एक्स्प्लोर

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

लहानपणातले अगदी न कळत्या वयातले सोडले तर प्रत्येकाला आपला पहिला आगगाडीचा प्रवास चांगलाच लक्षात असतो. बालपणींच्या आठवणींमध्ये अगदी महत्त्वाचं स्थान असतं पहिल्या रेल्वे प्रवासाला. त्याचबरोबर लहानपणी, थोडं मोठं झाल्यावर किंवा कॉलेजमध्ये असताना केलेले मोठे लांब पल्ल्याचे प्रवास म्हणजे न विसरता येणाऱ्या आठवणींचा हळुवार कप्पाच जणू..खरं तर रोजच्या धबडग्यातून दूर नेणारा प्रत्येक प्रवास, मग तो कार, बस, विमान कशानेही केलेला असो हवाहवासा वाटतोच..पण या सगळ्यात ‘त्या’ आगगाडीने केलेल्या प्रवासाची बातच वेगळी असते..अगदी प्लॅटफॉर्मवर भलंथोरलं सामान घेऊन आपण घरच्यांबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर केलेला प्रवेश, त्यानंतर गाडी आल्यावर आपला डबा आणि त्यानंतर आपला बर्थ शोधण्यासाठी झालेली तारांबळ सगळंच अविस्मरणीय..एकदा गाडी पकडण्याचं अग्निदिव्य पार पाडल्यावर सहप्रवाशांशी झालेल्या ओळखी काही क्षणातच खाऊच्या देवाणघेवाणीपर्यंत घट्ट झालेल्या असतात आणि मग सुरु होतो तो आगगाडीतला खरा ‘प्रवास’.. प्रवास -बाहेरुन दिसणारी ट्रेन या प्रवासात सहप्रवाशांबरोबरच दर स्टेशनला त्या त्या ठिकाणचा स्पेशल पदार्थ घेऊन आलेल्या प्रत्येक फेरीवाल्याकडून थोडी थोडी चव म्हणून एक एक पदार्थ चाखत चाखत गप्पांचा फड जमतो, आपला परिवार आणि सहप्रवासी असं ते १०-१२ तासांचं कुटूंबच होऊन जातं..असा लज्जतदार, मनोरंजक प्रवास केवळ आणि केवळ आगगाडीनेच शक्य होतो त्यामुळेच तो स्पेशल असतो..पण आजकाल आपण सगळे ‘बिझी’ झालो, प्रवासात वेळ वाया न घालवता लगेच इच्छित स्थळी पोचण्याकडे आपला कल असतो..जिथे विमानसेवा उपलब्धच नाही अशी ठिकाणं सोडली तर इतर सगळीक़डे तासाभरात विमानाने पोचायचं ही आपल्याला आता सोय वाटते आणि इतर ठिकाणी जातांनाही सार्वजनिक वाहनांपेक्षा आपली कार बरी वाटते..पण या इतर सोयींमुळे तो रेल्वे प्रवासाचा आनंद आपल्यातले कित्येक जण हरवून बसले त्याची हूरहूर तर मनात असतेच, त्यावर उपाय म्हणून मुंबईला परळच्या कमला मिल कंपाऊंडमध्ये निघालंय एक युनिक रेस्टॉरन्ट, या जागेचं नावच ‘प्रवास’. प्रवास - आतून दिसणारी गाडी आता प्रवास म्हणजे नक्की काय तर रेस्टॉरन्ट शोधत दिलेल्या पत्त्यावर इमारत दिसतच नाही, दिसते ती अडीच डब्यांची आगगाडी, ते आगगाडीचे डबे म्हणजेच गुजराती थालीसाठी प्रसिद्ध असलेलं प्रवास हे रेस्टॉरन्ट...आगगाडीचे डबे, त्याचा रंग, एकूण डेकोरेशन पाहिलं की लगेच आठवते ती रेल्वेची शान म्हणवली जाणारी राजधानी एक्सप्रेस..आत शिरताना रेल्वेच्या डब्यात शिरताना असतं तर दार आणि तसाच लोखंडी जिना, तिथून आत गेल्यावर मात्र लक्षात येतं की तेवढे ते डबे नाहीत तर अजुनही बरीच जागा आहे रेस्टॉरन्टच्या आतल्या बाजुला.. त्या अडीच डब्यांमध्ये रांगेत जेवणासाठी टेबलं मांडलेली आहेतच, पण बाहेरही टेबलं आहेत..पण त्यातही कल्पकता बघा नं, डब्याच्या आतल्या खुर्च्या आणि बसायची व्यवस्था अगदी ट्रेनच्या आतल्या बैठक व्यवस्थेसारखी तर बाहेरची टेबलं, पाहिली की लगेच प्लॅटफॉर्मवरची आसन व्यवस्था आठवते..म्हणजे लोखंडी बेंच किंवा जाळीच्या काळ्या खुर्च्या अशी बाहेरची आसनव्यवस्था आहे..ऑर्डर घेणाऱ्या व्यक्तीचा पोशाख अगदी तिकीट तपासायला येणाऱ्या टीसीसारखा, तर इतर वेटर लोकांचाही पोशाख रेल्वेतल्या लाल युनिफॉर्मसारखा.. ट्रेनचा दरवाजा डब्याच्या आतलं सगळं डेकोरेशन हुबेहुब रेल्वेच्या डब्यासारखं, खिडक्या तशाच काच वर करुन उघडण्याच्या, (अर्थात एसी सुरु असल्याने त्या बंदच असतात), जुन्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये असायचे तसे स्विच बोर्ड आणि दोन डब्यांमधून येण्याजाण्यासाठी दोन डब्यांना जोडणारा लोखंडी भाग..खरं तर आत शिरल्यावर हे सगळं हुबेहुब आगगाडीसारखं डेकोरेशन पाहून आपण हरखून जातो. प्रवास -आतलं डेकोरेशन डब्याच्या बाहेरही जिथे जेवणासाठी टेबलं आहेत तिथेही आकर्षक पद्धतीने एका मोठ्या रॅकवर मांडलेल्या कुंड्यांचं डेकोरेशन आणि मधोमध ठेवलेलं एक मोठ्ठं तुळशीवृंदावन लक्ष वेधून घेतं, त्यातच प्रथमदर्शनी दिसतं ते चाट काऊंटर..प्रवास खरं तर थाली रेस्टॉरन्ट, त्यामुळे ऑर्डर देण्यासारखं काहीही नाही आणि जे येणार ते थेट पानात पडणार अशी आपली कल्पना असते, पण ते चाट कांऊटर म्हणजे एरव्हीच्या थाली रेस्टॉरन्ट्सपेक्षा एक वेगळा अनुभव असतो.. प्रवास - चाट काऊंटर दररोज तीन पदार्थ या चाट काऊटरवर मिळतात, पाणीपुरी असतेच, दहीपुरी भेलपुरी सारखा एक पदार्थ असतो आणि तिसरा पदार्थ म्हणजे त्यांचा सरप्राईज आयटम असतो, तो डोसा, उत्तपापासून अगदी काहीही असू शकतो, आम्ही गेलो, त्या दिवशी ग्रिल्ड ढोकला असा पदार्थ त्या लाईव्ह चाट काऊंटरवर होता, खास गुजराती पांढऱ्या ढोकळ्याला ग्रीलच्या मसाल्यात घोळवून थेट निखाऱ्यावर ठेवलं जात होतं आणि ते भाजके ढोकळे, त्यावर चाट मसाला भुरकावून दिले जात होते.. प्रवास - जेवणाची सुरुवात त्या चाट काऊंटरवर मनसोक्त खादाडी झाल्यावर आपल्या टेबलवर परतलो की आधी तळलेल्या विविधरंगी पापडांची एक टोकरी आणून ठेवली जाते, त्याच्याबरोबर टेबलवर ठेवली जाते ताज्या सलाडची प्लेट. भलामोठा ताकाचा ग्लास त्यामागोमाग प्रत्येकाच्या ताटाशेजारी ठेवला जातो. अशा सगळ्या साईड डिशेशनी टेबल भरुन गेल्यावर मग थाळी वाढायला सुरुवात होते, ताटातही इतर थाळ्यांमध्ये असतात तसे, ढोकळा, कचोरीसारखे खारे किंवा ज्याला आपण फरसाण म्हणतो अशा पदार्थांनीच सुरुवात होते आणि मग सुरु होते, हे सगळं आपण संपवणार की नाही अशा विचाराने धडकी भरवणारी पदार्थांची जंत्री..चार भाज्या, तीन गोड पदार्थ, कढी, गुजराती दाल ढोकली, पोळ्या पुऱ्या, बाजरीच्या भाकरी आणि सरतेशेवटी साधा भात, मगाची खिचडी अशा पदार्थांनी जेवणाचा शेवट. प्रवास - भरलेलं ताट आता राजेशाही थाटाच्या राजधानी एक्सप्रेससारख्या गाडीत बसून जेवल्यावर बेसिनवर जाऊन हात धुण्याच्या प्रश्नच येत नाही. हात धुण्यासाठी युनिफॉर्ममधला वेटर एक नक्षीकाम केलेली सुरई आणि जुन्या काळी हात धुण्यासाठी वापरलं जाणारं तस्त घेऊन येतो.  तस्तावर हात धरायचे आणि सुरईतून येणाऱ्या पाण्याने हात धुवायचे, आहे की नाही रॉयल अनुभव. सगळ्या पदार्थांच्या चवी म्हणजे गुजराती, पंजाबी आणि मराठी चवींची सरमिसळ..पण दाल ढोकली आणि खिचडीसारखे काही पदार्थ मात्र टिपीकल गुजराती चवीचे...तसं पाहिलं तर मुंबईत कितीतरी प्रसिद्ध थाळी रेस्टॉरन्टस आहेत.. अगदी राक्षसी वाटाव्या अशा ३०-३२ पदार्थ एकावेळी ताटात वाढणाऱ्या रिवायवल, गोल्डन स्टारसारखी थाळी रेस्टॉरन्ट एकीकडे आहेत, तर सध्या लोकांच्या पसंतीस उतरणारी राजधानी, पंचवटी गौरवसारखी दुसरीकडे आहेत..पण या थाळी रेस्टॉरन्टच्या स्पर्धेत ‘प्रवास’ गर्दी खेचतंय ते चटपटीत चवी आणि जबरदस्त अशा युनिक कन्सेप्टमुळे.. प्रवास - सुरई आणि तस्त आणखी एक वेगळेपण प्रवास रेस्टॉरन्टमध्ये आहे जे साधारणपणे थाळी रेस्टॉरन्टमध्ये नसतं ते म्हणजे त्यांचा ड्रिंक्स बार आणि बारचा युनिक मेन्यू. या बारमध्ये कॉकटेल आणि इतर ड्रिंक्सबरोबरच काही अनोखे मॉकटेल्स मिळतात..सगळी मॉकटेल्स एकदम देसी किंवा एकदम गुजराती..अहमदबादी मसाला सॉर्बै, भावनगरी लिमडे अशी इथल्या मॉकटेल्सची नावं..पण त्यातही सगळ्यांना जेवणाच्या शेवटी खुणावणारं मॉकटेल म्हणजे डमरु पान..पानाच्या फ्लेवरच्या मिल्कशेकमध्ये पान आणि व्हेनिला फ्लेवरचं आईस्क्रीम थेट पान ग्लासात ठेऊनच येतं आपल्यासमोर..त्यात गुलकंदाचीही मस्त गोडसर चव लागते..हे पान मॉकटेल म्हणजे इथली न चुकवता येणारी स्पेशालिटी.. प्रवास डमरु पान सध्या परळमधलं कमला मिल कंपाऊंड अशी जागा झालीय जिथे वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टॉरन्टस आणि पब्स आहेत..प्रत्येक रेस्टॉरन्ट एकापेक्षा एक युनिक आणि त्यामुळे प्रसिद्ध..इटालियन, एशियन, जपानी अशा खाद्यपदार्थांपासून पब्जपर्यंत रेस्टॉरन्टची व्हेरायटी असताना या भागात सगळ्यात जास्त गर्दी असते ती ‘प्रवास’च्या बाहेर..कदाचित आपल्या आयुष्यातून हरवलेला पण मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवलेला तो आगगाडीचा प्रवास किमान जेवता जेवता तरी अनुभवता यावा म्हणून लोक इथे गर्दी करत असतील..

‘जिभेचे चोचले’मधील याआधीचे ब्लॉग :

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Sion Land VHP: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय,  सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Sion Land VHP: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय,  सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
Embed widget