BLOG | पेद्रो अल्मोडवारचा पहिला पॉलिटीकल सिनेमा : पॅरेलल मदर
BLOG : स्पॅनिश दिग्दर्शक पेद्रो अल्मोडवारच्या सिनेमांची मांडणी वेगळी असते. त्याची पात्र प्रेक्षकांना आपल्या भावविश्वात खेचतात. भावनिक चढउतार अनुभवायला भाग पाडतात. सिनेमा संपल्यानंतरही त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्याचा आतला आणि बाहेरचा संघर्ष असं बरंच काही, डोक्यात विचारांचे काहूर माजवणारी पात्रं पेद्रो तयार करतोय. गेली जवळपास चाळीसवर्षे तो अश्याच भन्नाट पात्रांमुळं जगभरात गाजला. त्याच्या सिनेमातली स्त्री पात्रं ही फार क्लिस्ट असतात. त्यांना तो सिनेमाच्या माडंणीतून सोप्प करतो. ही अगदी कणखर अर्थात स्ट्राँग स्री पात्रं आहेत. आज पेद्रो पच्चांहत्तरीत आहे. जवळपास 40-45 सिनेमांनंतर तो स्वत:ला म्यॅच्युअर समजायला लागलाय. असं तो म्हणतो. म्हणूनच पहिल्यांदाच आपल्या सिनेमातून त्यानं राजकीय विषय हाताळलाय. सिनेमाचं नाव आहे पॅरेलल मदर (2021). गेल्या वर्षभरात पॅरेलल मदरनं जगभरातले जवळपास सर्वच फिल्म फेस्टिव्हल गाजवले. वेनिस, सॅन डिएगो इथं तर तो सर्वोत्कृष्ठ ही ठरला. माजी लष्करशहा फ्रान्सिस्को फ्रँकोच्या काळातली भयंकर राजवट, त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या लाखो लोकांच्या अमानुष कत्तली, मारल्या गेलेल्या लोकांच्या नातेवाईकांच्या दोन पिढ्यांचं दु:ख आणि आपल्या माणसांचे अवशेष शोधण्याचा जवळपास साठ वर्षांचा संघर्ष पेद्रोनं 'पॅरेलल मदर' सिनेमात आणलाय.
चिलीतला अगस्ता पिनाशोट आणि स्पेनमधला फ्रान्सिस्को फ्रँको यांची कारकिर्द समान हिंसक होती. दोघं ही लष्करी हुकूमशहा होते. विलासी होते, खुनशी होते. तो विरोधात गेला त्याला संपवला ही त्याची कार्यपध्दती होती. आपल्या 36 वर्षांच्या कालावधीत फ्रान्सिस्को फ्रँकोनं जवळपास दीड ते दोन लाख लोकांना ठार मारलं. मारले गेलेले सर्व देशात लोकशाहीचा आग्रह धरणारे होते. त्यांना पध्दतशीरपणे टार्गेट करण्यात आलं. एका एकाला गाठून ठार केलं गेलं. अचानक ही माणसं गायब झाली. काहींना भररस्त्यातून उचललं तर काहींना थेट घरातून. जे लोक फ्रान्सिस्को फ्रँकोच्या नॅशनलिस्ट पार्टीच्या ताब्यात सापडले ते पुन्हा कधीच दिसला नाही. असे लाखो गायब झालेल्या लोकांचे नातेवाईक गेली अनेक दशकं त्यांना शोधतायत. त्यांना जिथं गाडलं तिथून काढून रितसर दफनविधी करण्यात यावा अशी त्यांची मागणी होती. यातून स्पेनमध्ये राजकीय वादंग माजलं होतं. देशभरात जिथं जिथं या लोकांना गाडलंय त्या ठिकाणी उत्खनन करण्याची मागणी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टीनं ती लावून धरली तर नॅशनलिस्ट पार्टीनं त्याला जोरदार विरोध केला. मारल्या गेलेल्यांच्या तिसऱ्या पिढीतले हे लोग इरेला पेटले. आपल्या आजीनं सांगितलेले मास कत्तलीचे भयंकर अनुभव त्याच्या बालपणाला अस्वस्थ केलं होतं. या लोकांचं नक्की काय झालं हे शोधून काढण्यासाठी देशपातळीवर आंदोलन झालं. त्यातून मग डेमोक्रॅटीक मेमरी लॉ संमत करण्यात आला. मे 2020 मध्ये हा कायदा झाला. देशभरात उत्खनन हाती घेण्यात आलं. जिथं जिथं सांगाडे सापडे त्याचे डिएनए चाचणी घेण्यात आली. त्यांचे नातेवाईक शोधण्यात आले. तिसऱ्या पिढीनं आपल्या आजीला दिलेलं आश्वासन आता पूर्ण व्हायला आलंय. आणखी एक गोष्ट घडली व्हॅली ऑफ फॉलन या भागात फ्रान्सिस्को फ्रँकोला दफन करण्यात आलं होतं. १९७५ला त्याचा मृत्यू झाल्यानंतर तिथं त्याचं थडगं बांधण्यात आलं. लोकांनी 2019 साली ते फोडण्याचा प्रयत्न केला. आता फ्रान्सिस्को फ्रँकोच्या फासिस्ट राजवटीचा उदय आणि अंत या दरम्यानच्या कालावधीत बळी गेलेल्या लाखो लोकांना आता व्हॅली ऑफ फॉलनमध्ये जागा देण्याचा आणि फ्रान्सिस्को फ्रँकोचं नामोनिशान तिथून निष्ट करण्यासाठी आंदोलन झालं. स्पेनचा हा रक्तरंजित इतिहास पॅरेलल मदर या सिनेमात ऐकायला मिळतो. पेनलप क्रुज या अप्रतिम अभिनेत्रीच्या डोळ्यात दिसतो. तिनं जेनीस हे कॅरेक्टर केलंय. ती आपल्या आजी-आजोबाचे अवशेष शोधतेय. यातूनच पेरेलल मदरचं अख्खं कथानक घडतं. पेद्रोसोबतचा हा तिचा आठवा सिनेमा आहे. या आधी वोल्व्हर (2006), ब्रोकन एम्ब्रेसेस (2009) सारख्या सिनेमांमध्ये तिनं पेद्रोची कॉन्प्लिकेटेड अभिनेत्री केलीय.
जेनीस या पात्राभोवती फिरणारा हा सिनेमा मातृत्वाचे वेगळे आयाम दाखवतो. यापुर्वी ते कधी अनुभवलेले नाहीत. पेड्रोने सिनेमाची मांडणी करताना स्पेनचा इतिहास हा बॅकग्राऊंड नॅरेटिव्ह ठेवलाय. सर्व कथानक यामुळंच घडतं. मुख्य पात्रं त्यामुळंच कनेक्ट होतात. फ्रान्सिस्को फ्रँकोच्या फासिस्ट राजवटीच्या जाचातून सुटून जवळपास 50 वर्षे झाली आहेत. अगदी नवीन पिढीला हा संघर्ष माहितेय. पण त्याला त्याबद्दल काहीही घेणं देणं नाही. तो विलासी आहे. त्याला जाणिव करून देण्याची जबाबदारी जेनीससारखी माणसं करतायत. त्याच्यामते यादवी अजून संपलेली नाही. जमिनीखाली गाडलेल्या प्रत्येकाला जोवर बाहेर काढलं जात नाही. त्याला सन्मानानं मुठमाती दिली जात नाही तोवर हे युध्द सुरू राहील. गाडलेल्यांना शोधण्यासाठीचं उत्खनन हा स्पेनमधला भावनिक मुद्दा आहे. आपल्या चाळीस वर्षांच्या सिनेमाच्या करीअरमध्ये पेद्रोने या विषयाला कधीच हात घातला नव्हता. त्याचे विषय वेगळे होते. उत्खननच्या मुद्द्यावर देश पेटलेला असताना तो पॅरेलल मदर घेऊन आला. त्यातून देशातल्या त्या काळ्या इतिहासाला आणि सध्या देश्यात सुरु असलेल्या संघर्षाला त्यानं जगासमोर आणलं. त्यावर चर्चा घडवून आणली.
पेद्रोचा हा सिनेमा जिथं जिथं यादवीत माणसांना मारण्यात आलं त्या प्रत्येक देशातल्या लोकांसाठी आहे. तो थेट राजकीय भाष्य करत नाही. त्यानं आपल्या कथानकात एका पिढीकडून दुसऱीकडे आलेला हा भावनांचा संघर्ष अगदी सोपा करुन दाखवलाय. स्क्रिनवर दिसणाऱ्या सिनेमात उत्खननाचा भाग शेवटाला फक्त काही मिनिटांचाच असला तरी तो संपू्र्ण सिनेमात आहे. जेनीस आणि आर्थो या मुख्य पात्रांना जवळ आणणारा, त्यानंतर संपूर्ण कथानक घडवणारा हा मुद्दा आहे. त्यामुळं त्याची व्याप्ती दोन अडीच तास राहते. कमी अधिक प्रमाणात तो मध्ये-मध्ये यादवी संघर्ष, उत्खनन, त्यातून होणारे सामाजिक प्रश्न या सर्व गोष्टींचा बरोबर हेरतो. गेले दोन-तीन वर्षे स्पेननं या मुद्दयाबाबतीत अनेक उतारचढाव पाहिलेत. या सर्वांचा साक्षीदार पेद्रोचा पॅरेलल मदर सिनेमा आहे.
पेनेलोप क्रुझ आणि मेलीना स्मित या दोन्ही अभिनेत्रींनी यात केलेला अभिनय निव्वळ अप्रतिम आहे. आईपणाच्या कक्षा रुंदावणारा आणि त्यातून देशाचा इतिहासातली काळी पानं उलगडून दाखवणारा पॅरेलल मदर अलिकडे बनलेल्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक आहे.