एक्स्प्लोर
खादाडखाऊ : सुरेल सवाईला ‘फक्कड’ करणार चविष्ट, तेही पर्यावरणपूरक मार्गाने
स्वतःच्या ‘रेडी टू इट’ खाद्यपदार्थांचा ब्रँड ‘फक्कड’ बनवताना इतर भारतीय पदार्थांबरोबरच प्रामुख्याने आपले मराठी खाद्यपदार्थ जगात पोचावायचे ध्येय मी स्वतःच माझ्यापुढे ठेवलं आहे. अशावेळी माझ्यासारख्या अस्सल मराठी पदार्थ विकणाऱ्याला, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासारखी उत्तम संधी कुठली असणार होती?

पुण्यातल्या सवाई गंधर्व महोत्सवाचं नाव माहिती नाही,असा शास्त्रीय संगीतप्रेमी पुण्यातच काय,पण उभ्या भारतात सापडणे मुश्कील आहे. संगीतप्रेमींच्या लाडक्या भिमाण्णांनी आपल्या गुरुंच्या स्मृती जपण्यासाठी सुरु केलेल्या महोत्सवाला देशातूनच काय जगभरातूनही अनेक शास्त्रीय संगीतप्रेमी न चुकता हजेरी लावतात. देश-विदेशात प्रसिद्ध असलेले कलाकार, पुणेकर रसिकांची दाद मिळवायला ‘सवाई’ मध्येच आवर्जून कला सादर करतात. ह्यावर्षी ६४व्या वर्षांत पदार्पण करणारा हा महोत्सव म्हणजे पुणेकरांच्या अभिमानाचा विषय. अगदी पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवासारखाच.
त्यामुळे इथे येणाऱ्या हजारो संगीतप्रेमींच्या व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये म्हणून पडद्यामागे आयोजक आणि शेकडो स्वयंसेवक अविरत काम करत असतात. रसिकांच्या क्षुधाशांतीसाठी आयोजकांनी इथे अर्थातच काही स्टॉल्सची व्यवस्था केलेली असते.
स्वतःच्या ‘रेडी टू इट’ खाद्यपदार्थांचा ब्रँड ‘फक्कड’ बनवताना इतर भारतीय पदार्थांबरोबरच प्रामुख्याने आपले मराठी खाद्यपदार्थ जगात पोचावायचे ध्येय मी स्वतःच माझ्यापुढे ठेवलं आहे. अशावेळी माझ्यासारख्या अस्सल मराठी पदार्थ विकणाऱ्याला, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासारखी उत्तम संधी कुठली असणार होती?
त्यामुळे पद्धतीप्रमाणे काही महिने आधी अर्ज त्यांच्या ऑफिसमधे सादर केला आणि इतर कामात व्यस्त झालो. अनेक मातब्बर लोक जिथे भाग घ्यायला धडपडतात तिथे आपल्याला पहिल्याच प्रयत्नात स्टॉल मिळेल, ह्याची कल्पना नव्हती. पण दिवाळीनंतर एक दिवस अचानक सवाईच्या आर्य संगीत प्रसारक सभेकडून ‘फक्कड’ला स्टॉल मिळाल्याचा फोन आला.
कुठल्याही नवीन मराठी व्यवसायिकाची सुरुवातीच्या पैश्यांची म्हणजे भांडवलाची चिंता असते, ती जिवाभावाच्या आप्तांनी “पाठीवर हात ठेवून लढ”, म्हणाल्यावर सहज दूर झाली.
पुण्यातल्या खाद्यरसिकांना आवडेल अशी अस्सल मराठमोळी आणि तयार ‘फक्कड’ मिसळ द्यायची हा तर मूळ उद्देशच आहे. पण त्याच्या जोडीला रसिक संगीतप्रेमी आणि अस्सल खवय्यांना काय देता येईल? हा प्रश्न जास्त अवघड होता. शेवटी ‘बेटर हाफ’च्या सल्ल्याने (चाणाक्ष वाचकांनी इथे ‘सल्ला’हा शब्द ‘आदेश’ म्हणून वाचला असेल,तर तो खरा आहे.) दूर झाला आणि चविष्ट मिसळीनंतर लोकांचे तोंड गोड करण्यासाठी “गाजराचा हलवा” नक्की केला. मिसळीच्या शेकडो अभिप्रायानंतर फक्कडच्या मिसळीची चव आम्ही केव्हाच नक्की केली आहे. पण मार्केटसाठी नवीन प्रॉडक्ट म्हणून तयार गाजर हलवा बनवायची तयारी सुरु केली. काही ट्रायल्स आणि निवडक लोकांच्या अभिप्रायानंतर एक चव नक्की केली आणि तीच चव आता खवय्यांना द्यायला सज्ज झालो आहेत. ‘मोजकेच पदार्थ देऊ पण ते दर्जेदारच देऊ’, ह्या तत्वानं काम करायचं ठरवलं.
आता मिसळ आणि गाजर हलवा ह्या ‘कॉम्बो’ची चव लोकांना आवडेल ह्याची खात्री झाल्यावर,पुढचा विचार आला तो पदार्थ सर्व्ह कसे करावेत ह्याचा. प्रॉब्लेम असा आहे की, असा महोत्सवात अनेकजण चांगली मटेरियल्स वापरून, उत्तम प्रतीचे आणि चविष्ट पदार्थ तयार करुन विकतात पण अशा प्रसंगी आपण प्लेट्स आणि बाउल्सचा नकळतपणे कचराच करत असतो. ही भावना त्या थर्माकोल आणि प्लॅस्टिकच्या प्लेट्स कचऱ्यात टाकताना निदान मलातरी मनातून खिन्न करुन जाते.
ह्या प्लेट्सचा होणारा हा कचरा उद्या कदाचित नदी-नाल्यात, गुरांच्या पोटातही जाऊ शकतो. त्याला एक पर्यावरण प्रेमी म्हणून आपण निदान हातभार तरी लावायला नको ह्या भावनेतून महाग पडत असल्या तरी सुपारी, नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या, संपूर्ण बायो-डीग्रेडेबल प्लेट्स आणि बाउल्समधूनच मिसळ विकायची हे मनाशी नक्की केले. संपूर्ण पर्यावरणपूरक वस्तू वापरणे आजच्या जमान्यात प्रॅक्टिकली शक्य होत नसलं तरी आपल्याला जेवढे शक्य आहे ते मात्र आपण करायलाच पाहिजे हे मात्र नक्की. दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील पण आपल्या ग्राहकांनी आज ह्या प्लेट्स वापरून निसर्गात परत जाताना त्यांच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास नक्की होणार नाही.
आज संध्याकाळी जेव्हा उद्यापासून सुरु होणाऱ्या महोत्सवाच्या भव्य मांडवात गेलो. त्यावेळी जागतिक कीर्तीच्या अनेक सुरेल कलाकारांची कला जिथे पहिल्यांदा सादर झाली; त्याच महोत्सवात उद्या आपण ‘फक्कड’चे दोन तयार पदार्थ पहिल्यांदा ‘पेश’ करणार ह्या भावनेनी अंगावर क्षणभर शहारा आला.
पुणेकरांना ते नक्की आवडतील, ह्याची स्वतःचे प्रॉडक्ट म्हणून नाही तर एक ‘सच्चा तटस्थ’ फूड ब्लॉगर’ म्हणून मला नक्की खात्री आहे. त्याचबरोबर काही अंशी का होईना पण आपण निसर्गाप्रतीही बांधिलकी जपतो आहोत ही भावना एक उद्योजक म्हणून सुखावते.
खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग
खादाडखाऊ : वहुमनचा बाबाजी
खादाडखाऊ : पुण्यातले इराणी
मित्रो !!! आज खिचडी पुराण
खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ
खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!
खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?
खादाडखाऊ : जखमा उरातल्या
खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण
वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे
खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड
खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं
खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ
खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’
खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची
खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी
खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी
खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी
खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा
खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम
खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल
खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा
ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी
खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!
खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा

View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
सोलापूर