजर हलवा’ ही दोन्ही प्रॉडक्ट ‘रेडी टू इट’ असल्याने पदार्थ बनवायला लागणारा वेळ असल्याने आम्हाला कमीतकमी लागणार होता.त्यामुळे आमच्या स्टॉलची तयारी उशिरा करून देखील स्टॉल सुरु व्हायला लागणारा वेळ मात्र कमीतकमी लागणार हे नक्की होतं.एकदा महोत्सवात भाग घेतलाय म्हणाल्यावर ‘काऊंटर सेल’ ची काळजी न करता एकीकडे आपले काम करून आपण येणाऱ्या भरपूर लोकांना भेटायचं आणि दर्जेदार संगीताची मजा लुटायची,हे मनाशी पक्कं केलं होतं.इंडस्ट्रीयल इव्हेंट्स मधल्या स्टॉलचा अनुभव,त्यातून केलेल्या स्वतःच्या इव्हेंट्स आणि नंतर मिसळ महोत्सवाचा अनुभव गाठीशी असल्याने,अश्या प्रकारच्या महोत्सवात एक स्टॉल मॅनेज करण्याच्या गरजा वेगळ्या असतात ह्याची थोडी कल्पना होती. sawai-glory विकण्यासाठी जरुरी मटेरियल्स तयार करून ठेवणे,गरजेच्या इतर अनेक वस्तूंची ऑर्डर,खरेदी.स्टॉलच्या ब्रँडिंगच्या कामाची अथं पासून इति पर्यंत सुरुवात करायला लागणे,जाहिराती,प्रत्यक्ष स्टॉलवर काम करायला लागणारी टीम संपूर्ण नव्याने बांधायला लागणे;आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्याचा ‘बजेट’शी घालायचा ताळमेळ !ही कामे पार पडेपर्यंत महोत्सवाला कधी सुरुवात झाली,हे समजलंही नाही.आजूबाजूचे सगळेच स्टॉलवाले सवाईमधले अनुभवी आणि मदतीलाही तेवढेच तत्पर असल्याने आयत्यावेळी येणाऱ्या अनेक शंका दूर होत गेल्या. sawai-deshpande kaka सवाई मध्ये निवडक कलाप्रकार सादर करणाऱ्या उत्तम कलाकारांची जेवढी चांगली फौज असते तेवढीच रेलचेल निवडक पदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या स्टॉल्सचीही असते,असे अनेक अनुभव यंदाच्या ‘सवाई’मधून शिकायला मिळाले.ह्या व्यावसायिक अनुभवाबरोबरच सवाईमध्ये खाणं आणि गाणं ह्यांचा तेवढाच शौकीन असलेल्या माझ्यासारख्याची अनेकदा पंचाईत झाली.त्यात तिथे जायचा मुळ उद्देश ‘व्यवसाय’ असल्याने तिहेरी पंचाईत. पहिल्याच दिवशी सुरुवातीला बार्स&टोन्स नी केलेल्या सुरेख ऑडियो सिस्टीमवरून श्री.मधुकर धुमाळ ह्यांची सुरेल सनई ऐकू यायला लागली.त्याचवेळी आम्ही मात्र पहिल्यांदाच मिनरल वॉटरमध्ये भल्यामोठ्या शेगड्यांवर मिसळीचा रस्सा उकळवत  होतो.तो बनला की नाही ह्यात आमच्या नव्या टीम मध्ये दुमत असतानाच,माझं मत मागवण्यात आलं.मी त्यावेळी खरतर शेजारच्या स्टॉलवरून येणाऱ्या अस्सल मद्रासी फिल्टर कॉफीच्या सुगंधात गढलो होतो.पण आमच्या माणसांनी आवाज देऊन माझी कॉफीतंद्री भंग केली,त्याचवेळी ज्या अर्थी अजून शेजारून येणाऱ्या कॉफीचा वास आपल्याकडे येतोय त्या अर्थी मिसळीचा रस्सा अजून झालेला नाही अशी बसल्याजागी कॉमेंट मारून मी पुन्हा कॉफीच्या सुगंधात आणि धुमाळ ह्यांच्या सनईत गढून गेलो.आमच्याकडे नवीन आलेली पोरं माझ्याकडे विस्मयकारक नजरेने बघत असल्याचा भास मी जाणीवपूर्वक दुर्लक्षिला. पहिल्या दिवशी सुरुवातीला कामाला थोडा आरामच असेल असा आमचा समज पब्लिक आत यायला लागल्यावर दूर झाला.आणि माझे आवडते गायकद्वय राजन-साजन मिश्राजींचं गाणं सुरु होईपर्यंत आम्ही पामर आमचा मिसळ-गाजर हलवा विकण्यात गढून गेलो. मा.हरीजींच्या वादनाच्या आधी सवाई गंधर्व महोत्सवाचं दरवर्षीचं आकर्षण असलेल्या श्री.सतीश पाकणीकर ह्यांच्या थीम कॅलेंडरचं प्रकाशन होतं.श्री.हरिप्रसाद चौरासिया आणि पंडित शिवकुमार शर्मा ह्यांच्या मैत्रीला सलाम करणारे थीम कॅलेंडर ‘स्वरमैत्र’ चे प्रकाशन स्वतः पद्मभूषण हरिप्रसादजींच्या हस्तेच झालं,त्यावेळी मंडपात हजर असलेल्या सगळ्यांनी शिवहरी ह्यांच्या पन्नासाहून जास्ती वर्षे असलेल्या मैत्रीला आणि साथीला आणि त्यांची छायाचित्रे टिपणाऱ्या पाकणीकरांच्या कलेला टाळ्यांच्या कडकडात दाद दिली.त्यात आमच्याही दोन टाळ्यांचा आवाज होताच. sawai-crowd दुसऱ्या दिवशीही काम जोरात सुरु झालं,लोकं येऊन मिसळ,गाजर हलवा खाऊन तारीफ करत होते.आज एकसे बढकर एक कलाकार असल्याने कामातून फारशी फुरसत मिळत नव्हती.कुमार गंधर्वांचे नातू भुवनेश कोमकली,व्हायोलीन वादिका कला रामनाथ,सध्याच्या भारतीय संगीताताली आघाडीची गायिका कौशिकी चक्रवर्ती आणि संगीतातले भीष्माचार्य पंडित जसराज असे कलाकार असल्यावर आतली आणि बाहेरची गर्दी काही केल्या हटत नव्हती.तिसऱ्या दिवशी महोत्सव उशिरा सुरु झाल्याने खऱ्या अर्थाने कामातून इतर पदार्थांकडे पहायला फुरसत मिळाली. सवाई मध्ये समोर स्टेजवर येणाऱ्या दिग्गज कलाकारांबरोबरच त्यांच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या व्हरायटीने मला तेवढीच भुरळ पाडली. आमचे मित्र लक्ष्मी रस्त्यावरच्या ‘आबाचा ढाबा’वाले राहुल कुलकर्णी ह्यांनी संपूर्ण जेवण पाहिजे असलेल्या लोकांसाठी कोल्हापुरी आख्खा मसूर-भाकरीबरोबरच इतरही अनेक नानविध प्रकार ठेवले होते.जेपीज च्या स्टॉलवर साऊथ इंडियन पदार्थांची रेलचेल होती.एकीकडे आमच्या शेजारी आमचे नवीन झालेले मित्र तानाजी शेळके लातूरवरून आपल्या शेतातला हुरडा घेऊन आले होते.त्यांनी हुरडा घातलेले अनेक प्रकार विकायला ठेवले होते.दुसऱ्या बाजूला प्यायला ‘कुमारधाराची’ अफलातून कॉफी सतत तयारच होती.सांगवीच्या राजमुद्राचे साळुंखे ह्यांनी व्हेज चायनीजची व्हरायटी मांडली होती.त्यात एकीकडे आम्हीही मराठमोळी मिसळ-गाजर हलवा विकत आमचे काम सुरु ठेवले. मी आत्तापर्यंत आयोजित केलेल्या,भाग घेतलेल्या सगळ्या महोत्सवांत मला आढळलेले समान वैशिष्ट्य म्हणजे,इथे आलेल्या बहुतेक स्टॉल्सवाल्यांमध्ये स्पर्धा न रहाता उलट चांगली मैत्रीच होऊन जाते.सवाई गंधर्व महोत्सवही त्याला अपवाद ठरला नाही. प्लेट भरताना समोर सुरु असलेल्या सवाईच्या व्यासपीठावर दिग्गज कलाकार आपली कला सादर करून जात असताना माझ्यासारख्याची मात्र इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती.त्यामुळे समोरची गर्दी थोडीशी आटोक्यात आली की मीही मधूनच श्रोत्यांच्या गर्दीत सामील होत होतो. शेवटच्या दिवशी संध्याकाळी रसिकांना खरा आनंद दिला तो आनंद भाटेंनी.त्यांनी भीमसेनजींच्या गायलेल्या “सौभाग्यदा लक्ष्मी” ला खऱ्या जाणकार प्रेक्षकांची  भरभरून दाद मिळाली.एकीकडे वन्स मोर म्हणणाऱ्या त्या टाळ्या थांबतच नव्हत्या. sawai-with nipun उमेश विनायक कुलकर्णी,निपुण धर्माधिकारी सारखे अनेक चांगले मित्र आणि दर्जेदार चित्र-नाट्य कलाकार,प्रसाद शिरगावकरसारखे माझ्या पिढीतील उत्तम लेखन करणारे अनेक मित्र ह्या ५ दिवसात फक्कडला भेट देऊन गेले.ह्याबरोबरच ब्लॉगच्या वाचकांनी लिखाणाला प्रत्यक्ष भेटून दिलेली पावती कायम स्मरणात राहील. सवाईच्या निमित्तानी गावोगावातून आलेली काही मुलखावेगळी माणसं भेटली. प्रभाकर देशपांडे ह्या फक्त सवाई गंधर्व बघायला विदर्भातल्या चंद्रपूरवरून सहपरिवार आलेले काकांना,फक्कडच्या मिसळीने आणि गाजर हलव्यानी एकदम पागल करून टाकले बाप्पा ! पाच दिवसात कुठल्याश्या एका दिवशी उपास आहे म्हणून तुम्हाला गाजर हलवा चालणार नाही,असं म्हणल्यावर, “आमच्याकडे तर उपासाला गाजर चालते,त्यात बाकी खोया वगेरे तर कै नै ना?” म्हणत  २-३ प्लेट गाजर हलवा खाऊन घेतला आणि त्यादिवशी राहून गेलेली मिसळ दुसऱ्या दिवशी परत दोन वेळा परत येऊन खाऊन गेले.स्पेन वरून आलेला एक व्हायोलीन वादक दोनवेळा स्टॉलवर येऊन मिसळ खाऊन गेला आणि जाताना आवर्जून त्याचे एक पाकीट घेऊन गेला.असे प्रसंग अनुभवले की अश्या महोत्सवात सहभागी झाल्याचं सार्थक होतं. ‘क्वालिटी ब्रँडिंग’ म्हणजे अजून तरी काय वेगळं असतं म्हणा ! खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग : खादाडखाऊ : सुरेल सवाईला ‘फक्कड’ करणार चविष्ट, तेही पर्यावरणपूरक मार्गाने खादाडखाऊ : वहुमनचा बाबाजी खादाडखाऊ : पुण्यातले इराणी मित्रो !!! आज खिचडी पुराण खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!   खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस? खादाडखाऊ : जखमा उरातल्या खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’ खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’! खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget