एक्स्प्लोर

भारतीय जनतेचं संज्ञान असंतुलन - 'मोदी व गांधी'

राहुल गांधी कसे एखाद्या वृद्ध स्त्रीला प्रेमाने आलिंगन देतात, गरिबांच्या घरी कसे मुक्काम करतात, मार्शल आर्टमध्ये कसे पारंगत आहेत, परदेशातील विद्यापीठात कसे त्यांचे भाषण गाजते, दोन-चार राज्यातील निवडणूक त्यांनी कशी जिंकली, सूटबूटकी सरकार असे बोलत मोदींना कसे कोंडीत पकडले, मोदींना कशी मिठी मारली वगैरे गोष्टींमधून राहुल गांधींचे समर्थक स्वतःचा Cognitive Dissonance कमी करायचा प्रयत्न करत राहतात. मोदींचे समर्थकही अशाच पद्धतीने मोदींच्या कुटुंबापासून वेगळे राहण्यात, त्यांच्या भाषणात, परदेश दौऱ्यातल्या भाषणात आणि अक्षयकुमार वगैरे लोकांना दिलेल्या मुलाखतीतून स्वतःचा Cognitive Dissonance कमी करतात.

1957 साली लिऑन फेस्टिंगर नावाच्या संशोधकाने मानसशास्त्रात एक थिअरी मांडली, संज्ञान असंतुलन (Cognitive Dissonance) ची. ही थिअरी थोडक्यात असं सांगते की प्रत्येक मनुष्य जगाबद्दल, आजूबाजूच्या गोष्टींबद्दल आणि स्वतःबद्दल काही समज, संकल्पना आणि मूल्ये घेऊन जगत असतो. ह्या जगण्यात जे काही आचार असतात किंवा अनुभव येतात ते तर त्या व्यक्तीच्या समज, संकल्पना किंवा मूल्यांच्या विरोधात असतील तर मनुष्याला त्यामुळे त्रास होतो. हा त्रास किंवा तणाव (stress) कमी करण्यासाठी मग तो मनुष्य एकतर स्वतःचे समज, संकल्पना आणि मूल्ये सुधारून घेतो, किंवा स्वतःचे वर्तणूक बदलतो किंवा आजूबाजूच्या घटनांकडे पाहण्याची पद्धतच बदलतो आणि स्वतःला होणारा त्रास कमी करून घेतो. Cognitive Dissonance ही थोडक्यात स्वतःच्या कल्पनेतली आदर्श स्थिती आणि वस्तुस्थिती यांची सांगड घालण्याचा एक असा प्रयत्न असतो ज्याने दुःख कमी व्हावे. Cognitive Dissonance चं एक सर्वत्र सांगितले जाणारे उदाहरण असे आहे. माझा समज आहे की सिगारेट पिणे हे आरोग्यासाठी अपायकारक आहे आणि तरीही मी सिगारेट पितो हा माझा आचार आहे. अशा वेळेस माझ्या मनात माझा समज आणि त्याच्याशी विसंगत आचरण यांच्यात एक द्वंद्व सुरू राहते जे मला सतत त्रास देत राहते. यावर उपाय म्हणून मी तीन प्रकारे व्यक्त होऊ शकतो. पहिला प्रकार म्हणजे मी माझा आचार बदलतो आणि सिगारेट पिणे सोडून देतो. दुसरा प्रकार म्हणजे सिगारेट आरोग्यास हानीकारक आहे हा माझा समज पुरेशा वैज्ञानिक अभ्यासावर अवलंबून नाही असा निष्कर्ष मी काढतो आणि माझा समजच बदलून टाकतो. तिसऱ्या प्रकारात सिगारेट पिल्याने ताण कमी होतो, माणूस स्मार्ट दिसतो वगैरे कारणे देत मी सारवासारव (rationalization) करतो आणि माझ्या समजात आणि वर्तनात कसा फरक नाहीये हे स्वतःला पटवून देण्यास कारणे निर्माण करतो. आपण शाळेत असताना ऐकलेली कोल्हा आणि द्राक्षाची गोष्ट ही याचे सर्वात सोपे उदाहरण आहे. भारतीय राजकारणात आज दोन लोकांमुळे बहुतांश (किंबहुना साऱ्याच) लोकांना एका मोठ्या Cognitive Dissonance ला सामोरे जावे लागत आहे, ते दोन लोक म्हणजे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी. काँग्रेसचा तथाकथित (कारण अजून काहीच सिद्ध नाहीये) भ्रष्टाचार, काळा पैसा, धोरण लकवा, खुंटलेला विकास, अतिरेकी कारवाया, महागाई, महिलांवरचे अत्याचार, शेतकरी आत्महत्या इत्यादी बाबत देशभर एक मोठा आक्रोश निर्माण केला गेला. या आक्रोशाला शांत करण्यासाठी आणि देशाला विकासाच्या मार्गावर गतिमान करण्यासाठी नरेंद्र मोदी नावाचा एकमेव पर्याय समोर ठेवण्यात आला. एकमेव यासाठी की मोदींच्या प्रत्येक विरोधकाला तो/ती कसे मूर्ख, भ्रष्ट्राचारी आणि सत्तेसाठी हपापलेले मूल्यविहीन राजकारणी आहेत हे सांगीव गोष्टींद्वारे आणि शिस्तबद्ध प्रॉपगंडा करून उद्ध्वस्त करण्यात आले. यातून 2014 साली एका अजस्त्र बहुमताद्वारे मोदी सत्तेत आले. पण मोदी सत्तेत आल्यानंतर मात्र लोकांच्या त्यांच्याकडूनच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात वरचेवर प्रचंड तफावत होत गेली. शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्नाचा केलेला वायदा फोल ठरला. नोटबंदीने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला आणि असंघटित क्षेत्रांत दीर्घकालीन मंदी आली. हीच मंदी हळूहळू पाय पसरत ऑटोमोबाईल आणि इतर क्षेत्रात पसरली. GST च्या गडबडीत केलेल्या अंमलबजावणीने छोटे व्यापारी आणि उद्योग कायमचे बसले. घटलेले थेट करसंकलन, 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आणि रिझर्व्ह बँकेकडून वारंवार मागितला जाणारा राखीव निधी या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या भीषण वास्तवाची जाणीव करून द्यायला पुरेशा आहेत. गेल्या 5 वर्षात जवळपास 3.6 कोटी लोकांचा रोजगार गेलाय हे अत्यंत चिंताजनक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगाचा विकासदर कमी होण्यास भारताला जबाबदार धरले आहे हेही काळजीचे मोठे कारण आहे. मोदींची मोठमोठाली आश्वासने, त्यातून बांधल्या गेलेल्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातली आर्थिक व सामाजिक दुरावस्था पाहून झालेला अपेक्षाभंग निश्चितच भारतीय जनतेसाठी अत्यंत त्रासदायक आहे. हा Cognitive Dissonance भरून काढण्यासाठी भारतीय जनता वरचेवर स्वतःचे विचार, आचार आणि दृष्टिकोन बदलत आहे. आणि हे बदल होत राहून त्यातून जनतेचा तणाव कमी व्हावा यासाठी मोदींचे सरकारही कायम प्रयत्नशील असते. अशावेळी बाबरीचा न्यायालयीन निकालसुद्धा सरकारच्या शिरपेचात तुरा म्हणून म्हणून या त्रस्त जनतेकडून पाहिला जातो. 370 कलम रद्दबातल करणे, ट्रिपल तलाक हटवणे, CAA, NRC, NPR, JNU वरचा हल्ला किंवा अगदी निर्भया प्रकरणातल्या आरोपींची फाशीसुद्धा मोदीसमर्थक भारतीयांना स्वतःच्या अपेक्षाभंगाचे दुःख कमी करण्यासाठी पुरेसा ठरत जातो. सरकार हेतुपुरस्सर अशी काही कारणे आणि विवाद सतत जागृत ठेवून स्वतःच्या समर्थकांना गुंतवून ठेवते. जी गोष्ट मोदींची तीच राहुल गांधींची. गेली 16 वर्षे राजकारणात सक्रिय असूनही आणि वारंवार मोठ्या संधी मिळूनही त्यांना स्वतःचा विशेष ठसा उमटवता आला नाहीये. देश जेव्हा अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात असतो, जेव्हा काही मुद्दे देशभर आक्रोश पसरवतात नेमके तेव्हा राहुल गांधी देशाबाहेर निघून गेलेले असतात किंवा देशात असले तरी जमिनीवर उतरत नाहीत. जेव्हा त्यांच्याकडून शांततेची अपेक्षा असते तेव्हा ते स्वतःच्या सरकारचे निर्णय प्रेस कॉन्फरन्समध्ये फाडतात आणि जेव्हा त्यांनी खरंच एखाद्या गोष्टीवर तडाखेबंद भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते तेव्हा ते स्वतःच्या पदाचा राजीनामा देण्याच्या गोष्टी करतात. या गोष्टी राहुल गांधींना एक हंगामी आणि बिनभरवशाचा राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण करतात, जी वास्तविक आहे. पण राहुल गांधींकडून होणारा अपेक्षाभंग भरून काढायला त्यांचे समर्थकही तेवढेच तयार असतात जेवढे मोदींचे समर्थक. राहुल गांधी कसे एखाद्या वृद्ध स्त्रीला प्रेमाने आलिंगन देतात, गरिबांच्या घरी कसे मुक्काम करतात, मार्शल आर्टमध्ये कसे पारंगत आहेत, परदेशातील विद्यापीठात कसे त्यांचे भाषण गाजते, दोन-चार राज्यातील निवडणूक त्यांनी कशी जिंकली, सूटबूटकी सरकार असे बोलत मोदींना कसे कोंडीत पकडले, मोदींना कशी मिठी मारली वगैरे गोष्टींमधून राहुल गांधींचे समर्थक स्वतःचा Cognitive Dissonance कमी करायचा प्रयत्न करत राहतात. मोदींचे समर्थकही अशाच पद्धतीने मोदींच्या कुटुंबापासून वेगळे राहण्यात, त्यांच्या भाषणात, परदेश दौऱ्यातल्या भाषणात आणि अक्षयकुमार वगैरे लोकांना दिलेल्या मुलाखतीतून स्वतःचा Cognitive Dissonance कमी करतात. अत्यंत तटस्थपणे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांकडे पाहिले तर त्यांनी भारतीय जनतेला दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाहीये. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून अत्यंत सुमार राहिलेले आहेत, आणि त्याहीपेक्षा सुमार राहुल गांधी विरोधी पक्षातले तथाकथित सर्वात मोठे नेते म्हणून राहिले आहेत. हे भारतीय जनतेचे दुर्दैव आहे की जे सत्तेत आहेत त्यांना देशाला कुठे आणि कसे न्यायचे आहे याचा पत्ता नाही आणि जे विरोधात बसलेत त्यांनाही स्वतःच्या जबाबदारीची जाणीव नाही. देशातली जवळपास 70% जनता या दोन महानुभावांच्याकडून अपेक्षा ठेवून पश्चात्ताप करत आहे. आणि हा पश्चाताप कमी करण्यासाठी या लोकांनी स्वतःचे काही ग्रह बनवून ठेवले आहेत. ही त्रस्त जनता मग सोशल मीडियात एकमेकांना भांडून आपलाच नेता कसा योग्य याचे समर्थन करत स्वतःला होणारा त्रास कमी करत वास्तवापासून दूर पळत आहे. भारतातले राजकारण सध्या अत्यंत दिशाहीन आणि कर्मदरिद्री पातळीला पोहोचलेले आहे. भारतीय जनमानस या दोन्ही नेत्यांना पर्याय शोधत आहे जो आजच्या घडीला तरी दृष्टीक्षेपात नाही कारण हे दोन्ही लोक ज्या संघटनेतून येतात तिथे एकतर कट्टरता किंवा घराणेशाही हा वर जाण्याचा निकष आहे. आणि या दोन्ही गोष्टी या देशाला दीर्घकाळ अमान्य आहेत. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कामात सपशेल अपयशी ठरलेले आहेत पण बहुतांश जनतेला हे मान्य करणे त्यांच्या Cognitive Dissonance मुळे जड जात आहे. म्हणूनच आपापल्या समर्थकांच्या अंध पाठिंब्याने नरेंद्र मोदी परत मोठ्या मताधिक्याने निवडून येतात आणि राहुल गांधीही काँग्रेसमधले पद सोडून देऊनही पक्षाचे अघोषित राजपुत्र म्हणून चर्चेत राहतात. भारतीय जनतेचा हा Cognitive Dissonance जेव्हा संपेल तो या देशासाठी सुदिन असेल, कारण राजकारण भावनिक मुद्द्यांसाठी, बदला घेण्यासाठी किंवा शाब्दिक मनोरंजनासाठी नाही तर विधायक कार्याने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते हे आपल्याला जनता म्हणून अजूनही उमगले नाहीये. टीप- या ब्लॉगमध्ये लिहिलेली मतं लेखकाची स्वत:ची आहेत. या मताशी एबीपी न्यूज नेटवर्क सहमत असेलच असं नाही. 
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्तMVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कारManoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड आला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड आला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Embed widget