एक्स्प्लोर

भारतीय रेल्वे बर्थडे स्पेशल : 'ग्लोबल' अनुभव देणारी मुंबई लोकल

लोकलची गर्दी मला आयुष्यासारखी वाटते, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. उतरताना फक्त उभं राहायचं, मागचे आपोआप पुढे ढकलतात आणि चढणारे खाली खेचून घेतात. यामध्ये फक्त आपल्याला आपला तोल सांभाळता आलं म्हणजे झालं.

भारतीय रेल्वेचा आज 166 वा वाढदिवस… एक मुंबईकर म्हणून माझ्यासाठी या रेल्वेचं महत्त्व खूप जास्त आहे. म्हणायला मुंबईत काम करत असले तरी माझं आणि या रेल्वेचं मूळ ठाण्यातलं. कळायला लागल्यापासून या लोकलशी नातं अगदी घट्ट बांधलं गेलेलं. शाळेतलं शिक्षण संपल्यापासून म्हणजेच अकरावीपासून या ट्रेनचा दररोजचा प्रवास ठरलेला. माझा एकटीचा पहिला ट्रेनचा प्रवास अजूनही आठवतो. अकरावीत अॅडमिशन घेतल्यानंतर बाबांनी मला ठाण्यावरुन सुटणाऱ्या स्लो लोकलमध्ये बसवलं. ट्रेन सुरु झाली आणि डब्यातल्या बायकांनी ती फास्ट ट्रेन असल्याचं सांगितलं. मग काय नको त्या स्टेशनवर उतरुन सुरु झाली धावपळ, जी अजूनही इतक्या वर्षांनीही सुरुच आहे. बाहेरुन येणाऱ्यांना ही लोकल खूप भयानक, गर्दीची, किचकिचाटाची, नकोशी वाटत असली तरी माझ्यासारख्या असंख्य मुंबईकरांना याबद्दल कोणतीच तक्रार नाही. ही मुंबई लोकल फक्त आपल्याला ठराविक स्टेशनपर्यंत सोडण्यासोबत प्रवासात अनेक गोष्टी शिकवते, समजावते. एकदा या लोकलमध्ये चढलं की विविध स्वभावाच्या आणि मूडच्या माणसांशी जुळवून घेणं यातून शिकता येत. सकाळी कोण काकू नवऱ्याशी भांडल्या असोत, कोणाला फोनवर बाॅस ओरडत असो किंवा घरी असलेल्या मुलांवरची चिडचिड असो, सगळी भडास या ट्रेनमधल्या बायकांवरच निघते. मग कोणी डोंबिवलीवालं म्हणून दादागिरी करतं तर कोणी ठाण्याला चढणारं म्हणून. कधी यामध्ये तुमची लायकी निघू शकते, तर कधी तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहिली जाते. बायका तर हल्ली कोणत्याच क्षेत्रात मागे नाही दाखवायचं म्हणून की काय मारामारी देखील कमी जागेत करुन दाखवतात. सगळं वाईट किंवा निगेटिव्हच यामध्ये घडतं असं नाही, कोणाला बरं नसेल तरी यामध्ये सगळ्या जणी एकत्र येऊन प्रथमोचार करतात, त्या महिलेला तिच्या पोहचण्याच्या ठिकाणी सोडतात. कोण कधी कशामुळे रडत असेल तरी इथं असणाऱ्या अर्ध्या तासात तिच्यावर काऊंसिलींग देखील करतात. संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या महिला वेळ वाचवण्यासाठी भाजी निवडतात तर कधी आपल्याला होणारे त्रास इतरांशी शेअर करतात. पावसाच्या दिवसात एक महिला आपल्या काही दिवसांच्या तान्हुल्याला घेऊन चालली होती. खूप पाऊस होता. लोकलच्या दरवाज्यात तशीच बसली होती. अनेक महिलांनी तिला आपली सीट देऊ केली पण तिचा तोराच वेगळा होता. नंतर बाळाला खूप थंडी वाजायला लागली. लोकलमध्ये पैसे मागण्यासाठी आलेल्या तृतीयपंथियांनी ते पाहून स्वतःची ओढणी, मागितलेले आणि असलेले पैसे दोन्ही त्या बाईला दिले. अंगावर ब्रॅण्डेड कपडे असून ही गरीब असल्यासारखं जाणवलं. कोणाला निःस्वार्थी मदत कशी करावी, हे देखील ही लोकलच शिकवते. मला सगळ्यात चांगली गोष्ट या लोकलने शिकवली ती म्हणजे भांडायला. आधी आपण खूप सुरक्षित वातावरणात वाढलेलो असतो. भांडण करणं आलेल्या परिस्थितीशी लढणं या गोष्टी आपल्या कक्षेतल्या नसतात. पण लोकलमध्ये सतत लागणारे कोपरे, पुढचीचे तोंडात जाणारे केस, कोणाची पोटात खुपसली जाणारी पर्स, पायावर पडणारे पाय आपल्याला भांडखोर व्यक्ती महणून विकसित करत जाते. या ट्रेनमधले असंख्य अलिखित नियमसुद्धा आत्मसात करुन कृतीत आणणं म्हणजे मुंबईकर होण्याचं लक्षण मानता येऊ शकतं. चौथ्या सीटवर कोण बसणार, उतरताना कोणत्या लाईनमधून उतरायचं, सीट कोणाला विचारायची, ट्रेनमधून कोणत्या बाजून चढायचं, बाजूला उभं राहायला जागा असेल तर कुठून जायचं, पर्स असेल तर कुठं ठेवावी आणि लॅपटाॅप बॅग असेल तर शिव्या खाण्याची सवय कशी लावून घ्यायची,  हे असे अनेक नियम समजून प्रवास करणं तुमच्यासाठी सोयीचं ठरु शकतं. लोकलची गर्दी मला आयुष्यासारखी वाटते, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. उतरताना फक्त उभं राहायचं, मागचे आपोआप पुढे ढकलतात आणि चढणारे खाली खेचून घेतात. यामध्ये फक्त आपल्याला आपला तोल सांभाळता आलं म्हणजे झालं. कमी वेळात, कमी पैशांमध्ये एखाद्या ठिकाणी सोडणारी हीच ती लोकल. एकदा का यामध्ये चढणं जमलं की आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोप्या नक्कीच होतात. आई सांगते, लहान असताना ट्रेनच्या गर्दीत नेलं की मी इतर बायकांचे केस ओढायचे. केस ओढण्यापासून ते इतरांच्या भांडणाच्या केस सोडवण्यापर्यंतचा शहाणपणा या लोकलनेच शिकवला. हॅपी बर्थडे भारतीय रेल्वे!
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Embed widget