एक्स्प्लोर

जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद

जेवण किंवा पोटभर खआण्याचा विचार केला की जुन्या आणि कामानिमित्त दक्षिण मुंबईत वारंवार जाणाऱ्या मुंबईकरांना आवर्जुन आठवणारा ब्रॅण्ड म्हणजे भगत ताराचंद..

आजकाल प्रत्येक वस्तूचे ब्रॅण्ड्स असतात...त्या वस्तुंना लोक त्या त्या ब्रॅण्डनुसारच ओळखतात..कपडे, इतर वस्तू यांच्याबरोबरच वर्षानुवर्ष लोकांना आवडणारे पदार्थ आणि रेस्टॉरन्ट्स यांचेही ब्रॅण्ड मुंबईसारख्या मोठ्या शहरात कालांतराने तयार होतात. mumbai एखादा पदार्थ खायचा तर तो विशिष्ट ठिकाणचाच असे चॉईसही तयार होतात आणि अशापद्धतीचे ब्रॅण्डस त्या त्या शहरातील लोकांच्या आयुष्याचा भाग बनून जातात..त्यातही मुंबई शहर म्हंटलं की खाण्याचा बाबतीत आधी डोळ्यासमोर येतं स्ट्रीट फुड आणि त्या रस्त्यावर मिळणाऱ्या पदार्थांमध्येही डोळे झाकून आठवतो तो वडापाव..तसंच जेवण किंवा पोटभर खआण्याचा विचार केला की जुन्या आणि कामानिमित्त दक्षिण मुंबईत वारंवार जाणाऱ्या मुंबईकरांना आवर्जुन आठवणारा ब्रॅण्ड म्हणजे भगत ताराचंद..भगत ताराचंद नावाचं पूर्णपणे शाकाहारी रेस्टॉरन्ट हे मुंबईकर पिढ्यानपिढ्यांची भूक भागवणारं लाडकं केंद्र. जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद आता अगदी मॉलमधल्या फूड कोर्टपासून अनेक ठिकाणी आपल्याला भगत चाराचंदचे रेस्टॉरन्टस दिसतात पण खरे सगळ्यात जुने भगत ताराचंद आऊटलेट्स मात्र काळबादेवी आणि गिरगावचेच.. पदार्थांमध्ये फारसे प्रयोग न करता उत्तम चवीचे पदार्थ किंवा थाळीच्या रुपातलं जेवण ऐन भुकेच्या वेळी लोकांना देणं ही मुंबईतल्या भगत ताराचंद या रेस्टॉरन्टची खरी खासियत..किंवा भगत ताराचंदमध्ये मिळणाऱ्या थाळी किंवा जेवणाचे चाहते भगत ताराचंदबद्दल काहीही सांगण्याआधी एक वैशिष्ट्य अगदी लगेच सांगतात, ते वैशिष्ट्य म्हणजे तिथले फुलके..मऊ लुसलुशीत असे बटर किंवा साजुक तूप लावलेले फुलके ही भगत ताराचंदची खरी ओळख..बाहेर रेस्टॉरन्टमध्ये जेवायला गेल्यावर पंजाबी पदार्थांचा पर्याय डोळ्यापुढे येतो आणि त्याबरोबरच तंदूरमध्ये तयार केलेल्या तंदूरी रोट्या, मैद्याचे नान किंवा रुमाली रोटी असे आपल्यासमोर पर्याय असतात, पण अशी साजुक तुपाची धार असलेली गव्हाची मऊसूत पोळी खाणं ही मात्र घरी करण्याचीच ऐश ठरते, मात्र भगत ताराचंदला इतर रोट्यांबरोबर हा पर्याय मात्र खवय्यांना चांगलीच भूरळ घालतो..खंर तर अनेक प्रकारचे पराठे हीदेखील स्पेशालिटी, लच्छेदार पराठे, कुलछे, आलु, गोबी, मेथी असे पराठे असे पूर्ण जेवण किंवा वन डिश मिल म्हणता येईल असे अनेक पर्याय भगत ताराचंदला उपलब्ध आहेत..पण गेलेला खवय्या मात्र तिथे गेल्यावर फुलक्यांचा मोह टाळूच शकत नाही. त्यातही बटर लावलेली पोळी असा एक पर्याय असूनही कुणी क्वचितच साजुक तूपपेक्षा वेगळा पर्याय स्वीकरत असेल.. sajuk tupatli poli (1) या साजुक तुपाची धार असलेल्या पोळ्यांइतकाच प्रसिद्ध पर्याय आहे तो लस्सी किंवा ताकाचा, हिरव्या काळ्या रंगाच्या कोल्डड्रिंकच्या वाटाव्या अशा बाटल्यांमध्ये इथे ताकाचे विविध प्रकार सर्व केले जातात.. त्यातली कच्छी बियर अर्थात भगत ताराचंदचं स्पेशल ताक हा तर इतर कुठेही बघायलासुद्धा न मिळणारं पेय...खरंच बियरची बाटली पुढे आलीय की काय असं वाटतं आपण ऑर्डर केल्यावर आणि त्या बाटलीतलं ड्रिंक ग्लासात ओतल्यावर मात्र पांढरंशुभ्र पण निराळ्या चवीचं ताक आहे हे लक्षात येतं, साजुक तूप, बटर यांनी परिपूर्ण जेवणाच्या साथीला ही कच्छी बियर म्हणजे भगत ताराचंदमधला मिस करुच नये असा पदार्थ म्हणावा लागेल.. bear भगत ताराचंदमधल्या जेवणातल्या मेन्यूमध्ये मात्र गुजराती, मराठी आणि पंजाबी अशा तीन खाद्यसंसंकृतींची झलक दिसते..पण त्यातही चुकवूच नये असा सेक्शन आहे मेन्यू कार्डातला ड्राय आणि फ्राय नावाचा सेक्शन. बटाटे, भेंडी, फ्लॉवर कारलं, अशा काही भाज्या तळून मस्त मसाल्यात घोळून आपल्यासमोर येतात. त्यातले तळलेले आणि जिऱ्याची फोडणी दिलेले जिरा आलु तर लहानमोठे सगळ्यांनाच खुणावतात. आश्चर्यकारकरित्या एरव्ही नावडत्या भाज्यांच्या यादीत असलेल्या कारल्यासारख्या भाज्यासुद्धा अशा तळून अतिशय चविष्ट लागतात..पंजाबी ग्रेव्ही किंवा रस्सा असलेल्या इतर भाज्यांच्या जोडीला या कोरडया आणि जराशा चमचमीत भाज्यांचा पर्याय जवळपास सगळेच निवडतात.. bhaji तसाच भगत ताराचंदला गेल्यावर लोकांकडून हमखास निवडला जाणारा पर्याय म्हणजे खिचिया पापड. मुंबईतल्या अनेक भागातला लोकप्रिय स्ट्रीटफुड म्हणून खिचिया पापडचं नाव घेता येईल, पण इथे भगत ताराचंदला मात्र बटर खिचिया, मसाला खिचिया, चिज खिचिया असे अनेक पर्याय मिळतात.. या पर्यायांबरोबरच पापड चुरी किंवा खिचिया चुरी असेही दोन स्टार्टर्स इथे मिळतात. पापड किंवा खिचिया पापडाचा चुरा करुन त्यावर भेळेसारखा मसाला टाकून तयार होतो हा चुरी नावाचा पदार्थ. पनीर आणि कबाबसारखे टिपीकल चवीचे स्टार्टर्स नको असतील तर पापड चुरी हा पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला अनेक जण पसंत करतात.. जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद आजकाल बाहेर खायला जायचं म्हटलं तरी आधीच्या तुलनेत कितीतरी जास्त पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात, चायनिज, कॉन्टिनेन्टल, इटालियन, मेक्सिकन, थाय, ब्रिटीश अशा आतंरराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीबरोबच आपल्या देशातल्या विविध राज्यातले खाद्यपदार्थ, स्ट्रीट फुड आणि याच्या जोडीला आजकाल सेलिब्रिटी शेफ्सकडून जे प्रयोग केले जातात ते पदार्थ, असा इतका मोठा खाद्यपसारा असताना पारंपरिक चवींचं आणि काही चायनिज पदार्थांचा अपवाद सोडला तर अगदी परंपरिक पद्धतीचं जेवण जिथे वाढलं जातं अशी भगत ताराचंदसारखी रेस्टॉरन्टची चेन केवळ चालतच नाही तर वाढते ती केवळ चवींमुळेच..इथे प्रत्येकाच्या चवीचा खरंच विचार केला जातो याचं आणखी एक उदाहरण म्हणजे वेचरकडून विचारले जाणारे काही प्रश्न..आपण एखादी भाजी मागवल्यावर विचारलं जातं की तिखट कसं हवंय, मीडियमस कमी की तेज, तसंच लसूण हवंय की नाही..हे प्रश्न विचारल्यानंतर तयार होऊन येणारा पदार्थ हा खरोखर आपल्याला हवा तशाच चवीचा येतो..अगदी मेक टू ऑर्डर.. history गिरगाव आणि झवेरी बाजार या दोन भागात अनेक वर्ष उत्तम जेवणाचा आनंद दिल्यानंतर काही वर्ष हा ब्रॅण्ड अनेक मॉलमध्ये दिसला पण रेस्टॉरन्टच्या स्वरुपात नाही तर फुड कोर्टमधल्या फुड स्टॉलच्या रुपात..पण आता मात्र अगदी ठाणे, नवी मुंबई इथेही भगत ताराचंदची नवी आणि मस्त इंटिरियर असलेली प्रशस्त रेस्टॉरन्ट्स निघाली आहेत..जागा भरपूर असल्याने आरामशीर बैठकव्यवस्था हे या नव्या ब्रॅन्चेसचं वैशिष्ट्य ठरतंय.. meeting जेवणात फारसे प्रयोग न करता पोटभर पण चवदार जेवायचं असेल तर वर्षानुवर्ष चवीच्या आणि आदरातिथ्याच्या कसोटीवर उतरलेला हा ब्रॅण्ड एक उत्तम पर्याय आहे. संबंधित ब्लॉग

जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर

जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई  जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget