एक्स्प्लोर

BLOG: उत्तर प्रदेशमधला 'जात' फॅक्टर कोणाच्या बाजूने?

BLOG: उत्तर प्रदेशमध्ये फिरताना, लोकांशी बोलताना एक फॅक्टर तुम्हाला पदोपदी जाणवतो तो म्हणजे तिथला कास्ट कॉन्शियसनेस. अर्थात सगळे राजकीय पक्ष जातींच्या बेड्या तोडण्याच्या गप्पा मारतात पण निवडणुका जवळ आल्या की जातींच्या गोळाबेरजेचा विचार करुन तिकीटांचं वाटप केलं जातं. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात जात ही एक अपरिहार्य बाब मानली जाते. प्रॅक्टिकल पॉलिटीक्समध्येही जातीचं महत्व अनन्यसाधारण असल्याचं नेहमीच अधोरेखित झालंय. यामुळे अनेकदा निवडणुकांमध्ये इतर मुद्दे, उमेदवाराची योग्यता यावर चर्चाही होत नाही. वरवर जरी धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण खेळलं जात असलं तरी त्याच्याहूनही अधिक प्रयत्न जातींच्या एकगठ्ठा मतांसाठीही होतात. 

उत्तर प्रदेशच्या 'जात' फॅक्टरला सुरुंग लागला होता तो भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाने. 2013 च्या मुजफ्फरनगर दंगलीनंतर पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या संख्येने असणारे जाट, सैनी आणि गुजर या सगळ्या जातींनी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकगठ्ठा मतदान केलं. 2014 लोकसभा निवडणूक, 2017 विधानसभा निवडणूक, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हे समीकरण कायम राहीलं. मोदी-योगींच्या भगव्याखाली जातींची गोळाबेरीज मोडून पडल्याचं दिसलं. पण आताच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी आंदोलनामुळे नाराज जाटांसाठी तरी हिंदुत्वाचा आणि दंगलीचा मुद्दा हद्दपार होताना ग्राऊंडवर दिसतोय. तर दुसरीकडे राजा मिहीरभोज पुतळा प्रकरणामुळे गुर्जर सुद्धा मोठ्या प्रमाणात दुखावले गेले. गुर्जर हे कट्टर भाजप समर्थक राहीलेत. केंद्रात निवडायचं झालं तर ते मोदींनाच बहुसंख्येने  मत देतील पण राज्यात मात्र मिहीरभोज प्रकरणामुळे गुर्जर विरुद्ध ठाकूर वादाची विझलेली बिडी शिलगावली गेली. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच ठाकूर समुदायातून येतात. त्यामुळेच गुर्जरांना कमी लेखण्याची एकही संधी ते सोडत नाहीत असं एक पर्सेप्शन मोठ्या प्रमाणात गुर्जर तरुणांमध्ये तयार झालंय.  

राजा मिहिरभोजांचा वारसा सांगणारा आणि महापुरुष म्हणून त्यांना पूजनारा एक मोठा वर्ग उत्तर प्रदेशमध्ये आहे.  पण काही दिवसांपूर्वीच राजा मिहिर भोज हे जन्माने गुर्जर की राजपूत क्षत्रिय ठाकूर असा वाद सुरु झाला. दोन्ही जातींनी राजा मिहिर भोज हे आपल्याच जातीतले होते असा दावा केला. मध्य प्रदेशमध्ये तर यावरुन हिंसक संघर्षही झाला आणि त्याचीच धग उत्तर प्रदेशपर्यंतही पोहोचली. मग दादरीमध्ये मिहीरभोज यांच्या पुतळ्यासमोरुन गुर्जर शब्द हटवण्यात आला आणि मग हीच बाब योगींच्या जातीशी जोडून बघितली गेली. त्यामुळे या भागात 'मोदी तुझसे बैर नही लेकीन योगी तेरी खैर नही' अशी भावना तरुणांमध्ये बघायला मिळतेय. अर्थात गुर्जरांमध्ये भाजपपासून फारकत न घेण्याच्या भूमिकेत असलेलाही एक मोठा वर्ग आहे ज्यांना हिंदुत्व आणि कमी झालेली गुन्हेगारी या मुद्द्यांवरुन भाजपसोबत राहायचंय. 

जातींमधला सुप्त संघर्ष कोणाच्या पथ्यावर?
या सगळ्यांमध्ये आणखी एक बाब जाणवली ती म्हणजे इथला जाती-जातींमधला संघर्ष. इथल्या काही जाती शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे जाटांचं आंदोलन म्हणून देखील बघतात. काही ठिकाणी तर गुर्जरांची शेतकरी आंदोलन आणि जाट नेते टिकैत यांच्याबद्दलची नाराजी उघडउघडपणे दिसली.  भाजपपासून जाट नाराज झाल्यामुळे त्यांच्यातला मोठा गट जयंत चौधरींच्या आरएलडीकडे वळलाय. त्यामुळे जाट-मुस्लिम एकत्र येत सपाला मत देणार असं चित्र तयार झालंय. याचविरोधात इतर जातींचं काऊंटर पोलरायजेशन देखील होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने त्यागी, गुर्जर, सैनी आणि राजपूत यांचा समावेश आहे. म्हणजे योगींना थोडावेळ बाजूला ठेवलं तर जाट मुस्लिम समीकरणाविरोधातही काऊंटर पोलरायजेशन होतंय ज्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.  आणखी एक उदाहरण म्हणजे दिल्लीजवळचा उत्तर प्रदेशमध्ये येणारा दादरी भाग आहे. इथे यादव आणि गुर्जरांची काही गावं आहेत. पण काही ठिकाणी यादव विरुद्ध गुर्जर असाही संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता यादव बहुसंख्येने सपाकडे जातायत मग याविरोधात गुर्जर भाजपकडे जातानाही दिसतायत. त्यामुळे जातींचे खूप वेगवेगळे कंगोरे राजकारणाला प्रभावित करतात. 

मुस्लिम आणि जाटव कोणाच्या बाजूने?
जात समीकरणांबद्दल बोलताना आपल्याला मायवतींना डावलून कसं चालणार. पण मायावतीं फार सक्रिय नसल्यामुळेही काही वेगळी समीकरणं तयार झालीयेत. म्हणजे सत्तेत मायावतींचा बसपा येणार नसला तरी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये कोणाचा कोणता उमेदवार जिंकणार आणि हरणार हे ठरवण्या इतका प्रभाव बसपाचा नक्कीच आहे. त्यामुळे वोट कटुआ पार्टी म्हणूनही बसपाकडे बघितलं जातंय. पण अस्तित्वाचा प्रश्न मानून मायावतींशी प्रामाणिक असलेला मुस्लिम मतदार मात्र यावेळेस एकगठ्ठा अखिलेश यांच्या महागठबंधनकडे गेलाय हे जागोजागी दिसतं. आता ज्या सहारनपूरमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या सर्वाधिक आहे तिथे बसपाचे दोन मातब्बर नेते सपात गेले. तरीही एकाही मुस्लिमाला उमेदवारी अखिलेश यांनी दिली नाही. पण मुस्लिमांच्या मतांचं विभाजन होताना कुठेही दिसलं नाही. यात प्रामुख्याने एक गोष्ट काही ठिकाणी जाणवली की मुस्लिम पुरुष जरी एकगठ्ठा सपाकडे वळताना दिसत असले तरी काही मुस्लिम स्त्रियांचं म्हणणं मात्र वेगळं आहे. युपीत गुन्हेगारीचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होता. पण योगींनी लक्षणीयरित्या गुन्हेगारीचा बिमोड केला हा मुद्दा कोणीही मान्य करेल. त्यामुळे हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेऊन भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर असणाऱ्या महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. 

मायवती ज्या जातीतून येतात तो जाटव समुदाय सुद्धा या भागात लक्षणीय आहे. मायावतींचा हा समाज पारंपरिक एकगठ्ठा मतदार राहिला आहे. पण यावेळेस मायवतींच्या निष्क्रियतेमुळे जाटव नाराज आहेत. त्यामुळे जाटव मतं  कुठे जाणार हे नेमकेपणाने समजत नसलं तरी जाटवांचा एक वर्ग भाजप आणि महागठबंधनकडे स्विफ्ट होण्याची शक्यता आहे. पण याचा जास्तीत जास्त फायदा हा भाजपला होत असल्याचाही अंदाज वर्तवला जातोय. 

बाबरी विध्वंसानंतर कल्याण सिंह, विनय कटियार, उमा भारतींमुळे कोयरी, कुर्मी, लोध यासारख्या अतिमागास जातीही भाजपसोबत जोडल्या गेल्या. 2014 मध्ये मोदींना ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं. त्यामुळे ब्राम्हण-बनियांचा पक्ष ही भाजपची प्रतिमा पुसली गेली. आणि त्याचा फायदाही भाजपला झालेला दिसला. त्यानंतर 2013 च्या दंगलीने तर उत्तर प्रदेशमधल्या जातीय समीकरणांनी हवाच फिरवली आणि भाजपला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं. पण यावेळेस आता जातीची 'गोलाबंदी' (युपीत वापरला जाणारा शब्द) कोणाच्या पथ्यावर पडते आणि कोणाच्या विरोधात जाते हे स्पष्ट होईलच. पण ही गणितं 2019 सारखी राहीली नाहीत हे मात्र नक्की. 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget