एक्स्प्लोर

CSK vs MI IPL 2025: वानखेडेवर मुंबईकरांचा जलवा

काल झालेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई या पारंपारिक द्वंद्वांमध्ये मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांमधील मुबई करांचा जलवा पाहायला मिळाला...प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई कडून आयुष आणि शिवम हे दोघे चमकले तर नंतर फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघातून रोहित...सूर्यकुमार हे दोघे..अर्थात चेन्नई संघाकडून रवींद्र जडेजा याने उत्तम खेळ करून चेन्नई संघाला एक सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली हे सुद्धा तितकेच खरे....१७७ धावसंखेचे आव्हान घेऊन उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवात आज सुद्धा दमदार झाली...१९ चेंडूत  २४ धावा करून रिकल्टन बाद झाला पण त्याने रोहित सोबत ४० चेंडूत ६३ धावांची भागीदारी केली होती.. त्यानंतर सुरू झाली ती नयनरम्य फटकेबाजी....क्रीडारसिकांसाठी अस्सल मेजवानी..काय नव्हते त्या मेजवानीत..रोहित शर्मा याचा देखणा पुल...रुबाबदार पीक अप...मनमोहक कव्हर ड्राईव्ह... उद्धट स्लॉग...तर दुसऱ्या बाजूने स्वीप या फटाक्याची विविधता ..आणि ती किती असावी  वाय डिश डीप मिड विकेट पासून लाँग लेगपर्यंत..
सूर्याचा स्लॉग स्वीप..आणि यॉर्कर वर अँटीसेपेशन करून मारलेला एक्सट्रा कव्हर वरून षटकार..कालच्या सामन्यातील सर्वात सुंदर फटका ..जेव्हा सूर्या आणि रोहित खेळत होते तेव्हा जणू काही ते त्यांच्या मनाप्रमाणे गोलंदाजाला गोलंदाजी करायला लावत होते अशी शंका यावी असे त्यांचे फुटवर्क होते.

सामना संपल्यावर सुनील गावसकर एका वहिनीवर बोलत असताना म्हणाले की "सूर्यकुमार याचे अँटिसिपेशन १० पैकीं ९ वेळा बरोबर असते इतका तो जीनियस आहे" त्याने जडेजाला एकच षटकात कव्हर ड्राईव्ह मारून पुढील चेंडू स्वीप करून धावा वसूल केल्यात..रोहित आणि सूर्यकुमार यांच्यात ५४ चेंडूत ११४ धावांची भागीदारी झाली आणि सामना १६ व्या षटकात मुंबई चा झाला..आज प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाचा पहिला बळी लवकर गेल्यावर पहिलाच सामना खेळणाऱ्या आयुष यांने आपण मुंबई च्या रणजी संघात का आहोत हे दाखवून दिले..१५ चेंडूत ३२ धावा करताना त्याने पूल.. फ्लिक.. ड्राइव्ह  हे फटके खेळून आपण लंबी रेस का घोडा आहोत याचे संकेत दिले...काल वैभव सूर्यवंशी आणि आज आयुष म्हात्रे या दोघांनी आय पी एल च्या क्षितिजावर चमकायला सुरुवात केली..आणि आपले चमकणे हे काजव्यारखे नसून शुक्राच्या चांदणी सारखे आहे याचे ही संकेत दिले. चेन्नई संघ आज आयुष ने दिलेल्या सुरुवाती नंतर रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्या  भागीदारीमुळे मोठी धावसंख्या पार करील असे वाटत होते पण..मुंबई संघाच्या गोलंदाजी मुळे आणि त्यांच्या क्षेत्रक्षणामुळे ते १७६ द्यावाच करू शकले...जसप्रीत बुमरा याने ४ षटकात फक्त  २५ धावा देऊन २ बळी घेतले ते सुद्धा शिवम आणि धोनी यांचे..इथेच चेन्नई ४०/५० धावा कमी करू शकले...सूर्यकुमार यादव याच्या वानखेडेवर काही अविश्वसनीय खेळ्या पहिल्या ...त्याचे अद्भुत पदलालित्य पाहिले की एक प्रश्न कायम मनात येतो की २०२३ चा नोव्हेंबर महिन्यातील तो अंतिम सामना वानखेडेवर असता तर रोहित शर्मा गेल्या सात सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर काही वेळा बाद होत होता.. टीव्हीवरील पत्रकार त्याच्या निवृत्तीची भाषा बोलू लागले होते. आश्चर्य म्हणजे त्यात वीरेंद्र सेहवाग देखील होता... रोहितचा असा एक खास इतिहास आहे जेव्हा जेव्हा टीकाकार त्याच्यावर विखारी टीका करतात तेव्हा तेव्हा तो आणखीन उफाळून वर आला आहे..म्हणूनचं तो खालील शायरी मधील समुद्र आहे...काल बुडणाऱ्या शहराचे नाव होते चेन्नई..

..हम तो एक समंदर है,
हमे खामोश रहने दे,
जरा जो लहर गये,
तो शहर डुबो देंगे!!

संबंधित लेख:

IPL 2025 RR vs LSG: लखनौच्या आवेशात राजस्थान अयशस्वी

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Embed widget