एक्स्प्लोर

BLOG | सलाम कोव्हिड योद्ध्यांनो!

आरोग्य सेवकांविषयी कमालीचा अभिमान मनात दाटला पण जेव्हा मी कोरोनाचा सामना केला आणि माझ्याबाजूला असलेल्या डॉक्टर्स, नर्स आणि इतर कोव्हीड योद्धांचं काम पहिलं तेव्हा अभिमानासोबतच प्रचंड आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिकच दृढ झाली. सध्याच्या‌ काळात पीपीई कीटमध्ये वावरणाऱ्या आणि रुग्णसेवा करणाऱ्या देवमाणसांचं ऋण आजन्म फिटू शकत नाही.

आजचा हा शेवटचा लेख आज मी लिहिणार आहे कोरोना योद्ध्यांबद्दल. जेव्हा कोरोनाचं थैमान सुरु झालं तेव्हा व्हॉटस्अॅपवर एक फोटो आलेला, डॉक्टर आणि नर्सेस कॉरिडोअरमधून जातायेत आणि सगळे सुपरहीरो त्यांना लवून नमस्कार करतायेत. तेव्हा तो फोटो पाहून आरोग्य सेवकांविषयी कमालीचा अभिमान मनात दाटला पण जेव्हा मी कोरोनाचा सामना केला आणि माझ्याबाजूला असलेल्या डॉक्टर्स, नर्स आणि इतर कोव्हीड योद्धांचं काम पहिलं तेव्हा अभिमानासोबतच प्रचंड आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिकच दृढ झाली. सध्याच्या‌ काळात पीपीई कीटमध्ये वावरणाऱ्या आणि रुग्णसेवा करणाऱ्या देवमाणसांचं ऋण आजन्म फिटू शकत नाही. माझ्या हॉस्पिटलच्या 10 दिवसांच्या वास्तव्यात मला सदासर्वदा सोबत‌ या कोव्हिड योद्धांचीची होती. या माणसांची कामाप्रती ‌असलेली श्रद्धा, सकारात्मकता, सेवाभाव तुमच्या मनाला स्पर्शुन गेला नाही तरच नवल. ‌मी अँकरिंग करताना अनेकदा वाचलेलं की पीपीई कीटमध्ये किती त्रास होतो, किती अडचणींचा सामना करावा लागतो जेव्हा या सर्वांचं आयुष्य जवळून अनुभवलं तेव्हा त्याची अधिक तीव्रतेने जाणीव झाली.‌ पीपीई कीट चढवलं की तुमची ड्यूटी संपेपर्यंत ना तुम्हा पाणी पिता येतं, ना खाता येतं ना तुम्हाला वॉशरुमला जाता येतं. या पीपीई कीटमधल्या माणसाला किती उकडतं याची कल्पनाही आपण करु शकणार नाही. पण तरीही या कशाचीही पर्वा न करता रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे डॉक्टर आणि नर्सेस या काळात मला भेटले. माझी विचारपूस करायला येणारे डॉक्टर आणि नर्सेस हे अक्षरशः घामाने निथळत असायचे, पीपीई कीट घामानं भिजलेलं असायचं त्यांना नक्कीच अस्वस्थ होत असणार पण कोणत्याही त्रासाची भावना मनात न आणता, चेहऱ्यावर न दाखवता हे सर्वजण आपलं काम चोख पार पाडायचे. ड्युटीच्या आधी किमान तीन लिटर पाणी प्यायचं, खाऊन घ्यायचं आणि पीपीई कीट सोबत इतर आवश्यक सेफ्टी साधनं वापरायची आणि नॉन स्टॉप काम करायचं. यांना योद्धा का म्हणायचं हे त्यांचा सध्याचा दिनक्रम जाणून घेतल्यावर लगेच लक्षात येतं. ड्युटी संपल्यावर आणि ते पीपीई कीट आणि ग्लोव्हज उतरवल्यावर अंगात त्राण राहिलेलं नसतं, ग्लोव्हजमुळे हात सुरुकुतलेले असतात. शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि ड्यूटी दरम्यान पोटात अन्नाचा कणही गेलेला नसतो. पण तरीही आधी स्वतःला सॅनिटाईझ करायचं, आंघोळ करायची आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी. हे असं शेड्युल रोज फॉलो करायला मोठी तपश्चर्या लागते. यादरम्यान मला सगळ्या डॉक्टर नर्सेसचं सहकार्य लाभलं पण यामध्ये दोघे छान लक्षात राहिले त्यातल्या एक नर्स हीना पवार आणि दुसरा कोव्हिड योद्धा सुप्रीम मेश्राम. यापैकी सुप्रीमला मी आधीपासून ओळखत होते. BLOG | सलाम कोव्हिड योद्ध्यांनो! मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळच्या दरम्यान माझ्या खोलीत एक पीपीई कीट घातलेला उंचपुरा मुलगा आला. अतिशय अदबीने त्याने बोलायला सुरुवात केली, मी काही वर्षांपूर्वी ज्या जीमला जात होते त्या जीममध्ये तो इन्स्ट्रक्टर असल्याची जुनी ओळख त्याने सांगितली. पीपीई कीटमुळे त्याचा चेहरा दिसत नसल्याने मला त्याला ओळखणं जड जात होतं. पण फेसबुकवर त्याचं प्रोफाईल बघितल्यावर मला चटकन तो लक्षात आला. सुप्रीमचं आता स्वतःचं जीम आहे. पण सुप्रीम डॉक्टर नाही किंवा मेडिकल फिल्डशी संबंधित नाही मग तो इथे काय करतोय हा प्रश्न मी स्वाभाविकपणे त्याला विचारला. तर सुप्रीम तिथे स्वेच्छेने सेवा करतोय. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून. मग मी उत्सुकतेपोटी आणखी गप्पा रंगल्या. सुप्रीम डोंबिवलीतच राहतो. याआधी ते याने सांगली कोल्हापूरच्या पूरस्थितीतही लोकांना मदत केलीये तर केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठीही तो गेला होता. आत्ता फ्रंटलाईन वॉरिअर म्हणून काम करताना केव्हाही संसर्गाचा‌ धोका असूनही सुप्रीमला त्याची भिती नाही. त्याला फक्त जितकी सेवा देता येईल तितकी द्यायचीये. हॉस्पिटलमध्ये पाण्याचे कॅन उचलण्यापासून ते पेशंटला त्यांच्या रुममध्ये जेवण देणं, वेळेप्रसंगी पेशंटचं स्पंजिंग करणं, पेशंटची सकारात्मकता वाढवणं, मेडिकल स्टाफचा भार जितका हलका करता येईल त्यासाठी हरएक काम करणं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या मेडिकल स्टाफच्या फिटनेसची काळजी घेणं, जसं जमेल जेव्हा जमेल तेव्हा त्या सर्वांकडून व्यायाम करुन घेणं. सुदैवाची गोष्ट अशी आहे की गेल्या दोन महिन्यात या हॉस्पिटलचा एकही स्टाफ बाधित झालेला नाही यावरुनच हे सर्वजण घेत असलेली काळजी आणि त्यांची सकारत्मकता अधारेखित होते. सुप्रीमप्रमाणे काम करणाऱ्या प्रत्येकाला माझा सलाम. कारण या आरोग्य आणिबाणीच्या स्थितीत काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा योद्ध्यापेक्षा कमी नाही. दुसऱ्या कोव्हिड योद्ध्या आहेत नर्स हीना पवार ताई. हीना ताई मुळच्या शिर्डीच्या. वर्षभरापूर्वी कल्याणला आल्या.‌तिथे एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. कोरोनाच्या काळात केडीएमसीची आरोग्यसेवक भरतीची जाहीरात आली आणि ताईंनी इंटरव्ह्यू दिला. कारण रुग्णसेवा हे त्यांचं आवडीचं काम. ताईंनी स्वाईन फ्लू च्या साथीच्यावेळीही बरंच काम केलंय. त्या एक दिवशी मला औषधं द्यायला आल्या, विचारपूस केली आणि का कोण जाणे पण त्यांच्याशी छान कनेक्शन जुळलं. हीना ताईंचं खूप लहानपणीच लग्न झालं.‌पण स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असल्याने त्या इथवर पोहोचल्यात. त्या ड्युटीवर असताना कायम उत्साही,मी त्यांना ड्युटीदरम्यान थकलेलं कधी पाहिलंच नाही. आमच्या पहिल्या संभाषणातच त्या म्हणाल्या की खूप हैराण केलंय या कोरोनाने. आजवर इतक्या साथीच्या रोगांच्या पेशंटची सेवा केली पण ही परिस्थितीच वेगळी. सतत म्हणायच्या मी शिर्डीची आहे. बाबांच्या कृपेने तिथेही सेवेची संधी मिळाली आणि शिर्डी सोडल्यावरही त्यात खंड पडू दिला नाही. आता हा कोरोना जोवर जात नाही तोवर मीही घरी जाणार नाही. हीना ताई सध्या कुटुंबापासून लांब राहतायेत. हॉस्पिटलमधल्या बऱ्याचशा स्टाफची व्यवस्था ही हॉस्पिटलने स्वतंत्ररित्या केलीये आणि आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास नको म्हणून ही सगळी मंडळीही मनावर दगड ठेवून घरच्यांचा दुरावा सहन करतायेत. कुणी आई वडिलांपासून दूर, कुणी बायकोपासून, कुणी नवऱ्यापासून तर कुणी लेकरांपासून. या सर्वांचं समाजावरचं ऋण खूप मोठं आहे. त्यांच्या या ‌सेवाभावाची उतराई होणं कठीण आहे. यासोबत आणखी एकाचा उल्लेख करायचाय. मला त्याचं नाव माहित नाही पण तो अगदी तरुण वयातला सफाई कर्मचारी होता.‌ नेहमीच्या वेळेला रूम साफ करायला‌ आला आणि मला विचारलं की मॅडम या कोरोनावरचं औषध तुम्हाला माहित आहे का? मी सहज सांगितलं की सध्या औषध नाहीये पण हायड्रोक्सीक्लोरीक्वीन वापरुन पेशंटला बरं करतात. तो म्हणाला या जगात कोरोनावर केवळ एकच औषध आहे कोणतं ते विचार करुन मला सांगा. मी बुचकळ्यात पडले की आता उत्तर काय द्यायचं? साफसफाई करुन जाताना तो कर्मचारी मला म्हणाला जगात कोरोनावर एकच औषध आहे आणि ते म्हणजे पॉझिटिव्हीटी. पुढे म्हणाला "मॅडम खूश रहो.." "टेन्शन फ्री रहो.." आप जल्दही ठीक होकर घर जाओगी! मी आश्चर्याने बघतच बसले. त्या पाच‌ मिनिटांच्या वेळेत तो बरंच काही सांगून गेला. जीव धोक्यात टाकून काम करणारी ही सगळी माणसं जर इतकी सकारात्मक राहून अगदी जोशात काम करत असतील तर आपणही औषधोपचारांसह सकारात्मकता दाखवायला हवी हे मी मनाशी अगदी पक्कं केलं. कधी कधी कळत नकळत आपल्या आसपासची ‌व्यक्ती कमी शब्दात मोठा संदेश देऊन जाते तसंच काहीसं याघटनेत माझ्याबाबतीत घडलं होतं.‌ आरोग्य सेवक म्हणून काम करणाऱ्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला माझा सलाम. आज ते काम करतायेत म्हणून आपण आजारातून लवकर बरे होतोय, सुरक्षित राहतोय. त्यांच्याप्रती‌ सदैव आदराची भावना ठेवुया सुरक्षित राहुया आनंदी राहूया. हे देखील ब्लॉग जरुर वाचा- BLOG | कोरोना आणि मी BLOG | ...आणि कोरोनाने पिच्छा सोडला!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Embed widget