एक्स्प्लोर

घरकाम करणारा पुरुष बायल्या नव्हे!

अजून एक महत्त्वाचा प्रश्न हा की पुरुषप्रधान समाजात वाढलेल्या किती पुरुषांना हाऊस हजबंड व्हायला आवडेल? वेगळा विचार करुन स्वेच्छेने हाऊस हजबंड होण्याचा निर्णय एखाद्या पुरुषाने घेतला असेल तर त्याच्या निर्णयाचं त्याच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र यांमधून सकारात्मक स्वागत होईल काय? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं बहुतांशी पुरुष 'नाही' असंच देतील. पण एखादा पुरुष कुठलाही आव न आणता सहज असा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करतो तेव्हा त्याला 'बायल्या' म्हणून हिणवत अखंड बाईजातीचा अपमान करणारा आपला समाज आहे.

"किश्या, अव्या भेटला बिटला काय रं या चार दिवसांत." "दिप्या लगा तो आता कशाला आपल्याला भेटतूय. बसला आसल बायकूची लुगडी धूत. जवा बगल तवा झाडू तर मारत असतूय, कपड्याच्या घड्या तर घालत असतूय नायतर बायकू चपात्या लाटताना भाजून तर घेत असतूय." "काय सांगतूस काय!  चार महिन्यातच अव्या बायकूच्या ताटाखालचं मांजर झाला म्हणायचं." "नोकरी करणारी बायकू असली म्हणून काय झालं. तिच्या हाताखालचा नोकर होत असत्यात होय. आमच्या तर गल्लीतली सगळी माणसं अव्याला बायल्या मनायल्याती." "हे बघ किश्या मी तर जेवलेलं खरकटं ताटच काय चहा पिल्याला कप सुद्धा जाग्यावरनं उचलत नस्तू. च्यायला लग्नं करून बायका कशाला आणत्याती माणसं." "आमची आई तर म्हणती बायकूला एक काम करु लागलं की तिला वाटतय नवऱ्यानं अजून दोन कामं करावी. तवा बायकूनं गॅसवर ठिवल्यानं दूध उतू चाललं तरी नवऱ्यानं फुकायचं नसतय बघ." "अव्या आता पुस्तकातलं धडं शिकवायच्या ऐवजी पोरांला 'बायकूला घरच्या कामात मदत कशी करावी? आणि पूरींला' लगीन झाल्यावर नवऱ्याला घरकामात कसं आपल्या हाताखाली राबवावं' याचंच धडं शिकवल बघ?" "ख्या.ख्या.ख्या. ही असलीच शिकल्याली न हुकल्याली जमात. म्हणून तर ह्यांच्या बायका शेपारत्यात्या बघ." "आपून बरं की लगा शाळा लै न शिकून आपल्याला कळतय बायकूसोबत कसं वागायचं अन् बायकूला कुठं ठिवायचं ती." "बास झालं आता अव्यापुराणा. चल दी तंबाकू. भरु दे बार ssssss " नवीन लग्न झालेल्या एका शिक्षक मित्राच्या 'बायकोला घरकामात मदत करण्याच्या वृत्तीबद्दल' त्याचेच दोन मित्र टिंगलटवाळी करत होते. हा फक्त एक नमुन्यादाखलचा संवाद आहे. असे किंवा याहून थोडे निराळे परंतु सूर एकच असणारे संवाद आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतील. असो. 'घरकाम बायकांनी करायचं आणि बाहेरची कामं पुरुषांनी करायची.' या पारंपरिक पुरुषसत्ताक भारतीय मानसिकतेला बायकांनी पैसे कमवून आणलेले चालतात, बाजारहाटापासून मुलांच्या शाळा-कॉलेजच्या अॅडमिशनपर्यंत अशी घरासाठीची पण घराबाहेरची सगळी कामं केली तर चालतात काय पळतात सुद्धा. पण याच मानसिकतेला रुढअर्थानं बायकांची असणारी घरातली कामं पुरुषांनी केली तर चालत नाहीत किंबहुना ते अशा पुरुषाला बायल्या ठरवून मोकळे होतात. त्याला बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणून हिणवतात. पुरुष जेवढं कमावतो तेवढंच किंवा त्याहून अधिकही घरातली बाई कमावत असेल, कुटुंबासाठी असणारी दोघांची आर्थिक भागीदारी समान असेल तर मग ती भागीदारी घरातील कामात का नको? याचा अर्थ असा नाही की नोकरी करणाऱ्याच स्त्रियांना घरकामात मदत करावी आणि गृहिणींना नाही. आजही आपल्याकडे स्वयंपाक सोडला तर बाईने करायची जी इतर घरकामं (कपडे, धुणे, भांडी घासणे, फरशी पुसणे....इत्यादी ) आहेत ती हलक्या दर्जाची समजली जातात. पुरुषप्रधान संस्कृतीत अशी हलकी कामं (समाजाच्या दृष्टिकोनातून) बाईनेच करायची असा पायंडा पडला आहे. गृहिणी असणाऱ्या बाईचा तर जन्मच केवळ घरकामासाठी झालाय असा समज आपल्याकडे रुढ झाला आहे. आणि वरुन गृहिणी काय घरीच तर असतात त्यांना घरात बसून काय कामं असतात असं म्हणायला सगळे मोकळे. संसार सांभाळत नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे हाल तर कुत्रे खात नाहीत. अनेक ठिकाणी घरकामाला बाई असली तर इतर कामंसुद्धा हनुमानाच्या शेपटी सारखी असतात हे कुणीच नाकारु शकत नाही. शहरात पैसे देऊन घरकामासाठी मनुष्यबळ विकत घेता येतं पण खेडेगावात तशी सोय फारच दुर्मिळ आहे. अशा ठिकाणी एखादेवेळी किंवा वेळ मिळेल तेव्हा घरातील पुरुषाने घरकामात मदत करणं हे त्याचं परमकर्तव्य आहे. पण शेकडा नव्व्याणव पुरुष घरातील बायकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देताना आपली कर्तव्ये मात्र सोईस्कररित्या विसरलेले असतात. अनेक घरांमध्ये तरुणपणी आपल्या नवऱ्यांना आपल्या हाताखाली मनसोक्त राबवलेल्या स्त्रियांना आपल्या मुलाने मात्र त्याच्या बायकोने सांगितलेले एकही काम करु नये असे वाटते. आपल्या मुलाला साधा चहाही येत नसल्याचंही अनेक स्त्रिया कौतुकमिश्रीत अभिमानाने सांगतात. पण याच स्त्रियांना आपल्या जावयाने लेकीच्या हाताखाली राबलेले चालते. अशा दुटप्पी वागणाऱ्या स्त्रियाही घरकामापासून आपले पुरुष हजारो मैल दूर असण्याला कारणीभूत आहेत. पैसे कमवून आणण्याबरोबरच पुरुष जे कामं करायचे ती सगळी कामं (लाईटबिल-फोनबिल भरणे, खरेद्या करणे अजून बरीच काही) मागच्या बऱ्याच वर्षांपासून स्त्रिया करु लागल्या आहेत. ही पुरुषांची कामं आहेत मग ती आपण का करावी असा प्रश्नही त्यांच्या मनात उपस्थित होत नाही, परंतु कामाच्या बाबतीतल्या विभागणीची मूळं पुरुषांच्या डोक्यात अजूनही धट्ट रोवून आहेत. ज्या स्त्रिया नोकरी करुन घराला हातभार लावतात त्यांच्याकडूनही पूर्णवेळ गृहिणीसारख्याच अपेक्षा ठेवल्या जातात. नवरा-बायको दोघं एकाचवेळी कामावरुन दमून येतात तेव्हा बायकोनेच किचनमध्ये जाऊन दोघांसाठी चहा बनवला पाहिजे असा पारंपारिक अलिखित नियम फारसा कुठल्या पुरुषाला मोडावा वाटत नाही. बायका घरात कामं करत असताना कित्येक घरचे पुरुष फेसबुक, व्हॉट्सअॅपवर स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारण्यात मग्न असतात. दोघांनी मिळून पैसे कमवायचे, संसार चालवायचा तर मग दोघांनी मिळून घरकामं करायला काय हरकत आहे? अजून एक महत्त्वाचा प्रश्न हा की पुरुषप्रधान समाजात वाढलेल्या किती पुरुषांना हाऊस हजबंड व्हायला आवडेल? वेगळा विचार करुन स्वेच्छेने हाऊस हजबंड होण्याचा निर्णय एखाद्या पुरुषाने घेतला असेल तर त्याच्या निर्णयाचं त्याच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र यांमधून सकारात्मक स्वागत होईल काय? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं बहुतांशी पुरुष 'नाही' असंच देतील. पण एखादा पुरुष कुठलाही आव न आणता सहज असा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करतो तेव्हा त्याला 'बायल्या' म्हणून हिणवत अखंड बाईजातीचा अपमान करणारा आपला समाज आहे. स्त्रियांच्या घरकामातील नजाकतीवर कवींनी कविता लिहिल्या, त्यांच्या कामातील सफाईदारपणाची, नीटनेटकेपणाची लेखकांनी कादंबऱ्यांची पानं भरभरुन वर्णनं केली. आजही आपल्याला भान हरपून घरकामात मश्गुल झालेली स्त्री नितांत देखणी दिसते. तेवढंच देखणेपण तिच्या घराबाहेरील कामातही असतं हे नाकारता येत नाही. मग घरोघरी घरकामात मग्न झालेले पुरुष आपल्याला कधी बघायला मिळणार आहेत. ज्या घरात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाई काम करते (आर्थिक भागीदारी) त्या घरात बाईच्या हाताला हात लावून चार घरकामं करुन पुरुषांनी तिच्या खांद्यावरचा जरासा भार आपल्या खांद्यावर घेतला तर स्त्री-पुरुष समानतेच्या पोकळ काहीएक गप्पांना अर्थ मिळेल. जेव्हा माझी आई भाजीची तयारी करत असताना बाबा लसूण सोलून, कांदा चिरुन देतात, वहिनी भांडी घासून ठेवते आणि दादा शेल्फला ती व्यवस्थित लावतो, मी झाडू मारते आणि नवरा फरशी पुसून घेतो तेव्हा मला माझं घर खऱ्या अर्थानं देखणं आणि परिपूर्ण वाटतं. माझ्या घरासारखीच सगळी घरं देखणी दिसावी अशी इच्छा माझ्या मनात अधिक प्रखर होऊ लागते.

कविता ननवरे यांचे आधीचे ब्लॉग्स

"शाकाहार Vs मांसाहार : काही दुर्लक्षित, काही अचर्चित मुद्दे"

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget