एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईतील ग्रामस्थ मंडळाच्या 'बैठकीच्या खोल्यां'ना ग्रहण
सर्वच राजकारण्यांनी या बैठकीच्या खोलीतील ग्रामस्थांचा उपयोग करुन घेतलाय. मात्र आता कोणताच राजकीय नेता या बैठकीच्या खोलीतील राहणाऱ्या रहिवाशांच्या मागे उभा राहिलेला दिसत नाहीय.
वर्षानुवर्ष मुंबईत रुजलेली बैठकीच्या खोलीची संस्कृती आत नाहीशी होतेय. डिलाईल रोड, लोअर परळ, करी रोडमध्ये असलेली ही संस्कृती आता टोलेजंग इमारतींमुळे नष्ट होणार असं दिसतंय. डिलाईल रोडमधील बीडीडी चाळीतील मंडळांच्या खोलीला मिळत असलेल्या कोट्यावधींच्या किमतींमुळे खोली सभासद विरुद्ध ग्रामस्थ असा वाद तयार झालाय. या वादातच या मंडळाच्या खोलीत राहणाऱ्या ग्रामस्थांचं सामान भर पावसात बाहेर काढलं जातंय.
वर्षानुवर्ष पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकं कुटुंब गावी ठेवून मंडळांच्या या दहा बाय दहाच्या खोल्यांमध्ये राहत आहेत. बुजवडे ग्रामस्थ मंडळाची एक अशीच खोली आहे. वर्षानुवर्ष गावातील अनेकजण या खोलीत आले अन गेले. या खोलीने त्यांना आसरा दिला. मायेची उब दिली. मात्र आता अनेक वर्ष राहणाऱ्या या खोलीतील तरुण मुलांना बेघर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. या बुझवडे ग्रामस्थ मंडळाच्या खोलीवर आपला ताबा आहे असं काही जणांकडून सांगितलं जातंय. त्यामुळे आता मुंबईत बैठकीच्या खोलीत राहणाऱ्यांमध्ये आता वाद सुरुय.
‘बैठकीच्या खोल्या’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाच्या खोल्यांची एक वेगळीच संस्कृती आहे. लोअर परळ, डिलाईल रोड, करी रोड भागात ही संस्कृती पाहायला मिळते. कापड गिरण्या भरभराटीला असताना पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावकरी मुंबईत आली. त्यांना नोकरी मिळाली पण निवारा नव्हता. अशा वेळेस ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकाराने गिरणी कामगारांनी खोल्या घेतल्या. यामध्ये कोल्हापूरमधील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड तालुक्यातील ग्रामस्थांचा जास्त भरणा होता.
लहानश्या खोलीत 30 एकजण एकत्र राहत. गिरणीतील कामाची शिफ्ट संपल्यानंतर हक्काची खोली म्हणून येथे निवांत झोप लागे. मात्र आता गेले ते दिवस. गिरण्या बंद झाल्या. नोकरीसाठी, शिक्षणसाठी गावाकडील तरुण वर्ग मुंबईत आला. कामधंद्याचं स्वरुप बदललं. मात्र बैठकीच्या खोलीचा आधार कायम राहिला. डिलाईल रोड, लोअर परळ आणि करी रोड भागांत अशा 300 हून अधिक बैठकीच्या खोल्या आहेत. याच बैठकीच्या खोलीत मुंबई, गावच्या राजकारणावर चर्चा व्हायच्या. गावच्या विकासावर बैठका व्हायच्या. त्यामुळेच निवडणुकीच्या काळात याच खोल्याकडे राजकारण्यांचं लक्ष असे. कारण मोठ्या प्रमाणावर असलेला हा मतदारसंघ. सर्वच राजकारण्यांनी या बैठकीच्या खोलीतील ग्रामस्थांचा उपयोग करुन घेतलाय. मात्र आता कोणताच राजकीय नेता या बैठकीच्या खोलीतील राहणाऱ्या रहिवाशांच्या मागे उभा राहिलेला दिसत नाहीय.
कालातंराने मोठ्या प्रमाणावर बैठकीच्या खोल्या असलेल्या बीडीडी चाळींचा पुर्नविकासाचा मुद्दा गरम होऊ लागला. 10 बाय 10 च्या या खोलीच्या जागी आता फ्लॅट मिळणार होता. या एका खोलीची किंमत आता एक कोटी रुपयांच्या आसपास गेलीय. ज्या बैठकीच्या खोल्या ग्रामस्थ मंडळाच्या होत्या त्या स्वमालकीच्या झाल्या. महत्वाचं म्हणजे या स्वमालकीच्या कधी झाल्या हे खुद्द ग्रामस्थांनाही माहिती नाही. ही परिस्थिती फक्त बुझवडे ग्रामस्थ मंडळाची नाही. बऱ्याच ग्रामस्थ मंडळाच्या खोल्यांची हीच अवस्था आहे. त्यामुळे या वाढलेल्या किमती बघून या बैठकीच्या खोलांचा मालक होण्याचा प्रयत्न केला गेलाय.
येथे राहणाऱ्या जुन्या स्थानिकांच्या मते बीडीडीच्या या ब्रिटीशकालीन इमारतीत त्यावेळी राहील त्याचं घर असा नियम होता. तसच 60 - 70 वर्षांपुर्वी मुंबईतील या मध्यवर्ती ठिकाणावर राहण्यासाठी यापेक्षा स्वस्त जागा कुठेही नव्हती. अशा वेळेस अत्यंत कमी दरांत ग्रामस्थ मंडळाच्या खोल्यांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मुंबईत भाड्याच्या खोल्यांचे दर प्रचंड आहेत. तटपुंज्या पगारात स्वतंत्र खोल्यांचे भाडे परवडत नाही. अशा वेळेस अत्यंत कमी दरात ग्रामस्थ मंडळाच्या खोल्यांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र याच बैठकीच्या खोलीतून बाहेर काढल्यावर राहायचं कुठं? असा प्राशन या मुलांच्या समोर उभा राहिलाय. स्वत: मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि ही मंडळाच्या बैठकीच्या खोल्या वाचवाव्यात अशी त्यांची मागणी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement