एक्स्प्लोर
Advertisement
फिडेल कॅस्ट्रो : अमेरिकेचा झंझावात रोखणारं वादळ
अमेरिकेसारख्या बलाढ्या देशाच्या पायथ्याचा क्युबा देश. खरंतर अमेरिकेपुढे एखाद्या मुंगीएवढा. वेगवेगळ्या मुद्द्यांवर अमेरिकेचा नेहमीचा विरोध असतानाही या मुंगीएवढ्या देशाने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून स्वतंत्र अस्तित्व कायम राखलं. क्युबा या छोट्याशा देशाने बिनदिक्कीतपणे अमेरिकेला आव्हान निर्माण करण्यामागची प्रेरणा आणि ताकद म्हणजे - ‘फिडेल कॅस्ट्रो’.
फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म क्युबातील एका सुख-समृद्ध कुटुंबात झाला. घरात जन्मजात श्रीमंती असल्याने तशी त्यांना कसलीही कमी नव्हती. मात्र, वाढत्या वयानुसार छोट्या फिडेलला समज येत गेली आणि आजूबाजूची स्थिती फिडेलला कळू लागली. आपण राहतो ते जग आणि दिनदुबळ्यांचं जग यातली तफावत त्याच्या काळजाचा ठाव घेऊ लागली. यातूनच पुढे ते मार्क्सवादी-लेनिनवादी बनले.
रोमन कॅथलिक स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी हावाना विद्यापीठातून वकिली केली. तिथेच समाजशास्त्रात पदवीही मिळवली. शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत हुशार असणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबातील तत्कालीन राजवटीविरोधात बंड पुकारलं.
क्युबात त्यावेळी बॅतिस्ता यांची राजवट होती. बॅतिस्ता यांची सत्ता अमेरिकेच्या जवळ जाणारी मानली जायची. किंबहुना, अमेरिकेनेही वेळोवेळी फिडेलविरोधात कधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रक्ष भूमिका घेत बॅतिस्ताला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले. याविरोधात फिडेल धाडसाने उभा राहिला.
1953 मध्ये पहिल्यांचा बॅतिस्ता सत्तेविरोधात फिडेल यांनी सशस्त्र बंड पुकारलं. लोकांमधून उठाव केला. 100 साथीदारांसोबत फिडेलने राजवटीविरोधात हल्ला केली. मात्र, हे सारे प्रयत्न अयशस्वी झाले. या हल्ल्यानंतर फिडेल आणि त्याचा भाऊ राऊल यांना तुरुंगात डांबण्यात आलं. दोन वर्षांनंतर सुटका झाली. मात्र फिडेल गप्प बसला नाही. त्याने पुन्हा जुलुमी राजवटीविरोधात आवाज बुलंद केला. यावेळी अर्जेंटिनाचा तरुण क्रांतिकारी नेता चे गव्हेराही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढला.
अखेर 1959 साली भ्रष्टाचार, असमानता आणि जुलमी राजवटीचं प्रतिक बनलेल्या बॅतिस्ता सत्तेचा पाडाव करुन फिडेल सत्तेवर आला. फिडलेला जनतेचा अफाट समर्थन मिळालं.
अखेर 1959 साली क्युबात क्रांती झाली. क्युबाने साम्यवादी विचारसरणी अवलंबली. ही क्रांती दडपण्यासाठी अमेरिकेने नाना प्रयत्न केले. मात्र, राऊल कॅस्ट्रो आणि अर्जेंटिनाचा क्रांतीकारी नेता चे गव्हेरा यांच्या मदतीने फिडेलने अमेरिकेला नमतं घ्यायला लावलं.
फिडेल कॅस्ट्रो हे क्युबामधील कम्युनिस्ट पार्टीचे पहिले सचिव होते. फेब्रुवारी 1959 ते डिसेंबर 1976 एवढा दीर्घ काळ त्यांनी क्युबाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर राष्ट्रपती म्हणून काम पाहू लागले. जुलै 2006 साली प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी सर्व सूत्र राऊल कॅस्ट्रो यांच्याकडे सोपवली. शिवाय, फेब्रुवारी 2008 साली त्यांनी राष्ट्रपतीपदाचाही राजीनामा दिला. एखाद्या देशाचं प्रमुखपद एवढा मोठा काळ सांभाळणारे फिडेल कॅस्ट्रो हे जगात एकमेव नेते होते.
क्रांती यशस्वी झाल्यानंतरही फिडेलला अमेरिकेने त्रास देण्याचं कमी केलं नाही. अनेकदा फिडेल यांच्यावर जीवघेणे हल्लेही झाले. संशयाची सुई अमेरिकेकडेच वळली. सीआयएने फिडेल यांच्या हत्येचा कट रचल्याचा अनेक कथा गोपनीय दस्तावेजातून उघड झाल्या. मात्र, फिडेल कधीही डगमगला नाही. डझनभर अमेरिकन अध्यक्ष आणि बलाढ्य सीआयएला एकटा फिडेल पुरुन उरला.
दहशतवादी कारवायांचा समर्थक देशांच्या यादीत क्युबाचा समावेश केल्याने अमेरिकेविरोधातील फिडेल यांचं मत अधिक तीव्र झालं होतं. शिवाय, आयात-निर्यातीवर बंधनंही घातली गेली होती. अशा अनेक कारणांनी क्युबाची अमेरिकेविरोधातील भूमिका पेटत राहिली.
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा क्युबा दौऱ्यावर गेले होते. कित्येक दशकं बलाढ्य अमेरिका आणि छोट्याशा क्युबामध्ये विस्तव जात नव्हतं. ओबामांच्या रुपाने तब्बल 90 वर्षांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने क्युबाच्या मातीवर पाय टेकले. मात्र, तरीही संबंध फार काही सुधारले अशातला भाग नाही. कारण त्यावेळीही ओबामा यांनी राऊल कॅस्ट्रोंची भेट घेतली. मात्र फिडेल कॅस्ट्रो यांना भेटणं टाळलंच.
असा थरारक जीवनप्रवास असणारा क्रांतिकारी नेता वयाच्या 90 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला.
संबंधित बातमी : महान क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement