एक्स्प्लोर

BLOG: कर्नाटकमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार? 

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा प्रचार काल संध्याकाळी पाच वाजता संपला आणि सगळ्यांना आता मतदानाचे आणि निकालाचे वेध लागलेत. 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपविरोधात अॅंटी इन्कम्बसी असल्याने त्यांची सत्ता जाऊन काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असे म्हटले जात आहे. एवढेच नव्हे तर काही अपवाद वगळता बहुतेक प्री पोल आणि ओपिनियन सर्व्हेमध्ये काँग्रेस सत्तेवर येत असल्याचे दिसून आले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे विश्लेषण करण्यापूर्वी ओपिनियन पोलमध्ये कोणाला किती जागा देण्यात आल्यात त्याकडे आधी पाहूया.

कर्नाटकमध्ये एकूण 224 जागा आहेत. 2018 मध्ये काँग्रेसला 78, भाजपला 104 आणि  जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकांसाठी अनेकांनी सर्व्हे केलेत.  एबीपी-सीवोटरच्या ओपिनियन पोलनुसार  कर्नाटकमध्ये काँग्रेसला 107 ते 119 जागा तर भाजपला 75 ते 80 जागा आणि जेडीएसला 23 ते 25  जागा, म्हणजेच मागच्या वेळेपेक्षा जेडीएसच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता दिसतेय. 

इंडिया टीवी-सीएनएक्स पोलनुसार भाजपला 85,  काँग्रेसला  105  आणि जेडीएसला 32 जागा मिळतील. तर इंडिया टूडे-सीवोटरच्या पोलनुसार भाजपला 74 ते 86 जागा मिळतील, काँग्रेस 115 च्या पुढे जाईल. तर दुसरीकडे झी न्यूज आणि मॅट्रिझ तसेच कन्नड न्यूज चॅनेल सुवर्णा न्यूजच्या सर्व्हेमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून सत्तेवर येईल असे समोर आलेय.

असा अंदाज व्यक्त केलाय.

2013 मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसने 122 जागा जिंकल्या होत्या तर भाजपला फक्त 40  जागा मिळाल्या होत्या, मात्र 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 104 जागा जिंकल्या आणि काँग्रेस 78 तर जेडीएस 37 जागा जिंकले होते. एकाही पक्षाला बहुमत नसल्याने येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरी पण बहुमत सिद्ध करता न आल्यानं मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस यांनी सत्ता स्थापन केली. मात्र 14 महिन्यातच काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी भाजपची वाट धरली आणि काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळले. या फुटीरांना घेऊन भाजपने सत्ता हस्तगत केली आणि येडीयुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र भाकरी फिरवायची असल्याने भाजपने गेल्या वर्षी बसवराज बोम्मई यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी टाकली.

भाजपविरोधात अँटी इन्कम्बसी आहे. काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे परंतु तो भाजपच्या या अँटी इन्कम्बसीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला असल्याचे चित्र आतापर्यंत तरी दिसले आहे. याचे कारण काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेली मारामारी. सिद्धरामैया आणि प्रदेश अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून सुप्त संघर्ष सुरु आहे. डी.के. शिवकुमार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हायकमांड, मुख्यमंत्री म्हणून ज्याची निवड करतील तो मान्य असेल असे म्हटले आहे. पंजाबमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तेथेही प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरु होती आणि यात काँग्रेसला पुरता पाडाव झाला आणि अरविंद केजरीवालांचा आप पक्ष सत्तेवर आला.  कर्नाटकमध्येही आप मैदानात आहे पण तेथे त्यांची तेवढी ताकद नाही. आणि जेडीएस आपसारखी मुसंडी मारेल असेही चित्र नाही.

मात्र भाजपलाही कर्नाटकात मोठे धक्के बसलेत. माजी मुख्यमंत्री शेट्टर यांना तिकीट न दिल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनेही शेट्टर यांना लगेच हुबळी-धारवाडमधून तिकीट दिले. हा मतदारसंघ भाजपचा गड आहे. मात्र शेट्टर काँग्रेसमध्ये गेल्याने हा गड ढासळणार की काय असे वाटत आहे. शेट्टर लिंगायत समाजाचे असून या समाजाचा त्यांना चांगला पाठिंबा आहे. मात्र भाजपनेही खेळ करत भाजप एकनिष्ठ महेश तेंगिनाकायी यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे येथे चुरशीची लढत पाहायला मिळेल यात शंका नाही.

प्री-पोल सर्व्हेमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळत असल्याचे दिसत असल्याने काँग्रेसने कर्नाटकमध्ये प्रचाराचा धडाका लावला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी रोड शो आणि सभांच्या माध्यमातून कर्नाटक पिंजून काढले. मात्र नेहमीप्रमाणेच काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना विषारी साप असे अपशब्द वापरून काँग्रेसला बॅकफूटवर नेण्याचा प्रयत्न केला. त्यातच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दल, पीएफआयवर बंदी घालण्याचा उल्लेख केला आणि भाजपला प्रचारासाठी रान मोकळे करून दिले.  प्री पोलसर्व्हे पाहता भाजप बॅकफूटवर गेलेली दिसत होती. पण भाजप प्रत्येक निवडणूक अत्यंत अटीतटीची असे समजूनच लढवतो. त्याप्रमाणेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश अशा भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्री, आमदारांनी कर्नाटकमध्ये प्रचाराचा धुरळा उडवला. सोबत केंद्रीय मंत्रीही होतेच. स्वतः अमित शाह यांनी रोड शो केले तर शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य रोड शोसह कर्नाटकात भाजपची हवा निर्माण केली. पंतप्रधान मोदींनी जय बजरंगबलीचा नारा देत निवडणूक कोणत्या वळणावर जाणार आहे हे स्पष्ट केले.

कर्नाटकमध्ये लिंगायत आणि वोक्कलिगा हे दोन समुदाय खूप प्रभावी आहेत. भाजपने वोक्कलिगांना आरक्षण देऊन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर वोक्कलिगांचा राजा केम्पेगौडा यांचे मोठे पुतळेही लावले. एवढेच नव्हे तर टिपू सुलतानाला वोक्कलिगांनीच मारल्याचा प्रचार करीत वोक्कलिगांना आपल्या बाजूने वळवण्याचा भाजपने प्रयत्न केलाय. भाजप, काँग्रेस आणि जेडीएसने जे उमेदवार दिलेत त्यापैकी 45 टक्के उमेदवार हे वोक्कलिगा किंवा लिंगायत समुदायाचे आहेत. भाजपने लिंगायत समुदायातील उमेदवार मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरवलेत. लिंगायत समाजाची 14 ते 18 टक्के मते आहेत तर वोक्कलिगांची 11 ते 16 टक्के मते आहेत. बाकी समुदायाची दोन टक्क्यांपासून पाच टक्क्यांपर्यंत मते आहेत.

सुरुवातीला आपण ओपिनियम पोलचे आकडे पाहिले होते. आता जरा 2018 मध्ये कर्नाटकात झालेल्या विधानसभा आणि 2019  मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांकडे लक्ष टाकूया. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागा तर लोकसभा निवडणुकीत 170 जागांवर आघाडी मिळाली होती. काँग्रेसला विधानसभेला 80 जागा आणि लोकसभेच्या वेळी 36 जागांवर आघाडी होती. 2013 च्या तुलनेत काँग्रेसचं 44 टक्क्यांचं नुकसान झाले होते तर भाजपचा 66 टक्के फायदा झाला होता. जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या आणि लोकसभेला 10 जागांवर आघाडी होती. त्यांच्या मतातही 27 टक्क्यांची घट झाली होती.

आता ही आकडेवारी बघितली तर ओपिनियन पोलचे आकडे काही खरे वाटत नाहीत. शेवटी मतदारांच्या मनात काय आहे हे 13 तारखेलाच समोर येईल. काँग्रेसला पुन्हा उभारी घेण्यासाठी कर्नाटक जिंकणे आवश्यक आहे. कर्नाटकात विजय मिळाला तर त्याचा सकारात्मक परिणाम याच वर्षी होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत होईल. काँग्रेस कार्यकर्ते चार्ज होतील. कर्नाटकात भाजपला कधीही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, पण जर भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरले तर मात्र काँग्रेसला घोर आत्मचिंतन करावे लागेल यात शंका नाही. कारण कर्नाटकातील विजय भाजपला शेजारच्या तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये चांगले यश मिळवण्यास हातभार लावेल. आणि एक प्रकारे भाजपचा वारु दक्षिणेतही जोमाने दौडू लागेल. तसेच या विजयाचा भाजप भरपूर फायदा घेऊन राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कशी अयशस्वी ठरली हे जनतेच्या मनावर बिंबवण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही. एकत्र येत असलेल्या विरोधी पक्षांच्या मनोर्धेयालाही यामुळे धक्का बसेल आणि काँग्रेसलाही 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी हा फार मोठा झटका असेल. 

(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही) 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पाTop 25 : टॉप 25 न्यूज :  8 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaPrakash Ambedkar : ...तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल - प्रकाश आंबेडकरDevendra Fadnavis Security : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावरून राऊतांचा हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget