एक्स्प्लोर

BLOG : सामना हरण्याची वेदनादायी ‘पाळी’

28 मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस जगभर साजरा झाला. या दिवशी महिलांच्या पाळी दरम्यानचे अनुभव, स्वच्छता, उद्भवणाऱ्या आजारांविषयीची जनजागृती, काय काळजी घ्यावी यासंदर्भात माहिती दिली जाते. किंबहुना आता तर सोशल मीडियामुळे ही मोहिम सर्वांपर्यंत पोहोचवणं अधिक सोपं झालं आहे. मात्र म्हणतात ना.. थेअरिटिकलपेक्षा प्रॅक्टिकल अवघड असतं. असंच काहीसं मासिक पाळीचंही आहे. प्रत्येक मुलीला, महिलेला होणारा त्रास हा शब्दात मांडता येणारा नाही. कुणाचं अंग दुखतं, तर कुणाचं डोकं, कुणाची अॅसिडिटी वाढते तर ओटीपोटाचं दुखणं असह्य होतं. कुणाचे पाय वळतात तर कुणाची पाठ दुखते, कुणाची एनर्जी डाऊन होते तर कुणाचं डोकं गरगरतं तर कुणाची चिडचिड होते.. एक नव्हे दोन नव्हे तर त्या दिवसात पारा अगदी चढलेलाच असतो. त्यात अगदी काही समारंभ किंवा काही खास इव्हेंट आले तर गोळ्या घेऊन पाळीचे दिवस पुढे मागेही ढकलले जातात. जेणेकरुन तो महत्वाचा दिवस चांगला अनुभवता यावा. पण, काहीही झालं, कितीही केलं तरी ही नैसर्गिक देणगी आहे. कधीतरी कितीही आटापिटा केला तरी पाळी ही नको त्या दिवशी येतेच.. असंच काहीसं घडलं ते चीनची टेनिसपटू झेंग किनवेन हिच्याबाबत..

मासिक स्वच्छता दिन साजरा झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशीची ही घटना.. झेंग ही फ्रेंच ओपनमध्ये खेळत होती. टेनिसपटू इगा स्वितेक हिच्यासोबत तिचा सामना सुरु होता. पहिला सेट झेंगने जिंकला. साहजिकच सुरुवात चांगली झाली त्यामुळे झेंगचा आत्मविश्वास दुणावला. 82 मिनिटं म्हणजे 1 तास 32 मिनिटं झेंगने इगाला कडवं आव्हान दिलं. पहिल्या सेटनंतर झेंगच्या पोटात दुखू लागलं आणि तिची पाळी आली. त्रास सुरु होताच तिला जबरदस्त पोटदुखीचा त्रास सुरु झाला आणि फॉर्मात असलेली झेंग दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये हरली. नुसती हरलीच नाही तर तिला ही मॅच हरल्याने फ्रेंच ओपनमधून बाहेर पडावं लागलं. आपल्या मनातली खंत तिने बोलूनही दाखवली. नेहमीच पाळी आली की मला खूप त्रास होतो, खूप पोट दुखतं, खेळतानाही तेच झालं. हा सगळा त्रास सहन करण्यापेक्षा मी पुरुष असते तर किती बरं झालं असतं... हे तिच्या तोंडचं वाक्य..

कोणताही खेळ असो अथक मेहनत ही करावीच लागते. झेंगही त्याला अपवाद नाही. अथक परिश्रमाच्या जोरावर ती इथपर्यंत पोहोचली. मात्र तिला मॅचच्याच दिवशी आलेल्या पाळीने सामना हरण्याची वेळ आली. सोशल मिडियावर तिचं हे वक्तव्य खूप गाजतंय. आणि नेहमीप्रमाणे काही जण हे excuse  असल्याचंही म्हणतायत. 

झेंगची ही वाक्य आज प्रत्येक महिला, मुलीच्या मनातली आहेत. यात ती कुठेही चुकलेली नाही. काही जणांना चूक यातच वाटतेय की, तिने दबक्या आवाजात बोलली जाणारी वाक्य जाहिरपणे बोलण्याची हिंमत दाखवली. कदाचित काहींना असंच वाटत असेल की, तिने सामना हरल्यावर मीच कुठेतरी कमी पडले, पुढच्या वेळी आणखीन मेहनत घेऊन समोर येईन.. अशा तत्सम स्वरुपाचं काही तरी बोललं पाहिजे होतं. पण, तिने सत्यस्थिती मांडली. आणि काही लोकांनी आजही त्यांची मानसिकता काय आहे, हे पुन्हा दाखवून दिलं. 

महिला, मुलींचा पाळीच्या दिवसातला त्रास समजून घ्यायचा असेल तर बाईचाच जन्म हवा. कोणी, कितीही म्हटलं तरी तो त्रास कुणीही समजून घेऊ शकत नाही. आजही अनेक ठिकाणी शेतीपासून कॉर्पोरेट ऑफिसमध्ये महिला, मुली राबतात.  काही जण म्हणतील की, मेहनतीचा दाम मिळतो मग काम तर करायलाच हवं ना? हो.. करायलाच हवं. मात्र महिन्याचे सर्व दिवस जसे पुरुषांसाठी समान असतात तसे महिलांसाठी नसतात. एखादा अपघात झाल्यावर रक्तस्त्राव होतो त्यावेळी जो अशक्तपणा येतो तसाच काहीसा अनुभव त्या 4- 7 दिवसातला असतो. फक्त हा अपघात नाही तर दर महिन्याला निसर्गाने मोजून दिलेले ते दिवस असतात, जे कितीही नको म्हटलं तरी बाईच्या वाट्याला येतातच. 

  जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, झांबिया, स्पेनसारख्या देशात मासिक पाळीसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या काही देशांचा दृष्टीकोन बदलला आहे. आपल्याकडे काही कंपन्यांनी संवेदनशीलरित्या हा मुद्दा हाताळलाही. 2020 मध्ये झोमॅटो कंपनीने महिलांना मासिक पाळीसाठी सुट्टी घेता येईल हा निर्णय जाहीर केला आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. स्त्री पुरुष असमानता, महिलांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल, महिलांना मागे ढकलण्याचा हा निर्णय.. अशा चर्चा सुरु झाल्या. आपल्याकडे मुंबई, कोलकात्यातल्या काही कंपन्यांनीही असा निर्णय जाहीर केला आहे. ज्यावेळी संवेदनशील मुद्द्यावर सोकॉल्ड सक्षम महिला आपल्याला मागे पाडण्याचा हा निर्णय आहे, हे जाहीरपणे बोलतात. त्यावेळी त्यांच्या विचारांनी मनात प्रश्नांचं कोलाहल सुरु होतं. साधी गोष्ट आहे, जी घरची परिस्थिती एखाद्या सधन कुटुंबातल्या महिलेची असते, ती प्रत्येकी नसते, काही जणींच्या घरी पाण्याचा ग्लास द्यायलाही ताई असतात, तशी स्थिती प्रत्येकीची नसते, काही जणींच्या घरी हातात ताट मिळतं तर काही जणींचं हातावर पोट असतं. जिथे ही दुफळी आहे तिथे शारीरिक, मानसिक त्रासही वेगळा आहे. 

 आजही मुली मेडिकलमधून सॅनिटरी पॅड काळ्या पिशवीतून आणतात, घरातल्या पुरुष मंडळींना पाळी आली आहे, हे सांगण्यासाठी लाजतात. सार्वजनिक शौचालयात आजही सॅनिटरी पॅडची व्यवस्था, वापरलेले पॅड टाकून देण्याची व्यवस्था नाही. पाळी हा विषय व्यक्तीगत नाही, तर तो सामाजिक आहे.. हे प्रत्येकाने आपल्या  सद्सद्विवेक बुद्धीने समजून घ्यायला हवा. ऑफिसमध्ये काम करताना एकमेकींना समजून घेत आपल्यापैकी प्रत्येक जण काम करतो. पण, जेव्हा पुरुष सहकाऱ्याला सांगण्याची वेळ आली की, आपण तितक्याच खंबीरपणे सांगितलं पाहिजे, हा बदल आपण आपल्यात करायलाच हवा. 

झेंगने केलेल्या वक्तव्याचं मी स्वागत करते आणि आदरही. सामना हरण्याची वेदनादायी पाळी का आली, हे तिने सत्य सांगण्याची हिंमत दाखवली. असह्य झालेल्या वेदनांमुळे तिने पुरुष असते तर बरं झालं असतं असं म्हटलं, जे प्रत्येकीच्या त्या दिवसातलं वाक्य असतंच. पण, ही एक मॅच हरल्याने तिचा फॉर्म बदलणार का? तर नाही, ती आणखीन जोमाने भरारी घेईलच. ही फ्रेंच ओपन जिंकणारी इगा जितकी कौतुकास पात्र आहे, तितकीच झेंगही. कारण तिने पाळी सुरु झाल्यावरही माघार घेतली नाही, तर जिकरीने लढली. 19 वर्षाच्या झेंगला तिच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा..

वृषाली यादव यांचे अन्य लेख :

सामाजिक’ बलात्कार कधी थांबणार?

आर यू व्हर्जिन? इफ नो… सो व्हॉट?

रंग नव्हे कर्तृत्व पाहा

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP Premium

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget