एक्स्प्लोर

BLOG : 2023 या वर्षात सोन्यात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम पर्याय!

पिवळा धातू म्हणून ओळखलं जाणार सोनं हे भारतात पूर्वीपासून गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय मानलं जातं. सणांच्या दिवशी आणि आनंदाच्या क्षणी सोने विकत घेण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे सोनं हे एक महत्त्वाचा एसेट क्लास ठरतं. काळाच्या ओघात भारतात सोन्याशी जोडले गेलेले गुंतवणुकीचे अनेक पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यात आले. या पर्यायांमुळे गुंतवणूकदार रिस्क घेण्याच्या क्षमतेला पूरक ठरणारी गुंतवणूक करू शकतात आणि आपली गुंतवणूक योग्य रीतीने डायव्हर्सीफाय करू शकतात. त्यातून आपलं गुंतवणुकीचं उद्दिष्ट्य पूर्ण करणं त्यांना शक्य होतं.

 चालू वर्षात सोन्यात गुंतवणूक करण्याचे सर्वात विश्वासार्ह पर्याय कोणते? यापैकी आपल्या गुंतवणुकीसाठी सर्वात फायद्याचे पर्याय कोणते, तर कोणत्या पर्यायात गुंतवणूक केल्यास नुकसान होण्याची शक्यता असते, हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे फायदे आणि तोटे काय असतात, गोल्ड बार, गोल्ड कॉइन, इटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड आणि सोवरेन गोल्ड बॉण्ड्स, यांच्यापैकी गुंतवणूक करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय कोणता, हे समजून घेऊया.

सोन्याचे दागिने

फायदे 

  1. सांस्कृतिक महत्त्व : भारतात सोन्याच्या दागिन्यांना खास सांस्कृतिक स्थान आहे. दागिन्यांबरोबर लोकांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. लग्न समारंभ, सण किंवा इतर आनंदाच्या प्रसंगी सोन्याचे दागिने भेट म्हणून दिले जातात.
  2.  दृश्य स्वरूपातली गुंतवणूक : सोन्यामधील इतर गुंतवणुकीचे प्रकार अंगावर वागवता आणि मिरवता येत नाहीत. दागिने मात्र घालून मिरवता येतात. त्यामुळे व्यक्तीचा ठसा उमटण्यास मदत होते. 
  3. कधीही विकता येण्याची सोय :आर्थिक संकटांच्या वेळी आपल्याजवळ असलेलं सोनं विकून त्यातून झटपट पैसे मिळवता येतात, किंवा गहाण ठेवून पैसे कर्जाने घेता येतात.

तोटे 

  1. घडणावळ : सोन्याचे दागिने विकत घेत असताना प्रत्येक वेळी त्याचे कारागिरी आणि घडणावळीचे जास्तीचे पैसे द्यावे लागतात. मूळ किमतीच्या 10 ते 30  टक्के, इतकी अतिरिक्त रक्कम घडणावळ म्हणून द्यावी लागते. तेच सोनं पुन्हा विकायला गेल्यास ही घडणावळ गृहीत धरली जात नाही. यावर तीन टक्के जीएसटी लागू होतो. 
  2. अशुद्धतचे भीती : सोन्याच्या प्रत्येक दागिन्याची शुद्धतेची पातळी वेगवेगळी असते. सोन्यात इतर काही मिश्रधातू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
  3. विक्री करताना अडचणी : दागिन्यांच्या प्रत्येक दुकानाची सोनं विकत घेण्याची किंमत वेगवेगळी असते. एवढंच नव्हे तर ज्वेलर्स सोनं विकत घेताना त्यातून वेस्टेज वजा करतात. त्यावर जीएसटीही लागू होतो.
  4. कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांची शुध्दता ही 24 कॅरेट पेक्षा कमी असते. त्यामुळे शुध्दता हा सोन्याच्या बाबतीत काळजीचा विषय आहे.
  5.  तुम्ही खरेदी केलेलं सोनं तीन वर्षांच्या आत विकत असाल, तर त्यावर मिळालेला नफा हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून गृहीत धरला जातो. त्यावर निर्धारित टॅक्स स्लॅबनुसार कर आकारणी केली जाते.
  6. तुम्ही खरेदी केलेलं सोनं विकत असताना तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असेल, तर त्यावर मिळालेला नफा हा लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणून गृहीत धरला जातो. त्यावर इंडेक्सेशन बेनिफिटसह २० टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो.
     सुरक्षितता : सोन्याचे दागिने हे सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची गरज असते. त्यासाठी बँक लॉकर किंवा इलेक्ट्रॉनिक लॉकर विकत घेऊन अतिरिक्त खर्च करावा लागतो. 
  7.  पुन्हा विकताना कमी किंमत : आपण एकदा विकत घेतलेलं सोनं पुन्हा विकण्यासाठी घेऊन गेलो, तर बाजारातील चालू दरापेक्षा त्याची कमी किंमत मिळते. 

गोल्ड बार

फायदे 

  •  शुद्धतेची हमी : गोल्ड बार हे विशेषतः नामांकित ज्वेलर्सकडून घेतलेले असतील तर शुद्ध असतात. 99.99  शुद्धतेची हमी त्यावर दिली जाते.
  •  मोठ्या रकमेची गुंतवणूक : मोठी रक्कम सोन्यात गुंतवण्याची इच्छा असेल तर गोल्ड बार हा योग्य पर्याय आहे. एक ग्रॅम वजन असलेल्या बारपासून एक किलो आणि त्यापेक्षाही जास्त वजन असलेले बार बाजारात उपलब्ध असतात. 
  •  वजनाचं सर्टिफिकेट : गोल्ड बार विकत घेताना त्याची शुध्दता आणि वजन यांचं एक सर्टिफिकेट ग्राहकाला दिलं जातं.

तोटे

  1.  गोल्ड बार किंवा कॉइन विकत घेताना त्यावर कोणत्याही प्रकारची घडणावळ किंवा इतर चार्जेस द्यावे लागत नसले, तरी त्याची किंमत 22 कॅरेटच्या त्या वेळच्या दरापेक्षा जास्त असते. 
  2. झटपट विकता येत नाही : बँका जरी आपल्याला गोल्ड बारच्या स्वरूपात सोने देत असल्या, तरी ते त्यांना आपल्याकडून परत घेता येत नाही. रिझर्व्ह बँकेचे या बाबतीत काही नियम आहेत. त्यामुळे तुमच्याकडे असलेले गोल्ड बार विकायचा असेल तर ज्वेलर्स किंवा व्यापाऱ्यांकडे जावं लागतं. 
  3.  दागिन्यांप्रमाणेच गोल्ड बारलाही कर लागू आहे.
  4.  सोन्याचे दागिने किंवा कॉइन विकत घेतलेले असतील तर त्याचे छोटे भाग विकता येतात, परंतु गोल्ड बार अखंड असल्याने त्याचे छोटे भाग करता येत नाहीत.
  5.  सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच बार ठेवण्यासाठीही सुरक्षित जागा लागते. त्यासाठी बँक लॉकरवर अतिरिक्त खर्च होऊ शकतो. 
  6. कॉइनपेक्षा बार हे झटपट विकण्यासाठी अवघड असतात.

गोल्ड कॉइन्स 

फायदे 

  •  स्टँडर्ड आणि प्रमाणित : चांगल्या डीलरकडून किंवा बँकेकडून गोल्ड कॉइन खरेदी केलेले असतील तर ते वजनाच्या बाबतीत स्टँडर्ड असतात. त्यांच्या शुद्धतेची हमी दिली जाते. 
  •  वेगवेगळ्या छोट्या वजनांमध्ये गोल्ड कॉइन खरेदी करता येतात. त्यामुळे विकताना आपल्याला हव्या तेवढ्या वजनाचे कॉइन विकून पैसे मिळवता येतात. 
  •  कॉइन हे बारपेक्षा कमी आकाराचे असल्यामुळे ते साठवण्यासाठी फार मोठी जागा लागत नाही. 
  • गोल्ड कॉइन विकण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असते. 

तोटे

  •  पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग आणि प्रमाणित करण्याच्या अतिरिक्त खर्चामुळे गोल्ड कॉइन हे सोन्याच्या चालू दरापेक्षा जास्त दराने विकत घ्यावे लागतात.
  •  बनावट कॉइन मिळण्याचा धोका : बनावट गोल्ड कॉइन तयार होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे ते विकत घेत असताना विश्वासार्ह डीलरकडून घ्यावेत. 

गोल्ड ईटीएफ 

बाजारातील त्या त्या वेळचा सोन्याचा दर विचारात घेऊन बुलियनच्या स्वरूपात सामूहिक गुंतवणूक केली जाते, त्याला गोल्ड ईटीएफ म्हणतात. स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या शेअरप्रमाणे हे ईटीएफ ट्रेड केले जातात. 

फायदे

  • लिक्विडीटी : स्टॉक मार्केटमध्ये विकता येत असल्यामुळे गोल्ड ईटीएफची लिक्विडीटी जास्त असते. मार्केट सुरू असताना कधीही ते विकता किंवा विकत घेता येतात.
  •  शुध्दता : या स्वरूपात सोनं विकत घेताना त्याच्या शुद्धतेची ९९.५ टक्के हमी दिली जाते. सोनं प्रत्यक्ष कोणत्या स्वरूपात आहे याचा  गुंतवणूकदारांशी काही संबंध नसतो. 
  • सुरक्षितता : गोल्ड ईटीएफ ही कागदावरची किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरुपातली गुंतवणूक असते. त्यामुळे ते चोरीला जाण्याची भीती नसते.
     
    गोल्ड ईटीएफ विकताना किंवा विकत घेताना कोणताही अधिभार लावला जात नाही. 
  •  कर आकारणी : तीन वर्षानंतर ईटीएफवर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारण्यात येतो. हा दागिन्यांच्या स्वरूपातील सोन्यावर आकारल्या जाणाऱ्या करापेक्षा कमी आहे. यावर जीएसटी लागू होत नाही. 

तोटे 

  •  डिमॅट अकाउंट आवश्यक असते : गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्याकडे डिमॅट अकाउंट असणे आवश्यक असते. 
  • गोल्ड ईटीएफवर वर्षाला अर्धा ते एक टक्के इतकी मॅनेजमेंट फी आकारली जाते. 
  •  1 एप्रिल 2023 पासून गोल्ड ईटीएफमध्ये जो फायदा होतो, त्यावर टॅक्स स्लॅबप्रमाणे कर आकारला जातो. तीन वर्षांपेक्षा कमी कालावधी असल्यास प्रचलित टॅक्स स्लॅबप्रमाणे कर आकारला जातो, तर त्यापेक्षा जास्त कालावधी असल्यास वीस टक्के कर आकारला जातो.

गोल्ड म्युच्युअल फंड

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणारे फंड म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड. कोणतंही डिमॅट अकाउंट नसताना ते फंड गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. यात प्रत्यक्ष सोनं विकत घेण्याची गरज नसते. 

फायदे 

  • डिमॅट अकाउंटची गरज नसते त्यामुळे स्टॉक मार्केटशी संबंध नसलेले लोकही गोल्ड म्युचल फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकतात.
  • एसआयपी : नियमितपणे ठरावीक गुंतवण्यासाठी अशा प्रकारच्या फंडमध्ये एसआयपीची सुविधा उपलब्ध असते. 
  • अनुभवी तज्ञ व्यक्तींकडून हे फंड्स मॅनेज केले जातात, त्यामुळे त्यातून योग्य पद्धतीने मिळण्याची शक्यता सर्वात जास्त असते.
  • कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागू होत नाही.

तोटे

  • परताव्याच्या बाबतीत हे फंड गोल्ड ईटीएफवर अवलंबून असतात कारण ही गुंतवणूक  गोल्ड ईटीएफला जोडलेली असते.
  • 1 एप्रिल 2023पासून गोल्ड  म्युच्युअल फंड  मध्ये जो फायदा होतो, त्यावर टॅक्स स्लॅबप्रमाणे कर आकारला जातो. तीन वर्षांपेक्षा कमी कालावधी असल्यास प्रचलित टॅक्स स्लॅबप्रमाणे कर आकारला जातो, तर त्यापेक्षा जास्त कालावधी असल्यास वीस टक्के कर आकारला जातो.

 सोवरेन गोल्ड बॉण्ड

भारत सरकारच्या वतीने भारताचे रिझर्व बँक सोवरेन गोल्ड बॉण्ड जारी करत असते. गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या स्वरूपात ही गुंतवणूक केली जाते.

फायदे

  • व्याजाच्या स्वरूपात रिटर्न्स - सोवरेन गोल्ड बॉण्डमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर ठरावीक व्याजदराने रिटर्न्स मिळतात. हा सर साधारण वर्षाला अडीच टक्के इतका असतो. दर सहा महिन्यांनी हे रिटर्न्स गुंतवणूकदाराला मिळतात. 
  • सुरक्षितता - गव्हर्नमेंट सिक्युरिटी असल्याने सोवरेन गोल्ड बॉण्ड सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
  • हे सोवरेन गोल्ड बॉण्ड राखून ठेवण्यासाठी कोणतंही लॉकर आवश्यक नसतं.
  • कर सवलत : या गुंतवणुकीतून कमावलेल्या व्याजावर कर आकारला जातो, पण मॅच्युरिटी कालावधीपर्यंत सोवरेन गोल्ड बॉण्ड विकले नाहीत तर त्यावर कर आकारला जात नाही. कोणताही जीएसटी नसतो.
  • एखादं कर्ज घेत असताना हे सोवरेन गोल्ड बॉण्ड गहाण ठेवले जाऊ शकतात.

तोटे

  •  हे बॉण्ड आठ वर्षांच्या कालावधीसाठी विकत घ्यावे लागतात. पाचव्या वर्षी त्यातून बाहेर पडण्याची सुविधा उपलब्ध असते, तरीही इतर गुंतवणुकीपेक्षा यातून रिटर्न्स मिळण्यासाठी जास्त वेळ लागतो.
  •  मार्केटला संलग्न रिटर्न्स : यातून मिळणारे रिटर्न्स त्या त्या वेळी बाजारात सोन्याचे दर काय असतात यावरून ठरत असतात. आपण गुंतवणूक करतो त्यापेक्षा कमी किंवा जास्त हे दर असू शकतात.

याव्यतिरिक्त सोन्याशी संबंधित असलेले डिजिटल गोल्ड, फ्युचर गोल्ड, गोल्ड ऑप्शन असे इतरही अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. डिजिटल गोल्डवर सध्या तरी कोणत्याही रेगुलेशन नसल्याने त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला मी देणार नाही. गोल्ड ऑप्शन आणि गोल्ड फ्युचर या दोन्ही पर्यायात प्रचंड प्रमाणात रिस्क असल्याने गुंतवणूकदारांनी शक्यतो त्या प्रकारांमध्ये गुंतवणूक करू नये.

सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि प्रत्येक पर्यायाचे अनेक फायदे तोटे आहेत. आपण कुठे गुंतवणूक करावी हा निर्णय घेताना आपली आर्थिक उद्दिष्टे काय आहेत, रिस्क घेण्याची क्षमता किती आहे याचा विचार करावा लागतो. अशी गुंतवणूक करताना संपूर्ण माहिती घेऊन, शुद्धतेची हमी घेऊन आणि मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास त्यातून योग्य रिटर्न्स मिळू शकतात. सतत बदलत राहणाऱ्या भारताच्या बाजारात सोन्यात गुंतवणूक करण्याचे हे बारकावे समजून घेतल्यास आपला भविष्यकाळ सुवर्णमयी होऊ शकतो.
 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
Embed widget