एक्स्प्लोर

फूडफिरस्ता : साताऱ्याचं चंद्रविलास

वाटाण्याच्या रश्यात बेसन पीठ पेरुन, त्याला स्वतःच्या मसाल्याची दिलेली जोड म्हणजे चंद्रविलासची मिसळ, एकदमच हटके !

मध्यंतरी अनेक महिन्यांनी पुन्हा सातारला जायचा योग आला. काही वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त सातारच्या आसपास अनेकदा जाणं व्हायचं. नीरा नदी ओलांडून पलिकडच्या बाजूच्या धाब्यांवर/हॉटेलमध्ये केलेल्या खादाडीच्या आठवणी, हा लेखासाठी स्वतंत्र विषय होईल. त्यामानानी सातारा शहरात खायचा योग फार कमी वेळा आला. मिसळ महोत्सवाच्या आधी सातारची माहेरवाशीण मैत्रीण, सौ.कांचन भावे आणि तिचा नवरा निलेश यांनी साताऱ्यातल्या ‘चंद्रविलास भुवन’च्या मिसळीचं तोंड भरून कौतुक केलं. त्यावेळी साताऱ्यातून एवढ्या वेळा ये-जा करून इथली मिसळ न खाल्ल्याची टोचणी लागली होती. पण नंतरचं आश्चर्य म्हणजे मिसळ महोत्सवाचे नाव ऐकून खुद्द चंद्रविलासचे पार्टनर श्री.वसंतराव जोशी यांनीच मिसळ महोत्सवाला हजेरी लावली. पहिल्याच भेटीत या अस्सल सातारकर माणसाशी स्नेहबंध जुळले. वसंतरावांचं एकदा तरी हॉटेलला येऊन जाण्याचं आमंत्रण मिळालं आणि महोत्सवानंतरच्या पहिल्याच भ्रमंतीत कामावरून परतताना,वसंतरावांना फोन करून ‘चंद्रविलास भुवन’ला भेट दिली. सातारच्या बाजारपेठेत अगदी मुख्य रस्त्यावर असलेलं चंद्रविलास म्हणजे एकदम गजबजलेलं ठिकाण. एकावेळी पाचसहा जण बसतात अशी टेबलं असलेलं, साठसत्तर माणसांचे हॉटेल. टेबलं फार नसतील तरी रिकाम्या होणाऱ्या जागी एकेक-दोनदोन माणसं, आपापली ‘अॅडजेस्ट’ करून बसणार, ही टिपिकल गावाकडची मोकळीढाकळी पद्धत. त्यांचं खाणं झाल्यावर लगेच टेबलावर फडका मारुन पुढच्या ग्राहकाला जागा रिकामी. त्यामुळे ग्राहकांचा राबता सतत. अगदी मिनिटभरही इथली जागा रिकामी रहात नसेल. ज्याच्यासाठी नाव ऐकलं होतं, त्या मिसळीची ऑर्डर पहिल्यांदा दिली. मिसळीची चव घेतल्यावर पहिल्यांदा तर सुखद धक्का बसला. पुणे,कोल्हापूर किंवा नाशिक या मिसळ डेस्टिनेशन्स मध्ये मिळणाऱ्या साधारण तिखट मिसळींपेक्षा अत्यंत वेगळी मिसळ. फूडफिरस्ता : साताऱ्याचं चंद्रविलास वाटाण्याच्या रस्यात बेसन पीठ पेरून, त्याला स्वतःच्या मसाल्याची दिलेली जोड म्हणजे चंद्रविलासची मिसळ, एकदमच हटके !  तिखटपणाचं मला वावडं बिलकुलच नाही पण महाराष्ट्रातील शेकडो मिसळी खाल्यानंतर त्यातल्या तिखटपणापेक्षा ही, त्यातला चविष्टपणा (असला तर) जास्त भावतो. या पातळीला आता पोचलोय. अशा वेगवेगळे मसाले वापरून,‘जमवून आणलेल्या चवींच्या’ मिसळीशी,आपलं गोत्र बरोब्बर जुळतं. सोबतीला माझ्या आवडीची कांदा भजी घेतली. तीही एकदम गरम आणि कुरकुरीत,मजा आ गया ! मिसळ खाताना एकीकडे रस्याचा वाडगा आग्रहानी वाढला जात होता. अशी चविष्ट मिसळ खाताना सोबतीला नशिबानी जर अशी गरम, कुरकुरीत कांदा भजी मिळाली तर, मिसळीच्या रस्यात पावाऐवजी तीच चवीनी बुडवून खावीत! शास्त्र असतं ते .. फूडफिरस्ता : साताऱ्याचं चंद्रविलास मिसळ झाल्यावर माझ्या सवयीप्रमाणे मी त्यांच्याकडे कॉफीची विचारणा केली. पाहुणचारासाठी त्यांनी माझी ती मागणी पुरवलीदेखील. एकदा त्यांच्याकडचा ‘गोल्ड’ म्हणजे चहा प्यायची विनंती केली. पूर्वी भरपूर चहा प्यायलेला असला तरी, मी खरा कॉफीप्रेमी! थोड्या अनिच्छेनेच मी त्याला हो म्हणालो, पण पहिल्या घोटानीच त्या ‘गोल्ड’चा ‘फॅन’ झालो. चहाची तरतरी कशी असते याची अनुभूती म्हणजे “चंद्रविलासचा गोल्ड” !.’गोल्ड’चं यापेक्षा जास्त वर्णन करण्यापेक्षा मी तुम्हाला, तो साताऱ्याच्या चंद्रविलासमध्ये जाऊन प्यायचा आग्रह करीन. आता वसंतराव, प्रवीण, प्रफुल्ल हे बंधू आणि त्यांच्या कुटुंबीय चालवत असलेल्या चंद्रविलासची सुरुवात, त्यांचे वडील कै.शंकरलाल जोशी यांनी गुरुवार परजजवळ, शिवसागर सिनेमासमोर केली. 1948 सालापासून एकाच जागी असलेलं चंद्रविलास, इमारतीच्या नुतनीकरणामुळे, तब्बल सत्तर वर्षांनी सातारच्या मोती चौकाजवळ म्हणजे सध्याच्या जागेत शिफ्ट झालं. जागेबरोबरच आता मेन्यूकार्डही मोठं झालं. नवीन जागी आल्यावर इथला मसाला डोसा, कांदा उत्तप्पा, पावभाजी या पदार्थांचाही आस्वाद घ्यायची संधी मिळाली. तेही चवीला मिसळीएवढेच उत्कृष्ट. पण मिसळ आणि गोल्ड खालोखाल आवडलेला पदार्थ म्हणजे पुण्या-मुंबईत ज्याला, “उपास कचोरी”, म्हणलं जातं, तो इथला ओल्या खोबऱ्याचा ‘पॅटीस’. कोवळ्या खोबऱ्याच्या गोड सारणात, हिरव्या मिरचीचे तुकडे पेरून केलेले तिखटगोड ‘पॅटीस’ म्हणजे अफलातून चवीचा प्रकार आहे. फार वर्णन करण्यापेक्षा,तुम्ही स्वतः अनुभूती घ्यावी हे उत्तम. साताऱ्याच्या आसपास गेलो तर चंद्रविलासला भेट देऊन येणं, हा माझ्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून रिवाज बनून गेला आहे. रेस्टॉरंटच्या बाहेरच्या बाजूलाच असलेल्या मिठाई आणि नमकीन काउंटरवर मिळणारी चंद्रविलासचे फरसाण,कोणताही कृत्रिम रंग न घातलेली जिलबी येताना घरी घेऊन यावंच लागतं. फूडफिरस्ता : साताऱ्याचं चंद्रविलास स्वतः मालकांशी असलेल्या ओळखीचा फायदा आणि हॉटेल व्यवसायाचा एक विद्यार्थी म्हणून,दोन्ही जागा मी संपूर्ण फिरून पाहिल्या आहेत. आधीची जागा थोडी लहान होती,त्यापेक्षा आताची मोठी आणि दुमजली आहे. पण दोन्ही जागी डोळ्यांना जाणवलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, इथली स्वच्छता. एवढा सततचा राबता असलेल्या हॉटेलमध्ये कचरा किंवा टेबलावर काही सांडलेले  खरकटे, अक्षरशः एक मिनिट दिसेल तर शपथ. फाईव्ह्स्टारवाल्यांनी शिकायला यावी अशी टापटीप. फक्त रेस्टॉरंटमध्येच नाही तर किचनमधेदेखील. आकारमानाने फार मोठे नसले तरी मध्यम ‘साईझ’च्या हॉटेलमध्ये स्वच्छतेकरता नेमलेल्या कर्मचारीवर्गाची संख्या मला भरपूर दिसली. तरीही टेबलावर कुठे कपडा मारायचा बाकी आहे, असं दिसलं तर स्वतः जोशी कुटुंबीयांपैकी कोणीही चटकन पुढे होऊन बिनबोभाट ते काम करून मोकळे होताना दिसतात. भांडी चांगली घासायला, अद्ययावत ‘डिशवॉशर’ चा उपयोग करणारी मध्यम आकाराची हॉटेल्स फार कमी आढळतात. विशेषतः साताऱ्यासारख्या लहान शहरात. पण तोही इथे आहे. या सगळ्याकरता स्वतःला स्वच्छतेचा ध्यास असलेली मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाची असते. ती जोशी कुटुंबियांच्या रूपाने इथे पिढ्यानपिढ्या टिकून आहे. सगळ्या पदार्थांचा उत्तम दर्जा, स्वच्छता, टापटीप, नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर ग्राहकाशी सौजन्यपूर्ण वागणं, त्यामुळे ग्राहकांच्या तीन पिढ्यांशी टिकून राहिलेली चांगले संबंध हे सगळं असूनही, अजूनही एक वैशिष्ट्यामुळे चंद्रविलास लक्षात रहातं. ते म्हणजे इथल्या एका ‘भिंतीमुळे’. हॉटेलमध्ये प्रवेश करताना डावीकडेच असलेली एक भिंत,जुन्या सिनेतारेतारकांच्या फोटोंनी सजवलेली आहे. दिलीपकुमार,दे व आणि राज या त्रिमूर्तीबरोबरच, ‘मदर इंडिया’मधले सुनील दत्त,राजेंद्रकुमार आणि ‘हाफ तिकीट’,’चलती का नाम गाडी’मधला हरहुन्नरी किशोर या हिरोंबरोबर नूतन, मधुबाला, नर्गिस, वैजयतीमालांच्या अनवट चित्रांचा एक सुरेख ‘कोलाज’, सात आठ फुटी लांबीच्या भिंतीवर लावला आहे. हॉटेलात येताजाता न चुकता त्यावर नजर पडतेच. माझ्या पिढीने सिनेसृष्टीचा न पाहिलेला तो काळ एका झटक्यात डोळ्यासमोर येतो. चविष्ट चवीकरता येत असलेल्या ग्राहकांच्या दिवसभराच्या वर्दळीतही, मनाच्या कोपऱ्यात रसिकता जपणाऱ्या वसंतराव आणि जोशी कुटुंबियांना दाद देत मी,त्यांच्या आतिथ्यशील पाहुणचाराचा निरोप घेतो.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
ABP Premium

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget