कोरोनाच्या साथीच्या आजाराला सुरुवात होऊन काही महिने झाल्यानंतर रुग्णसंख्या ज्यावेळी झपाट्याने वाढत होती, त्यावेळी अनेकवेळा दबक्या आवाजात चर्चा होत होती की, देशात आणि राज्यात समूह संसर्गाची लागण सुरु झाली होती. मात्र कोणतेही राज्य अशा प्रकारचा समूह संसर्ग सुरु झाला आहे हे मान्य करायला तयार नव्हता. त्यावेळी प्रथम केरळचे मुख्यमंत्री यांनी जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात त्याच्या राज्याच्या जिल्ह्यात काही ठिकाणी समूह संसर्ग झाल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील पश्चिम बंगालच्या यांनीही जाहीर केले होते की त्यांच्या राज्यातही समूह संसर्ग सुरु झाला आहे. यानंतर शेवटी देशाचे आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनीही मान्य केले की देशातील काही राज्यातील जिल्ह्यात समूह संसर्ग झाला आहे. मात्र त्याचवेळी मात्र रुग्णसंख्यने संपूर्ण देशात एक क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात मात्र या समूह संसर्गाबाबत कोणतीही चर्चा होताना दिसत नाही.
साथीच्या प्रसाराचे चार टप्पे असतात, त्यात पहिल्या टप्प्यात बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना साथीच्या आजाराचा संसर्ग झालेला असतो तर प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या लोकांना या आजाराची लागण होत असते. दुसरा टप्प्यात स्थानिक प्रसार होतो, आणि तिसरा टप्पा म्हणजे म्हणजे कुठलाही प्रवास ना केलेले आणि या बाधित लोकांच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तींना या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात व्यक्तींना होते. या टप्प्यात संसर्गाची लागण समाजामध्ये पसरत असते. या तिसऱ्या टप्यात संसर्गाचा प्रसार कसा होतो, याबाबत छडा लावणे अवघड जाते. कारण एक विशिष्ट भागात शहरात किंवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसायला लागतात, त्यावेळी समूह संसर्गाला सुरुवात होते असे म्हटले जाते. चौथ्या टप्प्यात या आजाराला महामारीचे स्वरूप प्राप्त होते.
सध्याचे राज्याचे वैद्यकीय सल्लागार आणि जागतिक आरोग्य परिषदेच्या साऊथ आशिया विभागीय कार्यालयात 4 वर्षे सहाय्यक विभागीय संचालक म्हणून काम पाहणारे डॉ सुभाष साळुंखे सांगतात की, " आपल्याकडे राज्यात पुणे आणि मुंबई सारख्या शहरात सामूहिक संसर्ग कधीच सुरु झालेला आहे. त्यामुळे तर आपल्याकडे या शहरामध्ये आणि अन्य ज्या ठिकाणी झपाटयाने रुग्णसंख्या वाढली आहे. यापुढे लोकांनी आता जास्त संभाळून राहणे गरजेचे आहे, नाहीतर जी काही रुग्णसंख्या कमी झाली आहे ती कधी वाढेल हे सांगता येणार नाही. लोकं वाटेल तसे हिंडतायेत काळजी घेताना दिसत नाही हे अतिशय वाईट आहे. सध्याचा काळ हा सणासुदीचा काळ आहे या काळात अतिदक्षता घेणे गरजेचे आहे . नागरिकांनी जर आता सावधगिरी नाही बाळगली तर भविष्यात मोठे धोके संभवतात.
वर्ल्डओमीटर या संकेतस्थाळावर संपूर्ण जगातील देशाची कोरोना आजाराशी संबंधित सर्व आकडेवारी आहे. भारतीय वेळेनुसार दुपारचे 4 वाजून 30 मिनिटांनी जी आकडेवारी या संकेतस्थळावर होती ती घेण्यात आली आहे. त्यानुसार भारत देशात 75 लाख 97 हजार 63 रुग्ण असून 67 लाख 33 हजार 328 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर 1 लाख 15 हजार 236 नागरिकांचा या आजराने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार राज्यात 16 लाख 1 हजार 365 रुग्णसंख्या असून 13 लाख 84 हजार 879 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर राज्यात 42 हजार 240 रुग्णांचा या आजाराने बळी घेतला आहे.
याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र, अध्यक्ष, डॉ अविनाश भोंडवे सांगतात की, " काही महिन्यापूर्वीच इंडियन मेडिकल असोसिएशन याबाबत उघडपणे भूमिका घेऊन राज्यात समूह संसर्ग झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्यावेळी कुणीही या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. मात्र आता देशाचे आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी स्वतःच जाहीर पणे सांगितले आहे की, देशाच्या राज्यातील काही जिल्ह्यात समूह संसर्ग झाला आहे. केरळ हे देशातील पहिले राज्य होते त्यांनी या विषयाला वाचा फोडली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नवरात्र उत्सवाच्या सुरवातीलाच राज्यात समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचे भाष्य केले होते. आपल्याकडे महाराष्ट्र सरकार समूह संसर्ग झाला हे का मान्य करत नाही? हे मलाही कळत नाही. सुरवातीच्या काळात कोकणात, गडचिरोली आणि हिंगोली भागात रुग्ण नव्हते. मात्र ज्यावेळी मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर झाले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढण्यास झाली होती. साथीच्या प्रसाराचे जर आपण टप्पे पहिले तर लक्षात येते की आज आपल्याला कुणामुळे संसंर्ग झाला आहे याचा स्रोत शोधणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शासनाने करून टाकावे सामूहिक संसर्ग झाला आहे. त्यामुळे तर किमान अधिक लोक काळजी घेतील."
ते पुढे असेही सांगतात, "सध्याच्या घडीला जी काही रुग्णसंख्या कमी झाली आहे, ती कायमच ती तशीच राहील हे आताच सांगता येणार नाही. साथीच्या आजारांमध्ये हे असेच होतेच असते एका विशिष्ट काळानंतर रुग्णसंख्या कमी होते आणि जर आपण कोणतीही प्रतिबंधात्मक पावले उचलली नाही तर पुन्हा एकदा रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते."
या वैश्विक महामारीच्या काळात भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तो केरळ राज्यात. जानेवारी महिन्यात कोरोनाचं आगमन या राज्यात झालं तेव्हा इतर राज्यात या संसर्गाबद्दल कोणतीही कुणकुण नसताना मोठ्या 'हुकबीने' या केरळ शासनाने आणि प्रशासनाने नवनवीन क्ल्युप्त्या आखून या आजराशी मोठ्या दिमाखादारीने झुंज दिली. इतर राज्यात ह्या कोरोनाचा हाहाकार होत असताना केरळ देशातील पाहिलं राज्य होतं की त्या राज्यात 1 मे ह्या दिवशी कोरोनाचा कोणताही नवा रुग्ण सापडला नव्हता, त्यांच्या या कामगिरीबद्दल त्या राज्याचं देशपातळीवर खूप कौतुकही झालं. केरळ मॉडेलची चर्चा होऊ लागली. मात्र कोरोनाच्या भविष्यतील वर्तनाबाबत कुणीही सांगू शकत नव्हते, तेच या राज्यात घडलं कालांतराने पुन्हा येथे नवीन रुग्ण सापडू लागले. 'आपल्याला रोग्याशी नाही रोगाशी लढायचंय' हे वाक्य डोक्यात ठेवून त्यांनी प्रयत्न सुरुच ठेवले. 'समूहसंसर्ग' हा शब्द काढला तरी इतर राज्ये आणि केंद्रीय सरकार तसं काहीच झालेले नाही अशी झिडकारून देणारी उत्तर देत असताना, केरळ देशातील पाहिलं राज्य आहे त्यांनी जुलै महिन्याच्या तिसऱ्या स्वतः कबुली दिली की आमच्या एक जिल्ह्यातील दोन गावात समूहसंसर्ग झालेला आहे. तिरुअनंतपूरम या जिल्ह्यातील दोन गावात समूह संसर्ग झाल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे. एकाच दिवशी केरळ राज्यात नवीन 791 रुग्णांचे निदान झाले आहे. पुनथुरा आणि पुलाविला या दोन गावात सरकारत्मक चाचणी येण्याचे प्रमाण जास्त वाढल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एकंदरच जर वैद्यकीय तज्ञांची मते जर विचारत घेतली तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये विशेष करून पुणे आणि मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ दिसून आली होती. अजूनतरी राज्यात अधिकृतरीत्या समूह संसर्ग झाल्याचे कुणीही मान्य केलेले नाही. मात्र नागरिकांनी मास्क, दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवणे आणि हात वारंवार धुणे या सुरक्षिततेच्या तीन गोष्टीचा अवलंब केला अंतर नागरिक या आजरापासून लांब राहू शकतील.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!
- BLOG | कोरोनामुक्त म्हणजे आजारमुक्त?